वाळुचे घरटे

Submitted by मिडासटच on 8 April, 2012 - 05:45

समुद्र किनार्‍यावर, वाळुच्या ढिगात....
वाळुचा कील्ला, बांधुया......

ढिगार्‍यावर बसुन, सगळच विसरुन..
स्वप्नाचे महाल बांधुया....

मी एकटाच, वाळुच्या ढिगात
वाळुचा कील्ला, उभा केला झोकात

कितीतरी वेळ, ढिगर्‍यावर बसुन
वाट बघत, एकटाच रुसुन......

एकाएकी पाऊस, आला बरसुन
वाळुचा कील्ला, गेला वाहून...

वाळुचा कील्ले, थरथरत्या मनात
बनतात क्षणात, मीटतात ही क्षणात

गुलमोहर: 

वाळुचा कील्ले: वाळुचे किल्ले
कील्ला: किल्ला
ढिगर्यावरः ढिगा-यावर
बाकी आशय फारच सुंदर.