स्वप्नास वास्तवाची लागू नये नजर;

Submitted by सतीश देवपूरकर on 17 April, 2012 - 11:47

गझल
स्वप्नास वास्तवाची लागू नये नजर;
झाला कळ्या फुलांचा बहरायचा प्रहर!

बांधून चाळ, वारा नाचे चहूकडे,
चौफेर गंध झाला, झाकू कसे बहर?

ऎकून गंध भाषा उठल्या दहा दिशा;
केला स्वत: कळ्यांनी उमलायचा गजर!

कोणी न तारतो वा कोणी न मारतो,
खणतो स्वत:च जो तो आपापली कबर!

झालो तुझ्या हवाली मीहून जीवना!
संजीवनी मला दे, वा दे मला जहर!!

दु:खेच सोबतीला आजन्म राहिली,
मी मोजली सुखाची किंमत किती जबर!

नसलो जरी उद्या मी तुझिया सभोवती,
देतील चंद्र तारे माझी तुला खबर!

जळते हयात तेव्हा कळते जरा गझल,
गझले मधे न कोठे वरवर कलाकुसर!

-------प्रा. सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

गुलमोहर: 

कोणी न तारतो वा कोणी न मारतो,
खणतो स्वत:च जो तो आपापली कबर!>> शेर छान

झालो तुझ्या हवाली मीहून जीवना!>> ओळ सुंदर

नसलो जरी उद्या मी तुझिया सभोवती,
देतील चंद्र तारे माझी तुला खबर!>> शेर छान

कोणी न तारतो वा कोणी न मारतो,
खणतो स्वत:च जो तो आपापली कबर>>>

शेर आवडला.

छान! Happy

_____/\_____
आपल्या गझल्या.. आणि आपण!!!

इथे दिग्गजांच्या पंक्तीत आणखी एकाची भर पडलीये... Happy

अप्रतिम........... खूप खूप छान....... Happy

इथे दिग्गजांच्या पंक्तीत आणखी एकाची भर पडलीये... +१

_____/\_____

आपल्या गझल्या.. आणि आपण!!!

इथे दिग्गजांच्या पंक्तीत आणखी एकाची भर पडलीये...
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>.

१००१% सहमत !!!

प्राजू +१!
मस्त खयाल एकेक!
वार्‍याच्या पायी चाळ बांधलीत>> काय सुंदर कल्पना! हा शेरच सुंदर!