बाबू बैन्ड बाजा

Submitted by संदीप आहेर on 14 April, 2012 - 05:21

बाबू बैन्ड बाजा

पहिलाच सीन प्रेतयात्रा ... विर्दभातील प्रथेनुसार वाजवत नेतात. वाजवणारे दोघे बाप नि मुलगा....प्रेत स्मशानात पोहचतं..... मुलगा वडिलांना विचारतो..... मी जाऊ का? कोठे जातो तर थेट शाळेत. ह्यांच नाव बाब्या ....... ज्याच्या वडिलांना वाटतं की यानेही त्यांच्यासाऱखंच वा़जंत्री व्हावं.......एक बाई घरोघरी फिरुन वापरलेल्या जुन्या कपड्यांच्या बदल्यात नवीन भांडी विकतेय....... ही बाब्याची आई......तीला वाटतं याने खूप शिकून मास्तर व्हावं. आजी जी दिवसभर बसून झाडू बनवते ती याने शाळेत जावं विचारांची.

पण विचार आणि परिस्थिती यात ताळमेळ कसा बसणार. दोन वेळ जेवायला महाग. त्यात ज्या लाडक्या पोराच्या नावाने बाबू बैन्ड बाजा चालू केलेला त्या बैन्ड ची सर्व बासनं (वाद्य) सावकाराकडे गहान. मग त्या बापालाही वाटतं की पोराने लवकरच दोन पॅसे कमवायला सुरुवात केलेलीच बरी. पण बाब्याची आई मात्र बाब्याला मास्तर करण्यासाठी झपाटून काम काम नि काम करत राहते.

बाब्याला शाळेचा ड्रेस ह्या ना पुढच्या मजुरीवर घ्यायचाच हा आईचा आट्टहास तर बाप त्याला बैन्डची शान म्हणून झगमगित ड्रेस शिवायच्या विवंचनेत..... इथं ड्रेसच्या कपड्याची पंचाईत. तिथं निरागस बाब्या दप्तर हरवतो....... झालं ...... वह्या पुस्तकं सगळचं गेलं...... (दप्तर हरवल्या नंतर ......... आता बाप कुत्र्यासारखं तुडवणार ....... ह्या संवादात बाब्याचे हावभाव अप्रतिम!!! .... ती भिती तो निरागसपणा)

कशीबशी (शाळेच्या ड्रेसच्या) चड्डी ची सोय होते. त्यात आता वह्या ...पुस्तक .....द्प्तर. आई आगतिक होऊन जाते पण बाब्या शाळेत गेलाच पाहिजे म्हणून जिद्दीने काम करतच राह्ते.

काय होतं मिळत का बाब्या दप्तर ?
आता परिस्थिती बदलणार म्हणता विचित्र वळणं येतात का, कशी?
बालभारतीच्या तिसरीच्या पुस्तकांची किंमत किती मोठी आहे?......... हे अनुभवायचं असेल तर हा सिनेमा बघाचं.
कलाकार तर आहेतच सिनेमा मध्ये पण दारिद्र्य ह्या घटकानेही मोठा रोल साकारला आहे.

वेशभुषा अप्रतिम ........ पटकथा त्यातील धक्के तीची गुंफन अतिसुरेख........पटकथा खरचंच खूप छान फुलवली आहे. गाव त्यातील माणसं राजकारणी मास्तर मान्यवर नि जातपात सगळचं परिणाम कारक रित्या चित्रित झालं आहे.........ईतर पात्र नि त्याचा परिणाम याचाही ताळमेळ छानच..... सर्वच कलाकारांनी सुंदर अभिनय केला आहे. बोहरीण बनून पाटी डोक्यावर बैलेन्स करत चालणं, वाद्य वाजवतानाचं एकंदर शरिराची हालचाल नि भाव आतिशय मेहनत लागली असणार ह्या सगळ्यासाठी. मला मात्र बाब्या आवडला.

आपण ज्या महाराष्ट्रात राहतो तिथंच ह्या सारख्या घटना वारंवार घडताहेत हे मात्र जिव्हारी लागतयं.

सिनेमाच्या बाहेरचं..........
मी व माझा मित्र दोघांनीच सिनेमा पाहिला आहे?........बिग सिनेमा....... तिकिट मागितल्यावर पोरगा फोन करायला गेला..... मला वाटलं ऊशिर झाला कि काय ३.१० झाले होते....... पण त्याने तिकिट दिल्या ....... आम्ही स्क्रिन शोधली .....आत गेलो फक्त दोघेच होतो......... कोणी़ फिरकलं नाही!

तीन राष्ट्रीय पारितोषिकं, इंदिरा गांधी ऑवार्ड, पुणे ईन्टरनैशनल फिल्म फेस्टिवल सगळीकडे गॉरव झालेला सिनेमा फक्त नि फक्त स्टार व्हल्यु नसल्याने रिकामं थियटर ..........हे ही जिव्हारी लागतयं.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@नीधप-

पुण्यामुंबईबाहेर मराठी सिनेमे जात नाहीत, यासाठी मीसुद्धा निर्माते/वितरक यांना जबाबदार मानलेले नाहीच. 'प्रेक्षक मिळत नसावेत' या कारणाचा उल्लेख मीसुद्धा केलेला आहे.
सिनेमा थिएटरला लागलाच नाही तर प्रेक्षक कसे जाणार? प्रेक्षक येतच नाहीत तर आम्ही सिनेमा का लावावा? असे हे एक दुष्टचक्र आहे. ते कुठेतरी तोडावे लागणार, एवढेच मला म्हणायचे आहे. माझ्या गावात चांगले मराठी सिनेमे आले, तर मी नक्की पाहणार. दरवेळी तेवढ्यासाठी पुण्याला जाणे मला शक्य नाही. पण असा आवर्जून मराठी सिनेमा पाहण्याला उत्सुक असणारा 'मी' ही मायनॉरिटी आहे, हेही कबूल. Happy

------------

@फारेन्ड- 'वर्ड ऑफ माऊथ' किंवा नुसती 'माऊथ पब्लिसिटी.'
'माऊथ टू माऊथ' असे एक रेस्क्यू ब्रिदींग असते. गंभीर/मरणासन्न अवस्थेतल्या रुग्णाला वैद्यकीय सेवा मिळण्याआधी काही वेळा द्यावे लागते. मराठी सिनेमाची अवस्था गंभीर आहे, असे तर तुला सुचवायचे नाही ना? Wink
तसे असल्यास ही फ्रॉयडीअन स्लिप म्हणावी लागेल.

थिएटरातच सिनेमे दाखवायचा अट्टाहास का?
उचित किंमत लावून अधिकृत डीव्हीडी ऑनलाईन वा दुकानांतून विकाव्यात वा कुठल्याशा वेबसाईटवरून डाऊनलोड करुन द्यावे. अशा सिनेमातच थोड्याफार जाहिराती घालून पैसे मिळवावेत.
अशा माध्यमातून उत्तम सिनेमे बघायची आणि त्याकरता पैसे द्यायची इच्छा असणारे हे सिनेमे बघू शकतील.

मोठ्या प्रमाणात प्रेक्षकवर्ग नसणार्‍या सिनेमांकरता हा पर्याय आहे.

शे.न (बर्‍याच दिवसांनी?) योग्य मुद्दा आहे. नेटफ्लिक्स सारख्यांशी डील करायला काय खर्च येतो (निर्मात्याला) कोणाला काही कल्पना आहे का?

Pages