कहर गुलमोहराचा

Submitted by बेफ़िकीर on 4 April, 2012 - 08:40

अत्यंत उत्स्फुर्त अशा पांडित्यवान कवींनी ठासून भरलेल्या कॉफी हाऊस या व्यासपीठावर नुकताच एक नवकाव्याचा प्रयोग झाला. यात मुक्तचंदीय ओळींचा गझलेत अंत करण्याचा प्रयोग आपल्याला खचितच आवडेल.

-'बेफिकीर'!

(यात भर पाडली जावी अशी आज्ञा)

===================================================

मुस्काटात लाव निळ्या आकाशाच्या, ज्याच्यातून बैलाच्या मुतागत पाऊस पडतोय
कशाला हवा हा असला पाऊस, ज्याच्या थेंबाथेंबाने इथला कण न कण सडतोय....

आणि या ढगांचा राजीनामा कुबेराच्या द्वारपालाने मागितलाच नाही?

अश्वासारखी निळी कुत्री भुंकताना अमावास्या थबकत थबात यावी असला भ्रष्टाचार

थोतांडांच्या छातीवर बसून एक कुभांड रचतोय आभाळाविरूद्ध

अरे हट! बापाचे राज्य आहे काय? आम्हाला हवा तेव्हाच आम्ही आमच्या रंगाचा पाऊस पाडू

आणि माहीमचा हलवा खावा तशी तुझी ही मोरपंखी साडी

दादर चौपाटीचा भेळवाला चिंचेच्या चटणीऐवजी रक्त घालतोय भेळेत

बापाच्या राज्याच्या बापाच्या राज्याची भेंडोळी करून तुतारी वाजवली आमच्या नातवाने

तुझ्यापासून आहे मी,तुझ्यावाचून आहे मी

समीक्षेच्या फत्तराला अत्तराचा पाझर फोडणार्‍या माझ्या कविते....

... तुला चेचून मायबोलीवर भिरकावेन मी

नेहरू गार्डनजवळच्या घोड्यावर पैसे देऊन रपेटी केलेल्याला पराक्रम म्हणतात का?

आणि गांधींच्या पंच्यातील लपलेल्या बेडका

.. तुला फेकेन स्वातंत्र्यज्योतीच्या विझण्यात

एकही लढाई न हरायला मस्तानी तर हवी, नुसत्या लग्नाने कुठे विजय मिळतात का कधी?

नुसत्या लग्नाने फार तर विजय पाटील मिळतील

विझतानाचे उसासे पुन्हा पेटवायला कसे पुरेसे पडत नाहीत कुणास ठाऊक?

आणि जे पुरेसे पडते ते असते माझे वैफल्य , शल्य, कैवल्य , जाज्वल्य आणि ढल्ल्य

वैफल्य किती महिने गरोदर राहिले की त्याच्या पोटी जाज्वल्यता जन्म घेते हा ही प्रश्न सुटता सुटत

नाही

नाळ कितीही खेचली तरी तुटत नाही असला किळसवाणा प्रकार का सहन करायचा?

आणि वर नाळेचे वारस म्हणून ऋतू येणार वर्षातून सहा

हेमंत शरद श्रावण ग्रीष्म शिशिर आणि भिकारडा वसंत

वसंत नावाचे कवीही असतात म्हणे कुठे कुठे अध्यक्ष

भीकेचे डोहाळे लागलेली मंडळं ठेवत असतील असले कार्यक्रम, मला काय?

हा पाऊस असा कधीही येतो
अनेकांची वाट लाऊन जातो ...

जिथे बघशील तेथे जीवना साचून आहे मी
तुझ्यापासून आहे मी तुझ्यावाचून आहे मी.................

''तिच्या'' हृदयातले विश्वातल्या मित्रास ना ठावे
पुराणे काय वाचावी,तुला वाचून आहे मी....................

तुझ्या हृदयात आहे वा न आहे काळजी नाही
तुझ्या दंडात चोळीसारखा काचून आहे मी.............

वसंत नावाचे कवीही असतात म्हणे कुठे कुठे अध्यक्ष

भीकेचे डोहाळे लागलेली मंडळं ठेवत असतील असले कार्यक्रम, मला काय?

हा पाऊस असा कधीही येतो
अनेकांची वाट लाऊन जातो ...

आणि वर डोहाळजेवणासाठी हॉल शोधतायत

संताप होतो वळचणीतल्या पारव्यांचा

हे तर थोरच

जिथे बघशील तेथे जीवना साचून आहे मी
तुझ्यापासून आहे मी तुझ्यावाचून आहे मी.................

''तिच्या'' हृदयातले विश्वातल्या मित्रास ना ठावे
पुराणे काय वाचावी,तुला वाचून आहे मी....................

तुझ्या हृदयात आहे वा न आहे काळजी नाही
तुझ्या दंडात चोळीसारखा काचून आहे मी.............

तुझा होकार फुंकी प्राण माझ्या पांगळ्या देही
लुळा आहे तसा थोडा तरी नाचून आहे मी..........

तुला पाहून हल्ली वाटते की मी कवी आहे
तुझ्या साच्यात माझी ही गझल ढाचून आहे मी

-----

कॉहाकर नवकवी

गुलमोहर: 

का सहन करायचा हा अत्याचार, जिथे तोंड दाबून बुक्क्यांचा मार आहे...
चार पैशांची बाजारबुणगी जिथे थोबाडावर लाचार आहेत...

Rofl

़़कैच्याकै भन्नाट !

माझीही भर Happy

तुला वाटेल तेव्हा ये, तुला वाटेल तेव्हा जा
उभी वळणावरी अजुनी तुझ्यावाचून आहे मी

-सुप्रिया.