Submitted by पुरंदरे शशांक on 12 April, 2012 - 02:44
घुमटातुनि आकाशीच्या
हुंकारत जातो वारा
झुंडीतुन कृष्णघनांच्या
बिजलीचा लख्ख पिसारा
आलापी पाऊस वेडा
द्रुतगतीने तोच तराणा
कडकडली थाप मृदंगी
मेघांचा घुमड घनाना
अंधार जरी गपगार
टपटपती चुकार थेंब
सांभाळत ओटीपोटी
रसरसते हिरवे कोंभ
बहुरुपे तेज प्रकटते
घुमटातुन आकाशीच्या
रंगात गंध मिसळले
रसभरल्या वसुंधरेच्या...
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
कालच्या (१८ जून) दृपालच्या
कालच्या (१८ जून) दृपालच्या गडबडीत ही रचना कुठे गायब झाली कोण जाणे.....
सुंदर, कोमल कविता
सुंदर, कोमल कविता
घुमटातुनि आकाशीच्या हुंकारत
घुमटातुनि आकाशीच्या
हुंकारत जातो वारा
झुंडीतुन कृष्णघनांच्या
बिजलीचा लख्ख पिसारा.....
- - - | - - - -
हिच लय पुढे राहिली असती तर अजून मजा आली असती
श्री. पुरंदरेजी कविता खुपच
श्री. पुरंदरेजी कविता खुपच छान आहे. परंतू वरील शाम यांच्या मताला मी अगदी सहमत आहे.
अंधार जरी गपगार : - इथे गप्पगार असे असावे.
तशी काही ओळींमध्ये तीच लय शाबुत आहे, पण काही ओळीत ती हरवल्या सारखी वाटते.
कविता तुम्ही अगदी सुंदर लिहीली आहे, म्हणुनच माझं हे प्रामाणिक मत आहे. इतकच.
शाम व ऑर्फिअस - मी कविता
शाम व ऑर्फिअस - मी कविता करायला शिकतोय अजून - तुम्ही मंडळी जे म्हणताय ते लक्षात येतंय पण अजून नीट जमत नाहीये - तुम्ही कोणीही सुधारणा केल्यास माझी काही ना नाही....
तुम्ही सर्व जाणकार मंडळी जे अभ्यासपूर्वक मत मांडता याकरताच मला मा बो वर कविता पोस्ट कराव्याशा वाटतात. तुमच्या अशा प्रामाणिक मताचीच मला अपेक्षा आहे, अशातूनच मला शिकता येईल.
सर्वांना मनापासून धन्यवाद......
"आलापी पाऊस वेडा द्रुतगतीने
"आलापी पाऊस वेडा
द्रुतगतीने तोच तराणा
कडकडली थाप मृदंगी
मेघांचा घुमड घनाना " >>> .... छान
पावसाचं वर्णन चांगलं जमलंय.
"रंगात गंध मिसळले
रसभरल्या वसुंधरेच्या..." >>> या ओळी मस्त.
छान आहे, आवडली.
छान आहे, आवडली.
कविता म्हणजे कवीच्या
कविता म्हणजे कवीच्या आत्म्याचे 'प्रतिबिंब...!' ती जशी असते तशीच छान वाटते... त्यामुळे माझी अशी विनंती आहे की आपण इतरांच्या सांगण्यावरुन या कवितेत बदल करू नये... त्याने या कवितेतून मूळ कवीच हरवून जाईल... जाणकारांची मते पुढच्या वेळेपासून अंमलात आणावित...
चित्रदर्शी आहे
चित्रदर्शी आहे
सर्वांचे मनापासून
सर्वांचे मनापासून आभार.........