Submitted by सुप्रिया जाधव. on 10 April, 2012 - 06:06
सक्काळपासूनचं मनात माझ्या
घालतोय हा थैमान खुळा !
दिनचर्येवर माझ्या नेहमीच
खुश्शाल फ़िरवतो अस्साचं बोळा !
पण पाठ सोडेल तर शपथ.....
...........मेला...हा..हा...हा कंटाळा !!!
सुट्टी-बिट्टीचे ज्यादा काम ?
अहो नाही लवकर उघड्त डोळा !
डोकंही होतं जड-जड
अकलेवरही लागतो टाळा !
पण पाठ सोडेल तर शपथ.....
...........मेला...हा...हा...हा कंटाळा !!!
दुपार मोठी...उत्साहाची खोटी,
बाहेर रिप-रिप पावसाळा !
संध्या दाटे...पै- पाहुणे....
चहा अन कॉफ़ीचं सतरावेळा !
पण पाठ सोडेल तर शपथ.....
...........मेला...हा...हा...हा कंटाळा !!!
-सुप्रिया.
गुलमोहर:
शेअर करा
छान
छान
मेला...हा..हा...हा कंटाळा
मेला...हा..हा...हा कंटाळा !!!>> हे वाचताना शिंक आल्याचा फील आला
मस्त गो! येन्जॉईड
याला तुम्ही काकाक म्हणताय हा
याला तुम्ही काकाक म्हणताय हा तुमचा मोठेपणा, नाहीतर अशा कवितांना साठच्या खाली प्रतिसाद येत नाहीत
हे हे हे ...बागे 'मन पाऊस
हे हे हे ...बागे 'मन पाऊस पाऊस' झाल्यावर शिंकणारच तू पोरी....:-)
धन्स ग!
<<<याला तुम्ही काकाक म्हणताय
<<<याला तुम्ही काकाक म्हणताय हा तुमचा मोठेपणा, नाहीतर अशा कवितांना साठच्या खाली प्रतिसाद येत नाहीत>>>>
<<<हा तुमचा मोठेपणा>>>
हे हे हे सर भापो....:-)
-सुप्रिया.
मस्त मस्त कविता सुप्रियातै!!
मस्त मस्त कविता सुप्रियातै!! एकदम हलकी फुलकी...
(No subject)
छान आहे नी खरंही आहे:-)
छान आहे नी खरंही आहे:-) कंटाळा आला ह्या कंटाळ्याचा.
मेला...हा..हा...हा कंटाळा !!!>> हे वाचताना शिंक आल्याचा फील आला>>>>>>> बागे, मला जांभई चा फील आला
<<<<मेला...हा..हा...हा कंटाळा
<<<<मेला...हा..हा...हा कंटाळा !!!>> हे वाचताना शिंक आल्याचा फील आला>>>>>>> बागे, मला जांभई चा फील आला >>>>
चला म्हणजे कवितेचा उद्देश सफल झाला म्हणायचा तर!!! माझा कंटाळा तुम्ही घेतलात...:-)
धन्यवाद मंडळी.
-सुप्रिया.
व्वा! छान जमल्ये सुप्रिया
व्वा! छान जमल्ये सुप्रिया ताई! तुम्हि ही कविता पोस्टायचा कंटाळा केला नहीत हे एक बरं केलत!
मला विचाराल तर "मेला...हा..हा...हा कंटाळा" इथे "हा हा हा" चा उपयोग हास्यदर्शक म्हणुनही घेता येईल!
फक्त अर्थ बदलेल!
कसा घ्यायचाय तसा घ्या
कसा घ्यायचाय तसा घ्या नानुभाऊ.....:-)
अर्थावर तर वाचणा-याचीच मक्तेदारी असते शेवटी...:-(
नाहीतर अशा कवितांना साठच्या
नाहीतर अशा कवितांना साठच्या खाली प्रतिसाद येत नाहीत>>>>>>>>>>>>>>>>>>>.........:अओ:
अच्छा ही खरी ट्रीक( मन्त्र ) आहे तर !! धन्यवाद बेफीजी................
अर्थावर तर वाचणा-याचीच
अर्थावर तर वाचणा-याचीच मक्तेदारी असते शेवटी.>>
स्वतंत्र वाक्य म्हणून मस्त
(No subject)
खरंच काय करावं या कंटाळ्याचं?
खरंच काय करावं या कंटाळ्याचं?
आवडेश
आवडेश
अर्थावर तर वाचणा-याचीच
अर्थावर तर वाचणा-याचीच मक्तेदारी असते शेवटी... >> क्या बात!
पण पाठ सोडेल तर
पण पाठ सोडेल तर शपथ.....
...........मेला...हा..हा...हा कंटाळा !!!
व्वा कंटाळा न करता इथे पोष्ट केलेस हे मात्र लई बेस केलेस सुप्रिया
छान लिहीलेस हे मनापासुन सांगतांना आम्ही पण कंटाळा नाही केला
मला वाटले वै व कु ला म्हणताय!
मला वाटले वै व कु ला म्हणताय!
खरंच काय करावं या कंटाळ्याचं?
खरंच काय करावं या कंटाळ्याचं? .....
आवडली कविता .
मला खरंच शि़क आली
मला खरंच शि़क आली
मंदार जी
मंदार जी
मस्तयं कविता .
मस्तयं कविता .
न कंटाळता (आलेली शिंक, जांभई
न कंटाळता (आलेली शिंक, जांभई दाबून ) दिलेल्या मजेशीर अभिप्रायांबद्दल मनःपुर्वक आभार.
-सुप्रिया.
कवितेच नावच !! कंटाळा !! असत
कवितेच नावच !! कंटाळा !! असत तर ??????
तुम्ही वाचण्याचाही कंटाळा
तुम्ही वाचण्याचाही कंटाळा केला असता...:-)
(No subject)
(No subject)