विसंगत गोष्ट ही! चाणाक्ष विद्यार्थी

Submitted by विजय आंग्रे on 20 April, 2012 - 00:58

प्रा. विनय सहस्त्रबुध्दे यांच्या चाणाक्षपणाचे गोष्टी तुम्ही पूर्वी वाचल्या असतील. अनेक गुंतागुंतीच्या गुन्ह्याच्या तपासांत पोलिसांना प्रा. सहस्त्रबुध्दे यांनी अचूक मार्गदर्शन केले आहे. गोष्टी रंगवून सांगण्यातही त्यांचा हातखंडा होता. एकदां कॉलेज संमेलनाचे जेवण चालू असतांना त्यांनी पुढील गोष्ट सांगितली-

पुण्याला रावबहादुर पारखी नावाचे एक बडे गृहस्थ होते. त्यांना एक मुलगी झाली. पण ती सहा महीन्यातच काही अपघाताने आंधळी झाली. एकुलतीएक मुलगी. तिचे आंधळेपण जाऊन तीला पुन्हा दृष्टी यावी, यासाठी रावबहादुरांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला.सगळे देशी डॉक्टर झाले. पण कोणाचा उपाय चालला नाही. अशी दहा वर्ष लोटलीं. अखेर दिल्लीला एका वैद्यकीय परिषदेसाठी एक नामांकित जर्मन नेत्रतज्ज्ञ आला असल्याचे त्यांना कळले. त्यांनी डॉक्टरची भेट घेतली आणि मुलीला दाखविली. त्यानें तिची तपासणी केली आणि तो म्हणाला, "या मुलीला योग्य उपचार झाले तर तिची दृष्टी परत येऊ शकेल!" रावबहादुरांनी मोठ्या आशेने विचारले, "मग तुम्ही ही केस हाती घ्याल का?" तो जर्मन डॉक्टर म्हणाला, "हिच्या डोळ्यावर ऑपरेशन करावे लागेल. तें साहीत्य मी इथे आणलेले नाही. हिला जर्मनीला पाठवाल तर मी हिच्या डोळ्यावर माझ्या इस्पितळांत शस्त्रक्रिया करीन."
रावबहाद्दुरांनी ते कबुल केले. ते मुलीला घेऊन जर्मनीला गेले. जर्मनीला गेल्यावर त्यांनी त्या जर्मन डॉक्टराच्या इस्पितळात मुलीला ठेवली. त्यांने तिच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया केली आणि तिचे डोळे बांधून ठेवले. चार दिवसांनी काय तो निकाल कळेल असें त्यानें रावबहादुरांना सांगितले. ते चार दिवस रावबहादुरांना चार वर्षासारखे वाटले.

अखेर एकदांचा तो दिवस उजाडला. रावबहादुर अत्यंत अधीर अंत:करणानें इस्पितळात गेले. शस्त्रक्रिया यशस्वी झाली असेल का? मुलीला परत दृष्टी लाभली असेल का? या उत्कंठेच्या विचाराने त्यांचे चित्त सैरभैर झालें होतें. डॉक्टर रावबहाद्दुरांची वाटच पहात होते. त्यांना घेऊन ते मुलीच्या खोलींत गेले. खोलीच्या खिडक्यांना पडदे होते ते त्यांनी बाजूला केलें. सकाळचा मंद प्रकाश खोलींत पडला. मुलगी खाटेवर झोपली होती. तिला उठवून डॉक्टरांनी तिला एका आरामशीर खुर्चीवर बसवले. रावबहादुरांनी मुलीची प्रेमळपणे विचारपूस केली. नंतर तो सोक्षमोक्ष होण्याचा क्षण आला-

डॉक्टरांनी मुलीच्या डोळ्यावर बांधलेली पट्टी सोडायला सुरवात केली. हळूहळू तो पट्टा उलघडला जाऊन मुलीचे डोळे मोकळे झाले. तिने काहीवेळा डोळ्यांची उघडझाप केली. मग डॉक्टरांनी शेजारच्या टेबलवरचा रंगीत कागद उचलून मुलीसमोर धरला आणि ते तीला मॄदुस्वरात म्हणाले, "बाळ या कागदाचा रंग कोणता आहे?"
"लाल!" रावबहाद्दुरांचा आनंद गगनात मावेनासा झाला. मुलीने रंग बरोबर ओळखला होता. तीला पोटाशी धरून सद् गदित स्वरांत उद् गारले, "आली! माझ्या बाळीला परत दृष्टी मिळाली." आनंदाने ते हसू लागले आणि डॉक्टरांना त्यानी कडकडून मिठी मारली-

प्रा. सहस्त्रबुध्दे यांची ही गोष्ट सगळे विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकत होते. एक विद्यार्थी मोठ्यांने हसला. सहस्त्रबुध्दे म्हणाले, "कां रे? हसंलास कां?"
तो विद्यार्थी म्हणाला, "या गोष्टीत एक मोठी विसंगती आहे!"

विसंगती आहे खरीच! कोणती? हे तुमच्या ध्यानांत आलें आहे काय? मग बघा विचार करा.

विषय: 
प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

-मुलगी सहा महिन्यांची असताना आंधळेपण आले. सहा महिन्यांच्या बाळाला रंगांची नावे कशी समजतील व ते बाळ ती कशी लक्षात ठेवेल? समोर दिसत असलेल्या वस्तूच्या रंगावे नाव काय ते ती सांगू शकणार नाही.

काहीच बोलायला नको होते. काय आहे ते पण सांगितले नसते, तर ती मुलगी, दिसल्यावर बाबांच्या हातात कागद पाहून , "बाबा, हे काय आहे ? " म्हणेल Happy असे मला तरी वाटते. Happy

छान गोष्ट! Happy
विसन्गतीचे उत्तर तर आधीच बर्‍याच जणान्नी दिले आहे Happy
पण, त्या विसन्गतीआधीच, जर्मन डॉक्टर त्या मुलीशी कोणत्या भाषेत बोलला हे जाणुन घेणे मला अधिक महत्वाचे वाटते. कारण, डॉक्टरने विचारलेला प्रश्न समजायला ज्या जर्मन वा इन्ग्रजी भाषा अवगत असणे आवश्यक आहे ते दहा वर्षाच्या आजकालच्या मुलान्ना तरी अवगत अस्ते का? त्यामुळे मूळात असा काही संवाद घडला असणेच अशक्य. (अन घडलाच तरी डॉक्टर डायरेक्ट "रन्ग" विचारणेही अशक्य.)

मुलीला दिसु लागले असते तर तिला कागद दाखवेपर्यंत ती थांबणारच नाही. पट्टी काढल्याबरोबर तिला जे कांही समोर दिसेल ते तिच्यासाठी अद्भुत असणार त्यामुळे तिने कांहीतरी उस्फूर्त प्रतिक्रीया देऊन तिला दिसत असल्याचे नोंदविले असते. समजा तिला शब्दात व्यक्त करता आले नसले तर चेहर्‍यावरच्या भावात तरी ते स्वच्छपणे व्यक्त झालेच असते असे मला वाटते. तरीही या कथेचा शेवट ' आणि तिला दिसू लागले!' असा ऐकायलाच मला आवडेल.

खरी विसंगती ही कि विनय सहस्त्रबुद्धे हे चाणाक्ष आहे असं म्हटलंय. एक विनय सहस्त्रबुद्धे माहीत आहेत , ते ठाण्याला असतात आणि ते जर्मनीला गेले नाहीत कधीच.
जन्मजात आंधळ्याची एक गोष्ट ऐकली होती असलीच.

?