मी वर्तवलेले खरे भविष्य

Submitted by Mandar Katre on 11 April, 2012 - 06:23

Mandar Katre
विश्वसनीय सूत्रानुसार मेदिनी भविष्य वर्तवणांऱ्या ज्योतिषांचा इशारा-येत्या काही दिवसात भूकंप ,वादळ किंवा तत्सम नैसर्गिक आपत्तीतून मनुष्यहानी /वित्तहानी होण्याचा संभव!
Like • • Unfollow Post • Monday at 9:26pm
https://www.facebook.com/groups/damodargurujee.pratishthan/2765179390984...

मुंबईत जाणवले भूकंपाचे धक्के; ३.४ ची तीव्रता
11 Apr 2012, 1435 hrs IST
मुंबई शहरात बुधवारी दुपारी २.२० मिनिटांनी ३.४ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. मुंबईत माहिम, ओपेरा हाऊस आणि नरिमन पॉइन्ट भागात भूकंपाचे धक्के जाणवले. पश्चिम बंगाल, बिहार आणि चेन्नईतही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहे. इंडोनियाशियातील सुमात्रा बेट हे भूकंपाचे केंद्रबिंदू असून तिथे ८.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/

Forecast date-09 april 2012 @ 09.26 pm
Actual earthquake-11 april 2012.@2.20pm
40 hrs

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बर्‍या वाईट प्रतिसादाची प्रचंड स्तुनामी येणार आहे या धाग्यावर , असे भविष्य मी वर्तवावे का ? Happy

अमोल केळकर
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
मला इथे भेटा

>>नरिमन पॉइन्ट भागात भूकंपाचे धक्के जाणवले>>>>>>>>>>>खरं की काय? मला तर काहीच नाही जाणवले
मला तर इमारत पडली तरच समजेल. धक्के बिक्के नाही जाणवत मला

आजच म्हणे चेन्नईत देखिल भुकम्प जाणवलाय, काय बातमीहे?
मन्गळ अन शनि दोन्ही वक्री म्हणल्यावर...... एकन्दरीत अवघडच अस्ते.
असो.

मंगळ आणि शनी फक्त चेन्नई, इंडोनेशियातच का भारी ठरले? सगळ्ञा पृथ्वीवर का नाही भुकंप झाले.. ?

मुंबईत जाणवले भूकंपाचे धक्के; ३.४ ची तीव्रता
----- ३.४ ची तिव्रता असणारे हजारो धक्के पृथ्वीला दरवर्षी बसत असतांत. मोठ्या भूकंपांची (फुकुशिमा) तिव्रता जगांत सगाळी कडे जाणवते किंवा मोजता येते.

Forecast date-09 april 2012 @ 09.26 pm
Actual earthquake-11 april 2012.@2.20pm
40 hrs
------ भूकंप कधी होणार आहे हे अचुकतेने सांगता येत नाही. पुढचा भूकंप होण्याची वेळ आणि तिव्रता अचुकतेने सांगता येईल असे तंत्र आजही अस्तित्वात नाही आहे. एखाद्या भागाचा भौगोलिक इतिहांस बघुन कुठे भूकंप होणार आहे हे ठोबळपणे वर्तवता येते पण अगदी अचुकतेने नाही. भूकंप होणार आहे.... दहा तासानंतही किंवा २०० वर्षा नंतरही होईल. पृथ्वीच्या पोटांत अनेक हालचाली सुरु असतांत, भूकंप न होण्याचा काळ जेव्हढा मोठा तेव्हढी कंपनाची तिव्रता अधिक, त्यामुळे लहान लहान भूकंप होणे कमी हानी होण्याच्या दृष्टिने कधिही चांगलेच.

भूकंपा बद्दल अ‍ॅनिमेशन स्लाईड्स अधिक माहिती (विशेषत: लहानांसाठी).

http://news.bbc.co.uk/2/hi/4126809.stm

पुढील ठिकाणी थोडी अधिक पण शास्त्रिय माहिती मिळेल. डाव्याबाजूला भूकंपा विषयी नेहेमी मनांत येणारे प्रश्न (FAQ) आहेत.

http://gns.cri.nz/Home/Learning/Science-Topics/Earthquakes/Monitoring-Ea...

>>मी वर्तवलेले खरे भविष्य
हे धाग्याचे शीर्षक वाचले नि खालील शंकानिरसन आवश्यक वाटले.
'मी वर्तवलेले खोटे भविष्य' असाही कांही प्रकार आहे काय?

@ अमोल केळकर

तुम्ही गुरु या ग्रहाबद्दल दिलेली एकांगी माहिती कृपया बदला, वाचणारा झीट येऊन पडेल. आणी प्रचंड गैरसमज करुन घेईल. नाण्याला नेहेमीच दोन बाजू असतात. पत्रिकेत इतरही शुभ अशुभ ग्रह, ते कोणत्या नक्षत्रात आहेत, याचाही परिणाम पहावयाचा असतो. नुसता जुन्या ग्रंथांवरुन वाचुन भविष्य सांगु नका. तुमचे गुरु धोंडोपंत आपटे आहेत असे तुम्हीच सांगीतलेत ना, मग तुमचा ब्लॉग वाचला तर धोंडोपंत तुम्हाला पायताण घेऊन मारतील असे खोट भविष्य छापलेत म्हणून.

अर्ध्या हळकुंडांने पिवळे होऊन लोकांचे भविष्य सांगु नका, अर्धवट ज्ञान अतीशय घातक अन मारक असते.

फक्त अशा घट्नान्ची भविष्यवाणी कारणे........................
घटना झाल्यावर मी ती केली होती असे सांगत स्वतःची रिक्षा फिरवणे........................
यापेक्षा..................
जेंव्हा काही वाईट घडणार आहे हे समजेल तेंव्हा त्यावर काही उपाय आहे का ते सांगणे जास्त महत्त्वाचे आहे हा ज्योतिषशास्त्रातला मी अभ्यासलेला नियम आहे आणि तरच त्याला अर्थ आहे हे माझे ठाम मत आहे
तुमचा अभ्यास काय सांगतो ते माहीत नाही
कृपया स्वतःचा धंदा चालत नाही म्हणून मा. बो. वर जाहिरात करायाला येवू नये ही विनंती (फुकटात तर मुळीच नको )

>>'मी वर्तवलेले खोटे भविष्य' असाही कांही प्रकार आहे काय?<<
नक्कीच आहे दामोदरसुत त्यासाठी रोजच्या वर्तमानपत्रातील "राशीभविष्य" वाचत चला. Happy