अबब!!! मायबोलीवरील लांबलचक पोष्टी!

Submitted by हर्ट on 18 April, 2012 - 04:29

अलिकडे मायबोलीवरील लांबलचक पोष्टींचे लिखाण वाढतच चालले आहे. लोकांना इतका वेळ आणि उत्साह कुठून येतो कळत नाही. लांबलचक पोष्टी लिहिणार्‍या बहुतेकांच्या पोष्टी वाचून वेळ वाया गेला असे वाटायला लागले कारण फारच थोडे जण लांबलचक लिहून महत्त्वाचे लिहितात. जी लोक नेहमी अशा पोष्टी लिहितात त्यांना हे कळत नाही का की ते इतरांचा आणि स्वतःचा किती वेळ नष्ट करत आहेत? एक पाच-दहा ओळीत आपले मत मांडता येत नाही का? जर इतके मोठमोठे उतारे मत आणि भावना व्यक्त करण्यासाठी जर इथे कुणी अभिप्राय म्हणून लिहित असेल तर ती व्यक्ती नक्की लेखक होण्यास पात्र आहे असे समजून त्यांनी मायबोलीवर साहित्य लिहावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<<<<<मास्तुरेंना धरा पहिले>>>>>>>> Rofl

<<<येथे काही गाजलेल्या लांब पोस्टी टाकायची कल्पना कशी आहे>>>>>>>+१

<<<<मला भाषानिरपेक्ष झोप लागली >>>>>>>>>>:-D

<<<<<<<<<अरे बी, तुला काय प्रॉब्लेम आहे? लिहू देत की लोकांना! वाचणारे वाचतील, न वाचणारे (माझ्यासारखे) सोडून देतील. हा पब्लिक फोरम आहे, जोपर्यंत कुणी फोरमच्या नियमांचं उल्लंघन करत नाही तो पर्यंत त्यांना काही म्हणण्याचा हक्क कुणालाही नाही असं माझं मत आहे. टिव्ही सिरीयल बोअर झाल्या म्हणून तू चॅनेलवाल्यांकडे तक्रार केली होतीस का कधी? आणि केलीस तर तुझ्याकडे ते लक्ष देतील का?>>>>>>>>>>>> +१

<<<<<<<<<मला जे काही सांगायचे आहे ते मी अगदी थोडक्यात व पाल्हाळ न लावता सांगणार आहे.

लांबलचक प्रतिसादांवर श्री. रा. रा. 'बी' का क्रोधित झाले आहेत ते समजले नाही. प्रचंड व्यासंग व अभ्यास असल्याशिवाय लांबलचक प्रतिसाद लिहिता येतील का?

लांबलचक प्रतिसाद लिहिणे ही एक कला आहे. खूप मेहनत करूनच हे कौशल्य मिळवावे लागते. लांबलचक प्रतिसाद लिहिण्याचे तोटे काहीच नाही व फायदे अनेक आहेत, ते येणेप्रमाणे -

(१) व्यासंगी व अभ्यासू अशी आपली प्रतिमा निर्माण होते.

(२) लांबलचक प्रतिसादामध्ये मूळचा विषय आपल्याला पाहिजे तेव्हा व पाहिजे तसा भलतीकडेच भरकटत नेता येतो.

(३) लांबलचक प्रतिसादामध्ये इतके मुद्दे लिहिलेले असतात की त्यातल्या बर्‍याच मुद्द्यांचा प्रतिवाद केवळ वाचण्याच्या आळसामुळे बरेच जण करूच शकत नाहीत.

(४) लांबलचक प्रतिसाद एकदा लिहून नंतर थोड्या थोड्या वेळाने एडिट करत राहिले तर त्यात नक्की काय बदल केले हे बहुतेकांना शोधून सुद्धा सापडत नाही.

(५) लांबलचक प्रतिसादामुळे एकाच वेळी अनेकांना गोंधळून टाकता येते आणि यातच लेखकाचे यश सामावलेले असते.

(६) लांबलचक प्रतिसाद लिहिताना भरपूर वेळ सत्कारणी लावता येतो.

(७) लांबलचक प्रतिसाद पाहिल्यावर त्यात काहीतरी खूप महत्त्वाचे लिहिले आहे असे समजून त्यावर वाचकांच्या उड्या पडतात.
.
.
.

असो. बहुत काय लिहिणे. मला जे काही सांगायचे होते ते वर अगदी थोडक्यात व पाल्हाळ न लावता सांगितले आहे.

* हा प्रतिसाद दर १० मिनिटांनी एडिट करण्यात येणार आहे. त्यात नक्की काय बदल केला आहे ते जाणकारांनी शोधून काढावे.>>>>>>>>> Rofl Lol

* हा प्रतिसाद दर १० मिनिटांनी एडिट करण्यात येणार आहे. त्यात नक्की काय बदल केला आहे ते जाणकारांनी शोधून काढावे.>>>>>>>> Rofl Rofl Rofl

धाग्याचे शीर्षक आणि ६३ प्रतिसाद बघून धागा वाचायला घेतला
आणि भ्रमनिरास झाला
वाटलं होतं आत्तापर्यंत दोन चार तरी मुडदे पडले असतील..

अरे काय हे बी ? कुणी कुणाशी भांडु नये हे तू सांगावेस? अरेरे ! परमेश्वरा !!! हा बी अजूनही छोट्टेसे बीच राहिला? याचा वृक्ष वटवृक्ष नाही झाला? अरे असे नका करु, याच्या विचारांना नका इतक्यात आवरु.

जरा खत, पाणी घाला, कलमे करा, म्हणजे वाढा-पसरायला, फोफावायला याला वेळ मिळेल.

ती जुनी मायबोली वाचा शब्दार्थ बाफावरची, म्हणजे कळेल, बी चे जीवशास्त्र व रसायनशास्त्र.

>>> वाटलं होतं आत्तापर्यंत दोन चार तरी मुडदे पडले असतील.. <<<< Lol कुणाचे? Wink कुणी पाडले अस्ते?
असो.
तर बर्का बी,
जी व्यक्ति (म्हणजे तूच असे नै बर्का) केवळ स्वतःपुरता विचार करते/तेवढाच करू शकते, ती अस कितीकसं लिहीणार, अन लिहील तरी त्यात्या व्यक्तिच्या वैयक्तिक अनुभवविश्वातलच ते लिहीलेल असणार, ते वाचायला कुणाला सवड असणार?
मोठ्या मोठ्या पोस्टी लिहायला केवळ स्वतःचेच नव्हे तर जगाबद्दलचे सम्यक ज्ञान असायला लागते, नसेल तर केवळ इम्याजिनेशनवर स्वप्रतिभेवर निर्माण करायला लागते.
आता हे बघ, की कापडावर (वा कपड्यावर) केवळ वैयक्तिक अनुभवातुन लिहू पाहिल्यास एकाददोन वाक्यात (अन अंतर्वस्त्रासहित दोनचार कपड्यातच) खेळ खल्लास होतो. पण तेच जर जगात एकुण लोकसन्ख्या किती, ती झाकायला किती लक्ष चौरस फूट कापड लागेल, त्याकरता किती सिन्थेटीक वा नैसर्गिक मटेरिअल लागेल, ते कुठे उपलब्ध आहे, त्यापासुन कापड, अन पुढे कपडा कोण कसा तयार करते/करेल, कितीजणान्ना रोजगार उपलब्ध होईल इत्यादी विचार तुला काय एखाददोन वाक्यान्च्या पोस्टीत हवेत का?
बायदिवे, त्यातुनही, जगातील इतक्या अब्ज लोकसन्ख्येला इतके अब्ज चौरसफूट कापड बनवायला जो काय इतका पैका म्हणा वा सम्पत्ती म्हणा वा नैसर्गिक साधनसामुग्री म्हणा खर्च होते, तर तो खर्च टाळायला कपडे घालण्याची मानवाची खर्चिक व निसर्गाचा र्‍हास करणारी सवय घालवायला तितक्याच तोडीच्या शब्दवैभवाच्या पोस्टी नकोत का? Wink एखाददोन वाक्यात ते कसे शक्य आहे?
नै, माझ म्हणणं काय हे की केवळ वैयक्तिक आयुष्यात स्वतःच्या पावलापुरत्या स्वतःच्याच सावलीचा विचार केला तर तुझ म्हणण पटत की हव्यात कशाला इतक्या मोठ्या पोस्टी! माणसाला लागतच काय अस जगायला? दोन वेळच अन्न, उनवार्‍यापासुन संरक्षणाकरता वस्त्र अन निवारा! ते मिळविण्यापुरत्या आलेल्या अनुभवाचे चार शब्द लिहीले तर लिहावेत, नै लिहीले तरी उत्तम! नै का?
बाकी तुझा मुद्दा केवळ माबोवरच्या दीर्घ पोस्टिन्पुरताच मर्यादित आहे असे नाही बर्का! साध बघ, ते इन्स्टन्ट गायक अस्तात ना? रेल्वेमधले नाहीत रे..... ते एखाद दोन वाक्यच म्हणतात आख्ख कडव देखिल म्हणत नाहीत, अन तरी लग्गेच हात पुढे पसरताअत Proud तर मी सान्गत होतो ते म्हणजे दीड ते साडेतिन मिन्टात गाणे म्हणणारे... अन त्याच्या विरुद्ध ते बघ, त्या सवाई मधे वगैरे तासन्तास आळवत बसणारे! आता काही जण म्हणतातही, की अस्ल रागधारी की फागधारी गायन हवच्च कशाला? कुणाला वेळ आहे तासन्तास ऐकत बसायला? नै का? पण शिन्च्या लोकान्नाही अक्कल नावाचा प्रकारच नसावा (बहुधा देवाने सगळी तुलाच तर देऊन नै ना टाकली? Wink ) त्या सवाई गन्धर्वला शेपाचशेची तिकीटे काढून रुपये खर्चुन तासन्तास ऐकायला जाऊन बस्तात! येड्चापच ते, नै का? असो.
तर विषय काय की, लोक इतक्या लाम्बलचक पोस्टी टाकताच का, अन वाचणारे खरच वाचतात का? अन किती वेळ त्यान्चा वाया जातो, एकुण देशाचे किती उत्पादनशक्ती वाया जाते.... खरच गम्भिर प्रश्न आहेत रे हे. असेच लावुन धरले तर इन्टरनेट सेवेवर बन्दी देखिल आणता येईल.
मग काय बी? उघडायचा का त्यावर एक बीबी? Proud

अहो बेफिकीरभौ, मला खरच वेळ होत नाहीये हो Sad नैतर बीने मान्डलेला विषय खरच गम्भिर अन सर्व जगालाच ग्रासुन राहिलेला आहे असे मला वाटते.
बघाना, दीर्घ तासन्तास आलापीची/गायनाची ती शास्त्रीयगायन कला घ्या किन्वा वर्षानुवर्षे चालणार्‍या टीव्ही मालिका घ्या.
लाम्बलचक न सम्पणारे रस्ते घ्या वा नौवारी पातळ्/धोतर घ्या... Proud
हातातभर लाम्बीचे केसान्चे शेपटे घ्या किन्वा (तोन्डाला गुन्डाळलेली नसल्यास) अस्ताव्यस्त उडणारे लाम्बलचक दुपट्टे/ओढण्या/स्क्रोल्स घ्या
इतकुस्स आयलव्हयू सान्गण्यासही तावतावभर लिहीलेली प्रेमपत्र घ्या वा चारपाचशे पानापेक्षा कमी नसणारी कायद्यान्ची पुस्तके घ्या
हॉस्पिटल्स्/इमारतीतील लाम्बलचक क्यारिडॉर्स घ्या वा अन्तच नसल्यागत भासणारे रेल्वचे लोहमार्ग घ्या
तोन्डात ओढुन ओढून दमवणारी अळीसारखी नूडल्स/शेवया घ्या किन्वा नैतर लाम्बलचक ट्युबलाईटची नळी घ्या...
साल जिकडे तिकडे लाम्बच लाम्ब, मोठ्यात मोठ्या अशा बाबीन्चच प्रस्थ! मग इलुश्श्या बीने करायचे तरी काय? उगाच नै ते कोणससं म्हणून गेलय, लहानपण देगा देवा! या बी ला ते बरोब्बर कळलय, म्हणुन तर म्हणतो तो की पोस्टी लहान करा. हो नारे बी?

भरत, ती लक्षणे मी लिहीली आहेत त्यामुळे विचारतो Happy - "२" ठीक आहे, पण ३ व ४ कशी काय? त्या चेंज बीबीवरच्या एखाद्या रॅण्डम पानावारच्या रॅण्डम पोस्ट मधला रॅण्डम मजकूर मी उचलून मग >>>> केले तर लोकांना कळणार आहे का? तसेच ४ चे.

बी:

मस्त धागा. फक्त अपेक्षित गुद्दा-गुद्दी दिसली नाही.
असाच एक धागा दोन ओळीच्या पोस्टी टाकून काड्या करणार्‍या पोस्टींबद्दल पण टाक ना? खूप उदाहरण धार्मिक धाग्यात मिळतील.

आँ..कोण म्हणाल जामोप्या? उगाच कोणाची नाव घेउ नका.

जामोप्या दिवे घ्या बर का!

Pages