बंडखोरी...!

Submitted by बागेश्री on 18 April, 2012 - 00:10

वावरणारा प्रत्येक मनुष्य,
एक ठिणगी!!
प्रत्येकात एक ज्वाला,
खोल आत दडलेली,
अवकाश निव्वळ ठिणगीने पेट घेण्याचा,
भडका ठरलेलाच!

अश्या लाखो ठिणग्या,
अवती-भवती वावरणार्‍या...
अचानक सगळ्यांनी पेटून उठावं
एकेच दिवशी, एकाच वेळी...!
मग,
ह्या पृथ्वीला, इतर ग्रहांना, आकाशगंगेला-
ह्या प्रचंड उर्जेचा भार पेलवेल??

आकाशाची पृथ्वीशी असलेली
क्षितीजावरची घट्ट वीण, उसवेल ताडकन!
आणि झेपावेल पृथ्वीच, आकाशगंगेबाहेर!

तिचा नवा सूर्य शोधण्याकरिता...!!

गुलमोहर: 

ही कविताही आवडली. खयाल छान आहे.

एकदम आकाशाशी संबंध लावलेला पाहून काही क्षण घुटमळलो.

<<ह्या पृथ्वीला, इतर ग्रहांना, आकाशगंगेला-
ह्या प्रचंड उर्जेचा भार पेलवेल??>>

या ओळींमुळे 'अरे, हे काय आता' असे मनात आले. मग तो विचार 'नवा सूर्य' या शब्दापाशी अंतर्धान पावला.

छान कल्पना!!! सध्याच्या कुठल्याही परिस्थितीला लागू ठरावी अशी. आवडली कविता Happy

जरा वेगळ्या विचारावर वेगळ्या धाटणीची होती ही कविता, जराशी बिचकतच पोस्ट केली, पण उत्स्फुर्त प्रतिसाद पाहून फार बरं वाटलं..
प्रतिसाद देणार्‍या सार्‍यांची आभारी आहे. Happy

आणि झेपावेल पृथ्वीच, आकाशगंगेबाहेर!
तिचा नवा सूर्य शोधण्याकरिता...!!>> सही ! आवड्ली !