मद्याचा प्याला

Submitted by मिडासटच on 8 April, 2012 - 05:56

हा मद्याचा प्याला
उबडा का ठेवला
अर्क शीशीतला,
माणुस मीशीतला, ओठातच हसला

एक मद्याचा प्याला
अर्काने भरला
हलकेच झलकला
अन माणुस मीशीतला, ओठातच हसला

घोट नरडिचे घेत,
अर्क सोडिला पोटात
लागला डोलायला
अन माणुस मीशीतला, ओठातच हसला

कोम्बडी केली फस्त
ढेकरही दिली मस्त
समतोल सावरावयाला
अन माणुस मीशीतला, ओठातच हसला

पाहुनी उबडा प्याला
तो दु:खाने हसला
का! चाखले जहालाला ?
म्हणुन माणुस मीशीतला, ओठातच हसला

तो उबडा प्याला
होता जहालाने भरला
माणुस मीशीतला, क्षीण...क्षीण... हसला

गुलमोहर: 

उत्तम सस्पेन्स. बदलत जाणारे ध्रुपद गोडी वाढवते. पूर्वीच्या काळी इंग्रजीत अशा पद्धतीने बॅलड्स लिहायचे.