Submitted by चाऊ on 22 April, 2012 - 02:56
वृक्ष - वल्ली, तृण - कुरणे, हिरवाई, पाऊसधारा
जीवनदायिनी, सर्व संपूर्ण, माता वसुंधरा
जल - वायू, मृदा - पर्वत, जलचर, खग, भूचरा,
मायेने करी संगोपन, धरित्री सर्वांच्या आधारा
मानव - जन, प्रगत, शास्त्री, विज्ञानाचा पुजारी
सुख - समृध्दीच्या हव्यासी, विनाशाते आवरा
प्रदूषित करी जल - वायू, उद्योगे, करी प्रदुषित, तन- मना
वापरा, पुन्हा वापरा, टाळा प्रदूषण, विनवितो जोडूनी करा
योग्य शास्त्रे नष्ट करा, प्लास्टीक, रसायने आणि दूषीत वायू,
एकच मंत्र, नका करु कचरा, वापरा, पुन्हा वापरा
वाढवा वृक्ष संपदा, संवर्धना जल संपदा
सुभग सर्व संवर्धनासाठी, आपली सुबुध्दी वापरा
जीवन, सुख, आरोग्य, आपले आणि पिढ्यांचे, पुढल्या
जर राहील, स्वच्छ, शुध्द, समृद्ध, आपली वसुंधरा
गुलमोहर:
शेअर करा
अतिशय सुंदर.
अतिशय सुंदर.
छान आहे कविता आणि तिचा
छान आहे कविता आणि तिचा विषय
विनाशाते.............हा शब्द्प्रयोग आपण अधी कुठे पाहिला आहे का.??
मी एकदा माझ्या कवितेत असाच "मुलाते" हा शब्द योजला होता..........त्यावर मराठी टीकाकारान्नी टिका केली होती .............आपणास या शब्दाबद्दल अधिक माहिती असेल तर जरूर कळवा
विनाशाते... हा शब्द माझ्या
विनाशाते... हा शब्द माझ्या माहितीप्रमाणे, विनाशाला, ह्या अर्थाचा आहे.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.