Submitted by सतीश देवपूरकर on 18 April, 2012 - 11:17
गझल
वाटले की, पाय मजला नेत होते....
चालताना साथ रस्ते देत होते!
गुणगुणू मी लागलो अन् गीत झाले;
कोण जाणे, कोण स्फूर्ती देत होते!
त्या दिशेने पौर्णिमा गेली असावी....
जागजागी चांदणे वाटेत होते!
अस्थिकलशाची निघाली धिंड माझ्या....
काय माझ्या नेमके राखेत होते?
बंद झाले दार एकेका घराचे;
रंग कोणाचे तुझ्या गझलेत होते?
झेप गरुडाची तिथे नव्हती कुणाची;
लोक मुंग्यांसारखे रांगेत होते!
कैकदा ठेचाळताना वाचलो मी,
दीपस्तंभांचे अघोरी बेत होते!
ह्याचसाठी काय झाला बोलबाला?
मी पिढ्यांचे मोडले संकेत होते!
ही कशी आली दिशांची झुंड दारी?
काय ऐसे माझिया हाकेत होते?
पाहिले मी कोरडे डोळे स्मशानी;
लोचनी माझ्याच अश्रू येत होते!
-------प्रा. सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१
गुलमोहर:
शेअर करा
पाहिले मी कोरडे डोळे
पाहिले मी कोरडे डोळे स्मशानी;
लोचनी माझ्याच अश्रू येत होते! >>. क्या बात है! खुप सुंदर!
सर्व शेर आवडले... मस्तच!
त्या दिशेने पौर्णिमा गेली
त्या दिशेने पौर्णिमा गेली असावी....
जागजागी चांदणे वाटेत होते!
नजाकत आवडली .
अप्रतिम गझल, प्रत्येक शेर
अप्रतिम गझल, प्रत्येक शेर आवडला, अभिनंदन व धन्यवाद या गझलेसाठी
अप्रतिम ... अफाट! सगळेच शेर
अप्रतिम ... अफाट!
सगळेच शेर सुपर्ब!
सुंदर!!!!
सुंदर!!!!
त्या दिशेने पौर्णिमा गेली
त्या दिशेने पौर्णिमा गेली असावी....
जागजागी चांदणे वाटेत होते!
झेप गरुडाची तिथे नव्हती कुणाची;
लोक मुंग्यांसारखे रांगेत होते!
ही कशी आली दिशांची झुंड दारी?
काय ऐसे माझिया हाकेत होते?
हे तीन शेर खूप आवडले, बाकी गझलही मस्त!
अप्रतीम गझल....सर्व शेर
अप्रतीम गझल....सर्व शेर नितांतसुंदर
स्फूर्ती देत होते .....या
स्फूर्ती देत होते .....या शेरात 'देत होते' हा शब्दसमूह रदीफ असल्याचा भास होतो............
पण बाकीच्या शेरांप्रमाणे वाचल्यास 'देत' हा काफिया म्हणून समोर येतो ; तरीही मतल्यात तो वापरला गेला आहे म्हणून इथे दुसरा काफिया असता तर रंगत वाढली असती असे वाटून गेले ...............
बाकी गझल नेहमीप्रमाणेच अप्रतिम केली आहे आपण
वाटले की, पाय मजला नेत
वाटले की, पाय मजला नेत होते....
कोण जाणे, कोण स्फूर्ती देत होते!
अस्थिकलशाची निघाली धिंड माझ्या....
चालताना साथ रस्ते देत होते!>>>
हे combination कसे वाटते