स्वतःच्या प्रेमात पडलेले लोक

Submitted by avi.appa on 6 April, 2012 - 01:31

ग्रीक लोककथेत एक तरुण आपले प्रतिबिंब तलाव जलात बघतो व स्वतःच्या सौंदर्यावर मोहित होतो..
रोज येवुन तलावातल्या प्रतिबिंबास न्यहाळणे हा त्याचा छंद बनतो...
ह्या मानसिक वेडाला वा अवस्थेला नार्सिसस . / नार्सिसिझम असेही नाव आहे..
असे स्वतःच्या प्रेमात पडलेले लोक..यांना स्वतः शिवाय /व्यतिरिक्त दुसरी दुनिया नसते..
हे लोक स्वतःची तारीफ..मोठेपणा इतरा कडुन ऐकण्यात धन्यता मानतात..
सतत सर्व ठिकाणी माझाच विषय चर्चेला असावा अशी मानसिक बैठक असते..
मी म्हणेल ते खरे..त्यांच्या मताची शहानिशा करणे त्यांना मंजुर नसते.
एखाद्या साध्या घरगुति कार्य क्रमास जरी हे लोक गेले तरी उत्सव मुति पेक्षा यांच्या कडे जादा ध्यान द्यावे अशी अपेक्षा असते..
ह्यांच्या हो ला हो मिळवला कि गडी/वा सखी खुश..
ज्याला रूढ अर्थाने नार्सिस्टिक व्यक्तिमत्व म्हणता येईल त्यात आढळणारे स्वभावविशेष असे वाचण्यात आले-
१) हे लोक वास्तवात आहेत त्यापेक्षा स्वतःला जास्त महत्वाचे समजतात
२) यांच्या ठायी संवेदनशीलता अत्यंत कमी असते किंवा जवळ जवळ नसते
३) समोरच्या व्यक्तीच्या केंद्रस्थानी फक्त आपण आणि आपणच असावे ही यांची तीव्र गरज असते
४) दुसऱ्यासाठी सह - अनुभूती नसते आणि दुसऱ्याला वापरून (शोषण करणे ) घेतात
५) दुसऱ्याचा हेवा करण्याची मनोवृत्ती आणि उद्धटपणा असतो
६) यांना वारंवार औदासिन्य येते (जरी दाखवत असले वा नसले )
७) सतत मनात पुढील गोष्टींबद्दल स्वप्नरंजन सुरु असते - अनिर्बंध सत्ता , सौंदर्य , बुद्धिमत्ता , यश , आदर्श प्रेम.....
यांची मानसिकता फक्त स्वतःच्या सौंदर्याशीच निगडीत नसते , तर त्यात या सर्व गोष्टी कमी - अधिक तीव्रतेने येतात ..
अश्या व्यक्ति समाजात/परीवारात/परिचयात सा~यांनाच आढळतात...

गुलमोहर: 

अरे माझ्या बॉस बद्दल तुम्हाला कसे समजले? त्याला फक्त मी, मी, आम्ही, आमचा..... हीच बाराखडी येते.

खरेतर

जीवन त्यांना कळले हो
मी पण ज्यांचे पक्व फळा परी
सहज पणाने गळले हो.....

ही माझी थीयरी आहे.

माझ्याही ओळखीत आहेत काही असे लोक. त्यांना जर सांगायला गेले की त्यांचे वागणे कसे बरोबर नाही तर असे सांगणार्‍यालाच वेड्यात काढतात आणि कायमच स्वतःचेच खरे आणि बरोबर आहे असे बिंबवत रहातात. Sad

विश्वास नाही बसत की अकु अप्पानी इतकं शुद्ध आणि लॉजीकल लिहिलं आहे. शिवाय यात एकही चुंबन नाही, 5 मिनिटात बेडवर यायला तयार असणारी ( रादर नायकाला प्रॉवोक करणारी) कामिनी नाही. Wink 2012 मध्ये इतकं छान लिहिणारे अप्पा 19 पर्यंत इतके शृंगारिक कसे झाले?

असो, वरचा लेख छान आहे. 'खुदपसंद' लोकांचं अचूक विश्लेषण.