सुट्टीतील उद्योग "घर"

Submitted by विनार्च on 11 April, 2012 - 14:35

शाळेला सुट्टी पडून दोन दिवस नाही झाले तोपर्यंत "आई आता काय करू?" हा प्रश्न दिवसातुन हजारवेळा विचारुन, लेकीने माझा जीव नकोसा करुन सोडला. हिला कशात गुंतवता येईल याचा विचार करताना मला ज्योत्स्ना प्रकाशनचे "आर्ट अ‍ॅन्ड क्राफ्ट" पुस्तक हाती लागलं. त्यात दिलेल्या वस्तू तिच्या वयाच्या (आठ वर्ष) मुलांना सहज जमण्याजोग्या वाटल्या म्हणुन प्रयत्न करुन पाहीला. हे घर करताना तिला इतकी मजा आली की तिने घरं बनवण्याचा सपाटाच लावला आणि मला थोडा मोकळा वेळ मिळाला.
मायबोलीवर माझ्या सारख्या बर्‍याच आया (आईच अनेक वचन Proud ) असतील म्हणुन इथे ते घर बनवण्याची कृती फोटोसहित देत आहे आवडली तर ऩक्की सांगा मग पुढच्या उद्योगांबद्द्लही लिहिन (कारण आमचा एकदिवसाआड नविन वस्तू बनवण्याचा करार झाला आहे)
साहित्य :

2012-04-11 13.10.32.jpg

कार्डपेपरचा ६ बाय ६ इंचाचा चौरस कापून घ्या.
2012-04-11 13.13.22.jpg

त्याच्या पुढील फोटोत दिल्या प्रमाणे घड्या घालून घ्या.
2012-04-11 13.14.39.jpg2012-04-11 13.15.37.jpg2012-04-11 13.16.26.jpg2012-04-11 13.17.07.jpg

पुढील फोटोत दाखवलेल्या तुटक रेषा कात्रीने कापाव्यात.
2012-04-11 13.19.30.jpg2012-04-11 13.23.05.jpg

आता आर्कीटेक्ट्ला बोलवून दारं खिडक्यांची पोझिशन ठरवून घ्या. Happy
2012-04-11 13.24.59.jpg

नंतर सुताराला सांगुन दारंखिडक्या बसवुन घ्या. Happy
2012-04-11 13.29.06.jpg

आता रंगवलेल्या भागावर गम लावा.
2012-04-11 13.31.23.jpg

आता शेजारचा चौकोन गम लावलेल्या भागावर चिटकवा.
2012-04-11 13.33.17.jpg

आता हे असे दिसेल. त्याच्या रंगवलेल्या भागावर परत गम लावा व शेजारचा चौकोन दाखवल्याप्रमाणे त्यावर चिटकवा.
2012-04-11 13.37.20.jpg2012-04-11 13.39.40.jpg

हे झालं बेसिक घर तयार.
2012-04-11 13.44.47.jpg

आता छपराचं काम चालू करा.
2012-04-11 13.45.38.jpg

हे आपल घर छप्पर लावून तयार.
2012-04-11 13.58.17.jpg

आणि हा माझ्या लेकीने वसवलेला गाव (हे काम तिने स्वत:च्या कल्पनेने मी ऑफीसला गेल्यावर केलं)
2012-04-11 14.03.16.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कौतुकाबद्द्ल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद!
नलिनी, तुम्ही बनवलेल्या घराचे फोटो टाका ना इथे.
चित्रा, अक्षरी, सस्मित, अंजली, वृषाली, मेघा नक्की करुन पहा हे घर आणि इथे फोटो टाका.
रैना, सिंडी प्रयत्न करुन पहा खूपच सोप्प आहे हे "घर". हस्तकलेत माझी पण बोंबच आहे पण लेकीला दाखवायला जमलं मला म्हणुनच म्हणते आहे करुन पहा.

विनार्च, खूपचं छान! तू सगळ्या पायर्‍या इतक्या छान सचित्र समजवून सांगितल्या की मलाही आता हे घर सुटी नसतानाही करुन बघावेसे वाटते आहे.

खुप मस्त. सध्या आमच्या कडे फुलांचा कारखाना उघडला आहे. त्यातुन मन भरल ( खरं तर घरातले, आमच्या ऑफीसातले, माझ्या आईच्या घरातले आणि शेजार्‍यांच्या घरातले फ्लॉवर पॉट भरले की ) मग ह्या उद्योगाला लागणार असल्याचं कालच हे फोटो पाहुन जाहिर करण्यात आलेलं आहे. त्या मुळे पुढल्या आठवड्या पासुन ह्या लघु उद्योगाला सुरुवात होइल.

गाव बनवण्या साठी एका खोक्याची पहाणी नुकतीच पुर्ण करण्यात आली आहे.

नलिनी, घराला तोरण पण लावलंय, मस्तच गं! खिडकीतले पडदे पण रंगवता येतील.

मस्त टाईमपास दिलास विनार्च, लेकी बरोबर मला पण मजा येतेय हे करण्यात!

मोहन कि मीरा, तुमच्या फुलं बनवण्याच्या उद्योगाचा क्रॅश कोर्स आम्हालाही द्या म्हणजे आमच्या उद्योगात चांगली भर पडेल. ज्यांना ज्या गोष्टी (जे साधारण ५ते १० वर्षाची मुलं स्वतः करु शकतील) येत असतील, त्या कृपया ह्या ग्रुप मध्ये शेयर करणार का? (एकमेका साह्य करु अवघे धरु सुपंथ Happy )
अक्षरी, तुमच्या गावाचे फोटो नक्की टाक.

ऐ विनार्च्...वॉव.. मस्तच आहे उद्योग.. तो सूर्य किती आनंदाने हे गोड गोड घर पाहायला आलाय..
नलिनीचं घर ही क्यूट.. तोरण ही किती छान आहे..
Happy

मस्तच आहे... सूर्य, मोर, घरे खूप क्यूट वाटताहेत!!

असंच खेडेगावातील घरे ही दाखवू शकतो... केरसूणीच्या मागच्या काड्या चिकटवून भिंत व पुढील भागाचे छत..., खराट्याची काडी चिकटवून खुंटा त्याला दोर्‍याने बांधलेले गाय्,म्हैस्-बकरी पुट्ठ्यात कापलेले...
खाली हिरव्या रंगाने रंगवलेला भुसा... मध्येच बाटलीचा तळ कापून रंगवून मांडलेली विहीर... Happy

Pages