नुसताच तुला बघतो मी..

Submitted by प्रसाद पासे on 22 April, 2012 - 10:46

नुसताच तुला बघतो मी, दुरूनच तुला न्याहळतो मी
नुसताच तुला बघतो मी, नुसताच तुला बघतो मी

आपुलकीचे दोन शब्द बोलावे म्हणतो
पण मनातल्या मनात घाबरतो मी,
नुसताच तुला बघतो मी.

कधी कधी बोलायाचे धाडस करतो
पण शब्दच विसरतो मी,
नुसताच तुला बघतो मी.

सारखा तुझाच विचार करतो
विचारताच मग्न होतो मी,
नुसताच तुला बघतो मी.

तुझ्यावर कविता करावी म्हणतो !
तुझ्याच कवितेत रमतो मी,
नुसताच तुला बघतो मी.

आजकाल वेगळ्याच विश्वात जगतो
नेहमी स्वप्नातच जगतो मी,
नुसताच तुला बघतो मी.

तुझ्यासाठी कासाविस होतो
तुला पाहताच वेडा होतो मी,
नुसताच तुला बघतो मी.

नुसताच तुला बघतो मी, दुरूनच तुला न्याहळतो मी
नुसताच तुला बघतो मी, नुसताच तुला बघतो मी

प्रसाद पासे

गुलमोहर: 

छान