येर येर पावसा अस कोकलाताय माझ पोर

Submitted by प्रविण मारुती भिकले on 16 April, 2012 - 07:48

येर येर पावसा अस कोकलाताय माझ पोर
येर येर पावसा अस कोकलाताय माझ पोर

आभाळ मधीच होतंय काळ पण
पावूस काई येत नाई,
खंडाकावर मीठ चोळतोय बळीराजा
पर मलम मातुर कोणी लावत नाही.

आता किती ह्यो जीवाला लावायचा घोर
येर येर पावसा अस कोकलाताय माझ पोर

दिस सरतील तसं शिवार माझ जाळू लागलाय
अन करपणार पिक आता पाचवीला पुजल हाय,
पाण्याविना घशाला कोरड पडू लागली हाय
अन बिनपाण्यान जळणारी मडी अंत्यसंस्काराची रीतच बनली हाय .

जिकड तिकड दिसत्यात बिनपाण्याच बोर
येर येर पावसा अस कोकलाताय माझ पोर

पोराला नाय पाणी धोरला नाय पाणी अन पिकाला पण नाही पाणी
रडायचं ठरलं पण डोळ्यातलं पण आठलय पाणी.
७५ च्या सरकारण केलेलं हाल बर वाटाय लागल्यात
पण सोसणं झालेय वरून राजाची आणीबाणी .

पाणी पाणी करत मारताय एक एक ढोर
येर येर पावसा अस कोकलाताय माझ पोर

जाळणार वावर करपणार पिक नि वाढणार कर्ज
यात शेतकरी पुरता दाबून गेलाय
अंगणातल्या तुळशी वृदावनात
निवडुंग उगवू लागलाय

पिसारा फुलवून नाचणारा दिसेनासा झालाय मोर
येर येर पावसा अस कोकलाताय माझ पोर

सुकलेल्या पिंपळ वरच एक पण
व्याकील नजरेन आभाळाकडे पाई,
वडाला लोंबत त्यात फाश्या
पारंब्यांना इथ जगाचा नाही
आम्हीच वाढवलेली झाड तुटताहेत नजर समोर
येर येर पावसा अस कोकलाताय माझ पोर

धारण बांधायचं म्हणून जमिनी घेतल्या शेत गेली
सळ्यांनी गावच्या गाव उठवली
पार पाण्याची पाईप लाईन तर
कारखान्यात वळवली
आमच हक्कच पाणी पळवून सरकार भांडवलदार झालाय चोर
येर येर पावसा अस कोकलाताय माझ पोर

गुलमोहर: 

छाअन