उगडा

Submitted by निलेश बामणे on 16 April, 2012 - 09:08

उगडा
सभोवतालचे जग पाहून
हल्ली माझ मन अशांतच असत
सर बदलाव क्षणात वाटत
जग वेडा पण मलाच म्हणत

असंस्कृत हि पिढी पाहून
हल्ली माझ मन अशांतच असत
तिज सुधाराव क्षणात वाटत
जग मूर्ख सार मलाच म्हणत

अनैतिक आज नाती पाहून
हल्ली माझ मन अशांतच असत
बंधने हवीत क्षणात वाटत
जग नालायक मलाच म्हणत

गरिबांचे त्या प्रश्न पाहून
हल्ली माझ मन अशांतच असत
उत्तर मिळावं क्षणात वाटत
जग उगडा ते मलाच म्हणत

कवी - निलेश बामणे

गुलमोहर: 
शब्दखुणा: