छायाचित्र बघा आणि कविता करा......क्रमांक २

Submitted by उदयन. on 1 April, 2012 - 05:01

आपण एक छायाचित्र निवडायचे.. आणि त्यावर कविता, गझल, चारोळी काव्य प्रकार निर्माण करायचे..
आपल्या मायबोलीवर उत्कृष्ट छायाचित्रकार आणि सुरेख कवी आणि कवियत्री आहेत..
.

.
दर १५ दिवसांनी नविन आशयघन छायाचित्र आपल्या आणण्याचा प्रयत्न राहील..
पहिले छायाचित्र

दुसरे छायाचित्र..
.
ganpati pule.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छायाचित्र बघा आणि कविता करा......क्रमांक २

एवढे मोठे नाव कशाला? चित्रकविता असे पूर्वी छोटे नाव होते.

प्रिया. - ही एक द्विपदी आहे, ज्यात चित्र बघून माझ्या मनात आलेल्या भावनांचे प्रकटीकरण आहे. वाढवायची म्हणून वाढवण्यात मला गंमत वाटत नाही. 'स्पॉन्टेनिटी' हा कवितेचा स्थायीभाव असला पाहिजे असे वाटते. वाढवायची इच्छा प्रदर्शित करावीशी वाटली त्याबद्दल आभार.

मी उधाणलेली लाट सागराची
ओढाळ मनाला ओढ किनार्‍याची
ही अविरत तृष्णा कशी काय सांगू?
मी मिठीत विरता, विरता संपायाची..

अव्यक्त भावनांची
तू लाट होऊनी यावे...
ओलित्या स्पर्शात तुझिया
मी चिंब होऊनी जावे...

या निळ्या सागरी राजा
मी तुझे प्रतिबिंब पहावे
हातात घालूनी हात
वाळूत मनसोक्त फिरावे!

बोले उधाण वारा
अन क्षितिजावरची लाली
तेव्हा रूसून गेले
ते बालपण पुन्हा मिळावे!

छान आहेत कविता............
.
तेव्हा रूसून गेले
ते बालपण पुन्हा मिळावे!>>>>> मस्तच आहे

भाऊ, मस्त.
मी पण नेमका त्सुनामी घेऊनच येत होतो पण तुम्ही आधीच बहारदार चारोळी टाकलीयेत Happy

लाटांमध्ये धावत आहे अतीत मागे सोडत मी
मात्र समुद्रामधे जायचे साहस नाही मनामधे
भविष्य होते अतीत तेव्हा बसतो तुकडे जोडत मी
ठसे पावलांचे बघतो मी जाताना सागरामधे

-'बेफिकीर'!

भाऊ नमसकर ... आवडलं..

नकोच अगस्ति, पर्शुरामही
पाठव तुझी ती उद्दाम सुनामी
असेल ताकद तुझी कितीही
थोपवीन इथेच असा तुला मी

आजकालच्या मुलांचं मनोगत आहे हे :

जग हे सारे अथांग सागर
"मुली" त्यातल्या असंख्य लाटा
अशीच मिळते दुसरी लगेच
पहिली अपणा सोडुन जाता

Lol

प्रिया. Rofl

"लडकी बस की तरहा होती है. एक जाती है तो दुसरी आती है" - आमीर खान इश्क सिनेमात अजय देवगण ला हा डायलॉग मारतो ते आठवलं Proud

.

ओये...............मी कधी तुझ्या बरोबर फ्लर्ट केल ??????????? कैच्याकै............

.

तु बघितलेस का कधी.......... वाचलेस का कधी........? कोणी तुला बोलले का मी तीच्याशी तसा बोललो...?
उगाचच......काही ही अर्थ लावुन मोकळी?

.

फ्लर्टचाच विषय आहे, तर अशीही चारोळी -

बघतोय बरं तो वरून खडक
लाटा फोडण्यातला तो एक्सपर्ट
बाप आहे बरं का तो या वाळूचा
जिच्याशी करताय तुम्ही असं फ्लर्ट.

ये कुदरत का जादू है, या है तेरी सोहबत का असर
देख...आखिरकार मैनेभी अपने 'पर' फैलाही लिये.... Happy

इकडे लोक फ्लर्ट च्या बाता मारताहेत तर खाली निवडक १० च्या बाजुला लॅटिन वुमन च्या जाहिराती.
हर हर!

Pages