जादू

Submitted by निलेश बामणे on 17 April, 2012 - 07:42

जादू

जादूभरी नजर तुझी खेचते मला तुझ्याकडे

सैरभैर होते मग मन माझे चोहीकडे

विश्वात भ्रमंती करणारे मन माझे तुझ्या नजरेत स्थिरावते

अहंकार माझा मी कोण आहे हे हि क्षणभर विसरते

फक्त तुझ्या नजरेला नजर देण्यासाठी माझी बुद्धी जगाशी बंड पुकारते

तुझ्या नजरेला नजर देताच माझ्या विचारांच्या पेटीलाही टाळे लागते

कधी न वळणारी मागे नजर माझी फक्त तुझ्यासाठी वळायला आतुर असते

नश्या तुझ्या नजरेतील ओसर्ण्यापुर्वीच तुझ्या चेहऱ्यातून ती पुन्हा चढते

फक्त तुझी नजर बंधना पलीकडे जाऊन मला विचार करायला भाग पाडते

तुझ्या नजरेला झेलण्याची ताकद फक्त माझ्याच नजरेत आहे असे वाटते

कवी - निलेश बामणे

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान