माझे मलाच कळत नाही....

Submitted by मिडासटच on 8 April, 2012 - 03:30

मी कोण आहे !! कुणी मला सांगेल का ?
माझे मलाच कळत नाही....

सुर्यकिरणे सगळीकडेच पसरतात
माझ्यावरच ते का पडत नाही.....
माझे मलाच कळत नाही....

प्रत्येकाचे मन ज्याच्या त्याच्या काबुत आहे
माझेच तेवढे का नाही..
माझे मलाच कळत नाही....

चहुकडे आनन्दी आनन्द आहे
मीच का ऊदासीन आहे..
माझे मलाच कळत नाही....

या संसारात सगळॆ सगळॆ सुखी आहेत
मीच का दुखी आहे..
माझे मलाच कळत नाही....

आपाआपल्या यशात सगळी कसे मग्न आहेत
मीच का अपयशी आहे..
माझे मलाच कळत नाही....

माझ्या समजुत घालण्यासाठी..
तुझे शब्द तेवढेच का पुर्ण वाटतात
माझे मलाच कळत नाही....

मी कोण आहे !!

गुलमोहर: