Submitted by pradyumnasantu on 22 April, 2012 - 14:35
रोज दूत सूर्याचे ताडतात भाजतात
आज मात्र तिच्या गळा प्रेमे घातलेत हात
रोज दुपारी त्याच्या किरणाना येई माज
मात्र आज तिच्या गळा साजे सोनेरी साज
आज तिच्या लेकरांनी दिवस तिचा योजला
वसुंधरा दिन नामे रम्य दिवस साजला
मुसळधार झोडपणारा शांत राही आज वरुण
स्वागतपर शिडकावे शिंपडतो अधुनमधुन
मातेचे इथेतिथे बाळांनी चुंबन घ्यावे
आणि तिच्या कायेवर काट्याने फुलावे
मानवरुपी चांदण्यानी देह तिचा मोहरला
वसुंधरा दिन नामे रम्य दिवस साजला
सन्माना खडी आज इंद्रधनुची कमान
त्याखाली भिन्नदेशी एक विसरुन भेदभान
काय गाऊ गुणगान आई तुझ्या स्मृतिचे
सुवर्णाहुनी श्रीमंत छातीच्या मातीचे
कणोकणी तुझी कृपा देह दु:ख विसरला
वसुंधरा दिन नामे रम्य दिवस साजला
गुलमोहर:
शेअर करा
अप्रतिम, आवडली
अप्रतिम, आवडली
अप्रतिम,आवड्ली
अप्रतिम,आवड्ली
छान आवडली...
छान आवडली...
छानै
छानै
मस्त.
मस्त.
झकास, पण वसुंधरा दिनाची आणखी
झकास, पण वसुंधरा दिनाची आणखी एक दुसरी कविता होती ना तुमची?
पाषाणभेदजी: वसुंधरा दिनाची
पाषाणभेदजी:
वसुंधरा दिनाची आणखी एक दुसरी कविता होती ना तुमची?>>>
नाही. ही एकच.
धन्यवाद.