माझं लाडकं कोकण.-भाग : १ - गोळप (रत्नागिरी)

Submitted by शोभा१ on 9 April, 2012 - 03:29

बुधवार दिनांक २८.०३.१२ ला, ऑफिसमधे, सकाळी ११ वाजता, प्रज्ञाचा फोन आला.
मी : हॅलो.
प्रज्ञा: हॅलो. काय ग झाली का तयारी?
मी: तयारी? कसली तयारी?
प्रज्ञा: अग, शनीवारची तयारी.
मी: शनिवारी काय आहे? (हे विचारतानाच माझे नेत्र समोरच्या दिनदर्शीकेतील, येत्या शनीवारावर स्थिरावले व शोध घेऊ लागले. त्याचवेळी माझ्या मनाने स्मरणशक्तीशी जवळीक साधून, शनिवारी प्रज्ञाशी काही ठरवलेय का याची विचापूस केली. पण मला दूर दृष्टी नसल्यामुळे, शनीवारच्या रकान्यात तारखेखेरीज काही दिसले नाही. आणि स्मरणशक्तीनेही संप पुकारला. हे सगळ फक्त ५ सेकंदात झाले. )
प्रज्ञा: शनीवारी कोकणात जायच आहे ना?
मी : ह्या शनीवारी जायचय? आणि हे तु मला केव्हा सांगितलस?
प्रज्ञा: हे काय आत्ता सांगतेय. Lol Lol
हे ऐकून अनेक प्रतिक्रिया माझ्या मनात उत्पन्न झाल्या. पण मी त्या इथे सांगणार नाही.(परत कोकणात (प्रज्ञाबरोबर)जायची संधी हातची घालवायची नाही मला. :डोमा:) माझ्या डोळ्यासमोर माझ्या एवढ प्रश्नचिन्ह ऊभ राहिल. आता रजा कशी मिळणार? कारण याच महिन्यात ३ दिवस रजा घेऊन झाली होती. तरी प्रज्ञाला, "माझ येण अवघड दिसतय. पण गाडीत जागा ठेव". अस सांगून कामाला लागले. खूप विचार करून, दुसर्‍या दिवशी सरना खरं कारण सांगून. "जर तुम्ही जा म्हणालात, तर मी जाणार आहे. नाही तर मी जाणार नाही" अस सांगितले. सरांनी पण कधी जाऊन, कधी येणार? याची चौकशी करून त्वरीत परवानगी दिली. (तसे आमचे सर फार चांगले आहेत. Proud आणि मला 'स्वर्ग दोन बोटे उरणे' , म्हणजे काय याचा प्रत्यय आला. Happy
तर अशा प्रकारे आमची कोकणात जायची तयारी सुरू झाली. आणि शनीवारी सकाळी ११ वाजता आम्ही प्रवासाला सुरूवातही केली. आता नमानाला घडाभर तेल न ओतता, (आत्ता पर्यंत किती घडे झाले कुणास ठाऊक? :फिदी:) फोटो दाखवते. प्रथम गोळपला (रत्नागिरी जिल्हा) मुक्काम करायचा होता.
ॐ गं गणपतये नम:
१.

२.

३.

४.

५.एका हॉटेलमध्ये जेवायाला थांबलो. तर ही रंगीत कोंबडी, प्रज्ञाला फार आवडली. (बघायला :फिदी:) म्हणून मी तिचा फोटो काढेपर्यंत तिने मला पाणीही पिऊ दिले नाही. Proud

६. हे तुरे कसले?

७.

८.

९.

१०.

११.

१२.

१३.

१४. आकाश भरून आले होते. आता आम्ही रत्नागिरीत पोहोचलो. आणि माझ्या कानात पु.लं.चा आवाज घुमला, "रत्नांग्रिच्या समस्त म्हशी तुर्तास गाभण काय रे झंप्या? " Happy

१५.ढगांचे विविध आकार बघत आमचा प्रवास चालू होता.

१६.हे आत्त्याच्या घरातले सदस्य.

१७.

१८.कमळाची पाने.

१९. तुळसी वृंदावन.

२०. कुटुंब वत्सल इथे फ़णस हा, कटी-खांद्यावर घेऊन बाळे. Happy

२१. जास्वंदीचे फ़ुल.

२२.फ़ुलांसहीत परडी.

२३.पांढरी जास्वंद.

२४.

२५. कापूस. (कपाशी)

२६.उन्हामुळे पेरू करपलेले होते.

२७.कैर्‍या.

२८.कौलांवर वाळत असलेली सुपारी.

२९. घर कौलारू आहे. आणि डिश अँटीना पण आहे.

३०. पांढरा चाफा.

३१. तुळशीच्या मंजिर्‍या.

३२. सुपार्‍यांसहीत टोपली.

३३. काजूबियांची टोपली.

३४.वाळ्त असलेल्या रिठया.

३५.जाळी पडलेलं पान. (सागाच आहे ना?)

३६.अननस.

३७.माड आणि पोफळी.

३८. रातांब्याची कोवळी पालवी.

३९.साखर जांभ.

४०. आणि हे त्याच फुल.

४१.हे त्याच झाड.

४२. पिटुकल शहाळं.

४३.मोहोळ.

४४. विहीर.

४५.निवडुंगाच बेट.

४६.

४७.जास्वंदीच फुल.

४८.केळी.

४९.

५०.करड.

५१. गोवर्‍या.

५२.बांबू.

५३.दगडी डोणी.

५४.

५५.जातं.

५६.

५७.

५८. फणसाच्या कुवर्‍या.

५९. खेड्यामधले घर कौलारू.

६०.

६१.लवंगी मिरची.

६२.अबोली.

६३.

६४.कढीपत्त्याची फुले.

६५.

६६.

६७.खायच्या पानांची वेल.

६८.

६९.सकाळचा नाश्ता, बताटे पोहे.चुलीवर केलेले.(रामनवमी)

७०.आत्त्याच्या घरची म्हैस.

७१.आखाडा.

७२. गणपती मंदीर.

७३.दिपमाळ.

७४.

७५.

क्रमशः

गुलमोहर: 

मंदार, तुझ्या गावावरूनच पुढे जाताना एकदा वाटले होते, तुझ्या घरी येवून जावे >>>>बरं झालं, गेलो नाही ते.थर्मास मध्ये, चहा घेऊन जाव लागलं असत. Wink

हा भाग ही फारच सुंदर्..काय काय नवीन नवीन दाखवलंस.. फणस अगदी बुंध्यापासून लगडलेत.. अमेझिंग!!
मस्त !!!

त्या पोह्यांवरचा झाकण बाजुला ठेवुन फोटो काढला असता..., तर काही आम्ही खाल्ले नसते ते पोहे. राग.>>>>>>अरे म्हणून तर काढल नाही. फोटोत पाहून काही तुम्हाला खाता येणार नाही, मग कशाला उगीच तुमच्या मनाला वेदना द्या? Proud

अनघा_मीरा, धन्यवाद!
१. आणि ५६ नं ची फुलं कोणती? पहिल्यांदाच बघितली!>>>>>>>>>>>>>
२. ५६ नंबरच्या फोटोतली फुल चाफ्यासारखीच दिसताहेत. पण चाफ्याच्या एवढ्या छोट्यारोपाला फुल आलेली पाहिली नाहीत कधी.>>>>>>>>>>> तज्ञानी याचे नाव सर्पगंधा सांगितले. तज्ञ नेहमीचेच. (सुज्ञास जास्त सांगणे न लगे. ) Happy

५६ नंबर ची फुलं "कुडा" ची आहेत भाजी करतात त्या फुलाची.

शोभा ...... तो रस्ता आहे न.. त्यावर न जाणे मी सायकल वरुन किती राऊंड मारलेत...........
आठवणी जग्या झाल्या. Happy
सड्यावरुन रनपार कडे जाणारा रस्ता...

शोभा काय बात है! तुमच्या फोटो च्या निमीत्ताने माझे पण भटकणे झाले. अप्रतीम निसर्ग! घर, घरातले खट्याळ मेम्बर, चूल, सगळे काही वेड लावणारे.

"यावा कोकण आपलाच असे"
कधीही कोकणात जायच म्हणल तर कंटळा येत नाही. नेहमीच कोकणात जायची ओढ असते. ते आपलं गाव नसतानाही..
तुमचे फोटो बघुन पुन्हा कोकणात जायची ईच्छा झाली. खुप सुन्दर आहेत फोटो. आणि तुमच्या आत्याच्या घरतिल सदस्य फार आवडले.

छान फोटो!
फोटो क्र. ३: चांदडा
फोटो क्र. ४: रानतंबाखू Lobelia nicotianifolia
फोटो क्र. ६: भामण / भामिनी Colebrookea oppositifolia
फोटो क्र. ५६: सर्पगंधा

घर फार छान आहे!

२००५ च्या दिवाळीत गोळ्प्यात गेलो होतो. तिथे आदल्यादिवशीच मुलांच्या क्रिकेट खेळण्यावरुन हिंदु-मुसलमान गटांत मारामारी झाली होती. आम्ही गेलो होतो त्यादिवशीच नारायण राणे (तेव्हा ते 'सिवसेणेत' होते) येणार होते आणि वातावरण प्रचंड तणावपूर्ण होते.

Pages