रॉक ऑन : द ट्रेंड सेटर !

Submitted by दीपांजली on 8 September, 2008 - 17:21

अजुन कोणी कसा पाहिला नाही ?:)
फरहान खान चा acting-singing debut, 'ROCK ON', rockssssssssssssssssssssssssss!!
साधारण 'दिल चाहता है' सारखं च प्रेझेंटेशन, पण एकदम फ्रेश विषय आणि परफेक्ट कास्टींग !!
स्टोरी काही लिहित नाही पण 'रॉक बॅन्ड ' आणि त्यातले ४ मित्र, त्यांची कॉलेज पासून ते कॉर्पोरेट जगात पाउल ठेवे पर्यंत ची जर्नी हा विषय च हिन्दी मधे तरी एकदम ताजा वाटला पहाताना Happy
फरहान अख्तर आणि अर्जुन रामपाल आणि इतर दोन रॉक बॅन्ड वाल्यांनी मस्त केलय ऍक्टिंग, स्टेज वर वावरताना टिपिकल केसांना झटके देत वावरणारे, अधून मधून एक दोन गाण्याच्या ओळी एकत्र म्हणाणारे सगळे अगदी खरोखरचे रॉक स्टार वाटतात सगळे !
फरहान अख्तर मस्त वाटला, त्याचा अभिनय पहाताना बरेचदा वाटतं कि त्याने ह्रितिक रोशन ला अभिनयाचे धडे दिले असावेत, खूप दा ह्रितिक च्या facial expressions, reactions ची आठवण येते :)!, फरहान दिसतोही cool, आधी Rock star attitude, नंतर Corporate classy look सगळं एकदम जमून गेलय फरहान ला, He really carries his outfits veryyy well..!
अर्जुन रामपाल ला ओम शन्ति ओम नंतर अजुन एक झकास रोल मिळालाय, guitarist , not so successful, inferiority complex guy...'Joe'!, अर्जुन आगदी खरच अगदी तस्साच वाटतो !
पोनी टेल तर अगदी परफेक्ट सूट होतं त्याला, खूप आवडला अर्जुन रामपाल !
बाकीचे २ मित्र आणि त्यांच्या girl frieds पण चांगल्या वाटतात.
आणि हो, 'प्राची देसाई' पण खूप cute वाटली, चांगला केलाय तिनी फरहन च्या बायकोचा रोल, They look perfect together Happy

शंकर्-एहसान्-लॉय ची गाणी पण एकदम वेगळी, 'मेरी लाँड्री क एक बिल, एक आधे पढी नॉवल' , 'आसमान है निला क्यूं' आणि फायन रॉक कोंन्सर्ट ची गाणी मस्त वाटली!

अगदी नक्की पहा, '
Must Watch !
माझ्या कडून **** stars Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजच फरहान अख्तरचा "रॉक ऑन" बघितला...
फारश्या अपेक्षा न ठेवता बघितल्यामुळे बरा वाटला पिक्चर!
प्रोफेशन आणि इतर कारणांसाठी पॅशनबरोबर केलेला कॉम्प्रमाइज आणि नंतर आपापल्या लाइफमध्ये यशस्वी/अयशस्वी झालेल्या तरुणांचा त्या अपुर्‍या स्वप्नाच्या दिशेने प्रवास अशी साधारण थीम आहे या मूव्हीची....
फरहान अख्तर रॉकस्टार आणि यशस्वी करिअरिस्ट अश्या दोन्ही भुमिकेत शोभुन दिसतो... त्याची आणि प्राची देसाइची जोडी छान दिसलीय पडद्यावर!
अयशस्वी माणुस चांगला उभा केलाय अर्जुन रामपालने.. त्याच्या बायकोचे कामसुद्धा चांगले झालेय!
कथानकास आवश्यक तो हलका ह्युमर पुरवण्याचे काम पुरबने (केडी ) चोख केलय...
गाणी चांगली आहेत पण आवडण्यासाठी २-३ दा ऐकावी लागतात....
काही त्रुटी आहेत जसे आदित्यचे (फरहान) अनाकलनीय परावर्तन आणि गुंडाळल्यासारखा वाटणारा चित्रपटाचा शेवट!
पण एकदा बघायला हरकत नाही....

मला हा चित्रपट बघताना दिल चाहता है, दिल विल प्यार ब्यार आणि झंकार बीट्स ची आठवण झाली Happy

मी ते 'ट्रेड सेंटर 'असं वाचलं! Happy

मैत्रेयी, तुझं पोस्ट येईपर्यंत मी ही ते ट्रेड सेंटर असच वाचत होते .. Happy

मी पण. मला कळत नव्हते गाणे-बजावणे आणि ट्रेड सेंटरचे काय नाते ? बहुतेक फरहान अख्तर एका ट्रेड सेंटरमचे कामाला लागला असावा Wink

बघायलाच हवा तर. पिक्चरच्या निमित्ताने बानीची सुटका झाली 'कसम से' मधून. Happy

त्या कसम से मधे इतक्या उड्या मारल्यायत की एकताला सुद्धा लोकांच्या वयाचा ट्रॅक ठेवता येत नाहिये आता. तसं लक्ष देउन पाहिलं तर बानीचं वय ५० च्या आस पास अन जय वालिया आता ६५ वयाचा हवा किमान!!:खोखो:

ए हो मीपण. ट्रेड सेंटरच वाचलं Lol बघायला पाहिजे मुव्ही

मैत्रेयी, एवढी चिकित्सक वृत्ती ठेवायची नाही सिरियल्स बघताना. नी एकताच्या... मेंदू बाहेर काढून ठेवता आला तर तो काढून बघायलाही हरकत नाही. Wink

ट्रेद सेंटर....... हा हा हा.. टू मच !!!!!!!!!!!

मी पण ट्रेंड सेटर वाचुन आले कि काय बर लिहिलय असेल. Wink
बाकी सिनेमा पहायलाच हवा. मला फरहान आवडतो. Happy

चला म्हणजे मी एकटीच नाहीये इथे dyslexic लोकांसारखे वाचणारी. Happy

'रॉक ऑन' मला पणं छान वाटला..
फरहान चे लूक्स आणी अभिनय मस्तच!

फरहान छानच्.आनि मूवी ठीक वाटला.

मी ते 'ट्रेड सेंटर 'असं वाचलं!

>>>>>>

हा हा, हल्ली हितगुजवर ऑप्टिकल इल्ल्युजन्स फार वाढलेत. परवा मला 'अनिलभाई' एकदम पाहिलं तर 'आईन्स्टाईन' दिसलं, कुणाला तरी 'मरिमाय' शब्द 'मरिआय' असा दिसला आणि आता ट्रेड सेन्टर....
---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

यस रॉकऑन मलाही खूप आवडला. सही नॉस्टेल्जिक फिल येतो पिक्चर पहाताना. आणि फरहान बद्दलचं पर्फेक्ट लिहिलयस डिजे.

मला काही फार appeal झाला नाही .. फरहान ला "दिल चाहता है" वेगळ्या पध्दतीने सादर करायची उर्मी होती असं वाटलं .. frakly speaking, "lame" वाटला मला तरी ..

ट्युलिप, ह्याचाही वयाशी (बादरायण) संबंध जोडणारेस का?

एवढा हा प्रतिसाद!! मला बघायलाच पाहिजे आता पण... तिकीट कुणी देईल का? Wink
"The senses do not give us a picture of the world directly; rather they provide evidence for checking hypotheses about what lies before us"
Professor Richard L. Gregory.

सशल, दे टाळी! मी हेच लिहायला आलो होतो. बरा होता, पण सगळंच इतकं abrupt होतं! तो भांडणाचा समेट तर असा abrupt दाखवलाय की नक्की भांडले कशाला होते असं वाटलं. आणि नंतर ते टिपिकल प्रेडिक्टेबल एकाला कॅन्सर असणं आणि टॅक्सीतून चालत Joe चं स्टेजवर येणं... कायच्या काय! आय ऍम सॉरी बरंका पण ट्रेंड सेटर म्हणजे नक्की काय म्हणायचंय??!!! ते तसल्या केश अन् वेशभूषांचा ट्रेंड Proud थिल्लर प्रभावानेही वहावणार्‍या टीनेजर्सच्या ट्रेंडच्या बाबतीत म्हणायचे असेल तर मग ठीक आहे. ~~D

चाफा,
जाउ दे, अजिबात च आवडला नाही का तुला:)?
ट्रेंड सेटर म्हणजे नवीन विषय चांगला सादर केलाय म्हणून, फरहान अख्तर अर्जुन रामपालना चांगलं प्रेझेंट केलय, गाणी पण वेगळ्या प्रकारची आहेत म्हणून म्हंटलं Happy
आणि हिरो फरहान किंवा 'जाने तु' मधला इम्रान हे टिपिकल हिन्दी सिनेमातल्या हीरो सारखे चेहरे नसून छान वाटतत म्हणून वेगळी ट्रेंड येइल या यशस्वी चित्रपटांमुळे असं वाटत अत्ता तरी:)
बाकी काय , पसन्द अपनी अपनी!

प्रेझेंट केलय, गाणी पण वेगळ्या प्रकारची आहेत म्हणून म्हंटलं
आणि हिरो फरहान किंवा 'जाने तु' मधला इम्रान हे टिपिकल हिन्दी सिनेमातल्या हीरो सारखे चेहरे नसून छान वाटतत म्हणून वेगळी ट्रेंड येइल या यशस्वी चित्रपटांमुळे असं वाटत अत्ता तरी

>>> हे मात्र पटलं गं! फ्रेश चेहरे चांगले वाटतात:) तू माझे बोलणे फार मनावर नको घेऊस कारण मला मुळात पिक्चर बघण्याचा जास्त पेशन्स तसाही नसतो. Proud

शेवटी काल पहिला हा पिक्चर..
ट्रेंड सेट करण्यापेक्षा आधी सेट असलेलेच ट्रेंड वापरून एक बरा (ok types) पिक्चर दिलाय...

एकदम फ्रेश विषय आणि परफेक्ट कास्टींग >>> हे अगदी आत्ताच जाने तू मधे होतं..

त्यातले ४ मित्र, त्यांची कॉलेज पासून ते कॉर्पोरेट जगात पाउल ठेवे पर्यंत ची जर्नी हा विषय च हिन्दी मधे तरी एकदम ताजा वाटला पहाताना >>>> हे दिल चाहता है, थोड्याफार प्रमाणात रंग दे बसंती, थोड्याफार प्रमाणात जाने तू मधे होतच..

फरहान अख्तर आणि अर्जुन रामपाल आणि इतर दोन रॉक बॅन्ड वाल्यांनी मस्त केलय ऍक्टिंग >>> रॉक नाही पण बँड चा फंडा कभी हा कभी ना मधे पण लई भारी दाखवला होता..

त्यामूळे फार वेगळं अस काही वाटलं नाही..

एकूण जोधा अकबर आणि जाने तू नंतर hgकरांनी उगीच डोक्यावर घेतलेल पिक्चर वाट़ला.. ट्यू आणि डिजे.. Light 1
Proud

ट्यु यार,
फार दिवे जमा झाले या वर्षी आपल्या कडे !!!!!!!!!हाहाहा:)))))))

मला चित्रपट आवडला आणि त्याहुन जास्त गाणी आवडली.सर्वच गाणी सही आहेत. चित्रपट तसा तणावपुर्ण वाटतो. दिल चाहता है आणि झनकार बीट्स यांचे मिश्रण आहे.चित्रपट ठिक आहे पण गाणी जबरदस्त. अशी रॉक गाणी अजुन हिंदीमध्ये यायला हवीत.फरहान जबरदस्त आहे .त्या गाण्यांमधला आवाज त्याचाच आहे का???सही आवाज आहे.रामपाल मला मुळातच आवडत नाही त्यामुळे त्याच्याबद्दल फारस काही वाटल नाही पण त्याची मिशीवाली स्टाईल आवडली.जुन्या रॉबची स्टाईलपण भारी होती.

ते तसल्या केश अन् वेशभूषांचा ट्रेंड थिल्लर प्रभावानेही वहावणार्‍या टीनेजर्सच्या ट्रेंडच्या बाबतीत म्हणायचे असेल तर मग ठीक आहे
उगाच कौतुक नको.आणि त्यात थिल्लर काय????

बघा- http://gandharvablog.blogspot.com/

सिनेमा आवडला, पण ट्रेंड सेटर काही वाटला नाही...

चांगला आहे...

फरहान ला पाहताना हृतिक ची आठवण होते सारखी....
पण छान काम केलंय त्यानी...

_______
नमस्ते लंडन

रॉक ऑन पाहीला. ठीक वाटला. तेच predictable end. एखाद्या साध्या गोष्टीवरून मित्रामध्ये भांडण नी मिलाप. मला जरा बोर वाटला. कीती तो रेंगाळत वाटला. काही शॉटसमध्ये इतका काळोख का वाटला तेच कळले नाही.
प्राची देसाइ बहू म्हणूनच शोभेल. काहीही glamarous नाही वाटली. deep set eyes, बारील चेहरा नी सूट होत नसलेली हेअरस्टाइल. आधीच चेहरा लहान त्यात काय ते झिपरे केस डोळ्यावर.तसा रोल मध्ये काही special तीर न्हवताच मारायचा. रोज जे कसम से मध्ये रडारड करायची ती केलीय.

मला खुप ग्रेट वाटला नाही. मला यातले सर्वात आवडलेले पात्र म्हणजे अर्जुनची पत्नी. तीची तळमळ खरी वाटली. तिच्या स्वत्।च्या करीयरची वाट लागूनही ती घराचा गाडा ओढायचा आटोकाट प्रयत्न करते. तिची दमछाक होताना स्पष्ट दिसते. आधीची ती आणि नंतरची ती ... किती बदललेले आयुष्य.. नवरा सेटल व्हावा म्हणून सतत तीचे प्रयत्न सूरू... कुठेतरी आशेचा किरण दिसतो म्हणून ती नवर्‍याला परोपरीने शिपवर पाठवायचा प्रयत्न करते.त्यासाठी आदिच्या घरी जाते. आदिची आर्थिक स्थिती पाहून तिला कुठेतरी असूया वाटते... पण तो नशिबाचा भाग म्हणून सोडून देते.

कुठेही नवर्याला त्यच्या अपयशाबद्दल टोचून बोलत नाही किंवा स्वत्।चे करीयर बनले नाही म्हणून कुढत बसत नाही. उलट ती परिस्थितीशी लढण्याचा प्रतत्न करते