टाकीचे घाव...!!!

Submitted by MallinathK on 17 April, 2012 - 13:31


गेल्या महिन्यात श्रीशैलला
जाण्याचा योग आला. वाटेत कोणत्यातरी गावी आम्ही थांबलेलो (गावाचं नाव लक्षात नाहीय
आता. Sad ) जिथे गाडी थांबवलेली होती, तिथेच शेजारी काही मुर्ती दिसल्या.

उत्सुकेपोटी थोडं पुढं
गेलो तर पाहीले की दुकानाच्या मागेच मुर्ती टाकण्याचं काम चालु आहे. मग न राहवुन त्यांच्याशी
बोललो. Happy त्यांनीही मनमोकळेपणानं माहीती दिली. Happy

एका पेक्षा एक मुर्ती
घडवल्या होत्या. काहींचं काम चालु होतं, तर काही पुर्णावस्थेत होत्या. काही मुर्त्यांना
शेवटचा हात चालु होता.

त्यातलंच एक शिल्प....

मी फोटो घेउ का विचारल्यावर
त्यांनी स्वतःहुन एक मुर्ती दाखवली.  ती द्वारपालची
मुर्ती होती. आजुबाजुला पडलेला कचरा साफ करुन मुर्ती सुद्धा स्वच्छ करुन दिली. Happy

   

नुकतीच पाउसाची सर
येउन गेल्याने मुर्ती निट दिसत नव्हती. त्यांना मुर्तीवर थोडं पाणी टाकता का विचारल्यावर
त्यांनी पळत जाउन बादलीभर पाणी आणलं आणि मुर्तीवर ओतलं. मुर्तीची सुबकता मला शब्दात
नाही मांडता येणार. तुम्हीच पाहून घ्या....

द्वारपालचा हा दुसरा
जोडीदार... यावर पाणि टाकले नसल्याने मुर्ती पांढरी दिसतेय.

मुर्ती कोरण्यासाठी
हव्या असलेल्या आकाराचा अखंड खडक शोधला जातो. ज्या आकारात मुर्ती कोरायची आहे त्या
आकारात त्याला छाटले जाते. नंतर मुर्तीचे अवयव ढोबळ पण मापात कोरले जातात. त्यासाठी
नको असलेला भाग छाटण्याकरीता कटरचा वापर करता.

अगदीच सुरवातीच्या
स्टेज मध्ये असलेली आणखीण एक मुर्ती ...

नंतर त्यावर छन्नी
हातोडी वापरुन आकारांना समरुपकता देता.

जशी जशी मुर्ती आकार
घेत जाते, तसं तसं त्यांचं काम मंदावतं, जोखीमीचं आणि नाजुक होत जातं. कारण चुकुन एक
छळका जरी उडाला तर ती पुर्ण मुर्ती बाद होते. त्याहुन वाईट म्हणजे आता पर्यंतचे त्या
मुर्तीवर घेतलेले कष्ट वाया जातात. Sad

इथे मला कागदावर काढलेल्या
चित्रांना निट कान डोळे काढता येत नाही, आणि या कलाकारांनी तर दगडाला देव पण दिलेले...
मी तर एक एक मुर्ती डोळ्यात साठवन्याचा केविलवाना प्रयत्न करत होतो.

अपुर्णावस्थेतील आंजनेयाची  मुर्ती. दक्षीणेकडे हनुमानाला आंजनेय म्हणतात.
Happy

आणि हि पुर्णावस्थेतील...

दगडी खांब कोरताना.

खांबावरील नक्षीतर
पाहण्याजोगे होते. एक छोटासा गणपती, एक मोर असं खुप काही होतं.

शेजारीच एकजण बालाजीच्या
मुर्तीचं काम करत होता. एक्दम तंद्रीत काम चालु होते त्याचे, मी फोटो काढतोय हे लक्षात
आल्यावर तो काम सोडुन उभाच राहीला. मलाच शरल्या सारखे वाटले. त्याला समजाउन सांगुन
त्याचं त्याचं काम चालु ठेवायला सांगितलं. तरीही तो, फोटो काढताना थोडं का होईना सरकुन
फोटो काढाय्ला वाव द्याय्चा. Happy

हे त्याच्या कष्टाचं
चिज.....

हे त्यांचा छोट्याश्या
दुकाना मागचं अंगण जिथे सागळं काम चालतं.

म्हणतात ना टाकीचे
घाव सोसल्या शिवाय देवपण येत नाही. इथे तर देव देवतांसोबत इथे काही राजकारणीही आकार
घेत होते Wink

स्टोन कटर.. (चित्रात
मागे ट्रॅक्टर दिसतो, त्यावरुन कटरच्या साईजचा आंदाज घ्यावा. Happy )

   

- मल्लिनाथ करकंटी.

इथे पुर्वप्रकाशीत.

गुलमोहर: 

शिल्पकला - सगळ्यात अवघड कला - एक घाव जरासा जास्त बसला तरी तोपर्यंत केलेलं सगळं काम संपलंच की...
सुरेख माहिती व सुरेख प्र चि ......

सुंदर फोटो. एक एक मुर्ती घडवण्यात रमलेले कलाकार आणि दगडातुन साकार होत जाणारी मुर्ती, या सार्‍यांचे दर्शन घडवल्याबद्द्ल अनेक धन्यवाद!>>>>>>>>+++१११

छान माहीती, छान फोटो! ! हे खरे कलाकार ! किती त्यांची मेहनत! पण आपल्याकडे कलेला किंमत नाही हेच खरे.

धन्स लोक.
त्या गावा बद्दल सांगणे कठीण आहे, तशी कामं करनारी खुपशी गावं लागलेली. तरी आठवलं तर नक्कीच इथे टाकेन.

राजस्थानात उदयपूर जवळ, राजसमंडी गावाजवळ संगमरवराच्या खाणी आहेत.
तिथे रस्त्याच्या दोन्ही बाजूने, जवळजवळ १८ किमी, संगमरवराचीच दुकाने आहेत.
तिथे संगमरवर आणि त्याच्या वस्तू खुप स्वस्त मिळतात. मूर्ती पण असतात.
(जरा चेहरेपट्टी वेगळी असते.) तिथे बायका घुंघट घेऊन काम करतात.
एकेका मूर्तीला, केवळ बोटावर चिंधी घेऊन पॉलिश करत असतात, तासंतास.

तिथून मी पोलपाट आणला होता. तो इतका सुबक आणि सुंदर आहे, कि तो वापरायचा
धीरच होत नाही. आईला आग्रह करुन तो वापरायला लावला. गेली ७ वर्षे तो आमच्या
घरात वापरला जातोय.

दिनेशदा, मी माऊंट अबुला गेलेलो तिकडेही बरेच संगमरवरी कारागीर पाहिलेत. Happy खरंच खुप मस्त मस्त मुर्ती, वस्तु पाहायला मिळाले. छोटे छोटे ताजमहलच्या प्रतीकृती, छोटे पेट्या वगैरे खुप छान होते. आणि विषेश म्हणजे परवडेबल होत Happy

तुकडा पडलेल्या प्रत्येक संगमरवर दगडापासुन काही न काही वस्तु बनवायचे ते.

वाटेत कोणत्यातरी गावी आम्ही थांबलेलो (गावाचं नाव लक्षात नाहीय आता.) >>>>>

नशिब परत यायचं लक्षात राहीलं, हा विसरभोळेपणा कधी जाणार बे तुझा? Wink

मस्तच.

नशिब परत यायचं लक्षात राहीलं, हा विसरभोळेपणा कधी जाणार बे तुझा?
कदाचीत सोबत सगळे होते म्हणुन आलो ( की आणलो गेलो) असेन Wink

धन्स विन्या, शै, जागु, उस्ताद आणि प्रज्ञा... Happy

Pages