नशा

Submitted by निलेश बामणे on 24 April, 2012 - 01:44

नशा

तू दिसल्यावर तुझ्या सौंदर्याची नशा मला चढते
नशेत माझ्याकडून त्या सारे चुकीचेच घडते

तुझ्या प्रेमात मी का पडलो मलाच न कळले
समोर तुझ्या संस्कार सारेच माझे का झुकले

नव्हतो जसा मी कधी खुला प्रेमात तुझ्या तसा झालो
जगा सामोरी माझ्या नकळत मी बदनाम ठरलो

तुझ्या नशेवर मी मग एक उतारा शोधाया लागलो
रोज नवीन नशेच्या आहारी जाऊ लागलो

प्रेमामुळेच मी तुझ्या जगात सदाच कुचकामी ठरलो
प्रेमाच्या नशेत मी तुझ्या कविता लिहू लागलो

कवी- निलेश बामणे

गुलमोहर: