आई बाबा

Submitted by अनिल तापकीर on 24 April, 2012 - 01:21

केली उदंड माया आईने
बापाने दिला डोंगरासारखा आधार
आई बाबा कधी फिटतील
तुमचे हे उपकार

आठवते अजूनही मला
जेव्हा होतो मी लहान
परस्थितीशी झगडत तुम्ही
केले माझे संगोपन

थोडा जरी पडलो
तेव्हा मी आजारी
काळजी घेत होता तुम्ही
सोडूनी कामे सारी

माझ्या सुखातच तुम्ही
तुमचे सुख पहिले
लाभावे मज सुख यासाठी
आयुष्यभर झिजले

म्हणूनच मनापासून मला
खरे वाटते आज
तुमच्या शिवाय जगी
नसे दुसरे कोणी पूज्य

गुलमोहर: