असावा सुंदर पापलेटचा बंगला...

Submitted by सत्यजित on 8 September, 2008 - 13:00

आता श्रावण संपला, आणि नारळी पोर्णिमा पण झाली आता रहावत नाही हो... गणरायांना निरोप देताच घराघरातुन तळलेल्या माशांचा आणि तिरफळं घातलेल्या कालवणाचा तो घमघमाट उठेल आणि मन लहान होउन गाउ लागेल ...

असावा सुंदर पापलेटचा बंगला
चंदेरी रुपेरी सुरमईचा चांगला

पापलेटच्या बंगल्याला सारंग्याचे दार
धार धार डेंग्यांच्या कुर्ल्या पहारेदार

गोल गोल कोळंब्यांच्या खिडक्या दोन
हॅल्लो हॅल्लो करायला लॉबस्टरचा फोन

मांदेल्यांचा सोनेरी रंग छानदार
बांगड्यान्ना अंगभर खवले फार फार

बंगल्याच्या छतावर कालवा रहातो
शिंपीतल्या तिसर्‍यांशी लपाछपी खेळतो
लांब लांब करल्यांचा नाच रंगला
बोंबलाचा मासा मस्त चांगला...

कित्ती कित्ती चविचा पापलेटचा बंगला
सोलकढी भातासंगे मस्त हाणला...

-सत्यजित.

गुलमोहर: 

कित्ती कित्ती सुदंर तुम्हची कविता.

हे गाणे मला फार फार आवडते. त्यातच तुम्ह्ची ही कविता भरपुर छान वाटली.

अरेच्या, मी पण हे वाचलंच नव्हतं... सत्या, आता तू सगळ्यांना घरी बोलावून खायला घाल हे सगळे मासे.. शिक्षा तुला हे इथे लिहिण्याची Happy

कित्ती कित्ती चविचा पापलेटचा बंगला
सोलकढी भातासंगे मस्त हाणला...>>> लाळ टपकायला लागली लेका !!

जबरी कविता !! अगदी खाल्लंस !! Lol

सत्यजीत,

मी मासे खात नाही पण ऐकलेल्या नावांचा संदर्भ घेउन वाचायला मजा आली.
चाल अगदी पर्फेक्ट आहे.

सही हैं सत्याभाय!

अरे मस्तच लिहिलय.. मला कधी सुचलच नाही (खाणे सोडता माश्यांबद्दल दुसरे काही सुचतच नाहि तसेही मला)!

मी पण इथे येताना मटण सुखा करून, सुके बोंबिल, सुकट, जवळा सगळे निगुतीने पॅक करुन, हवाबंद करुन आणलेय. फक्त चेक इन बॅगेत घातले होते. Happy कोणीही येणारे जाणारे असले की आई हे पॅक्स पाठवतेच!

सत्यजित खुपच चविष्ट!!!
शाकाहारीनी काय कारावे Sad

**********************************
लोग कहते थे की ओ मेरे जनाजे पे रोये नही !
मुझे तो खुशी इस बात की,की हमने उन्हे आख्रीर तक रुलाया नही|
गणेश कुलकर्णी (समीप) ९७६४७७३२५७, पुणे-२७
**********************************

अगदी झक्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्ककास.
मस्त मला भुक लागली वाचुन.
खरच शाकाहारी लोकांनी आयुष्यच एन्जोय नाही केल अस मला वाट्तेय. कारण मांसाहारी मध्ये जी मज्जा आहे नि ताजच्या सुपर डुपर स्पेशिअल वेज थाळित पण नाही आहे. ताज का वेज एक तरफ और धाब्बे का भरा हुआ फिश एक तरफ मै तो हमेशा धाब्बा ही प्रेफर करुंगी.
आ हा हा.....मुआआआआ.

East aur West NON-VEG is BEST.

Pages