ते दिवस

Submitted by Rekha. on 23 April, 2012 - 09:51

सरले ते दिवस
त्या गप्पांच्या मैफिली
ते रुसवे, फुगवे,
तो अबोला
ते रडणे,ते रडवणे...

आता उरल्यात फक्त आठवणी
त्या ठेवल्यात मनाच्या माळेत गाठवुनी

येतील का परत ते दिवस?
छे ! सरले ते दिवस

-
रेखा धेडे

गुलमोहर: 
शब्दखुणा: