Submitted by एक अबोली on 31 March, 2012 - 23:37
कुणाला कॅम्पिंग बद्द्ल माहिती असल्यास क्रुपया सांगा.मला ५ एप्रिलपर्यंत हवी आहे.बरोबर काय काय न्यावे?अडिच ते १२ वर्षांची मुले पण बरोबर आहेत्.धन्यवाद.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अॅडमिन क्रुपया हा प्रश्ण
अॅडमिन क्रुपया हा प्रश्ण योग्य जागी हलवा.
कुठे जात आहात, तेथे काय
कुठे जात आहात, तेथे काय सुविधा आहेत हे कळल्याशिवाय यादी करण्यात हशील नाही.
तरी...
तंबू
किचनसाठी वेगळा तंबू किंवा कनात
स्लिपींग बॅग (कुठे जाताय त्यावर कोणती हे ठरवावे)
च्छोटा स्टोव्ह
भांडी
कुलकेज + आवश्यक तेव्हढा बर्फ
स्वयंपाकाचे सामान
मुलांना खेळायला काही खेळणी - सायकल तिनचाकीअशक्य असल्यास उत्तम
फर्स्ट एड किट
धन्यवाद निनाद. स्टोनवॉल
धन्यवाद निनाद. स्टोनवॉल रेसोर्ट जॅक्सन येथे जात अहोत. RV देखिल आहे.
http://www.wvstateparks.com/
http://www.wvstateparks.com/
हेच का?
RV असेल तर बरेच प्रश्न येणारच नाहीत.
)
फक्त जेवणाचेच पाहा.
त्यातही मुले जरा मोठी असतील तर त्यांना एक जेवणाची जबादारी द्या ( ते जे काय करतील ते आनंदाने खा
RV ला गॅस बॉटल लागते का?
RV स्वच्छ आहे ना ते पाहून घ्या!
इतर यादीत
आयपॉड - लागत असेल तर
वाचण्याची पुस्तके
पोहण्याचे कपडे
पांघरण्याचे लिनन
धवायच्या कपड्यांची पिशवी
कॅमेरा - बॅटरी (चार्ज्ड - मेमरी कार्ड - रिकामे केलेले)
पाण्याच्या बाटल्या
ट्रेल करणार असलात तर चालण्याचे बुट
RV असली तरी Tent बरोबर घ्या.
RV असली तरी Tent बरोबर घ्या. कारण मुलांना त्याच्यात झोपायला खुप आवडते. पण गरम पांघरुणे लागतील्.रात्री जमिन थंड होते. त्यामुळे खाली अंथरायलाही जाड पांघरुणे घ्या. अर्थात तुमच्याकडचे हवामान कसे असते ते बघुन ठरवा. फ्लॅश लाईट लागतील. आम्ही ख्रिसमसच्या लाईट्च्या माळा ही नेतो. त्या साईट्च्या झाडांवर टाकतो. त्यामुळे रात्री आपला टेन्ट कुठे आहे ते ओळखायला मदत होते. जेवण करतांना भरपुर प्रकाश पडतो.
मी राईस कुकर, इलेक्ट्रीक शेगडी, भारतातुन आणलेली कोळशाची शेगडी नेते. घरुन मेरीनेट केलेले चिकन न्यायचे म्हणजे जास्त त्रास पडत नाही. तिथे गेल्यावर रस्सा करायचा. राईस कुकरला भात लावायचा. व्हेज असाल तर कांदा बटाटा रस्सा/खिचडी करता येते. मुले आहेत तर ब्रेड, अंडी, जाम, सिरीअल्,दुध्,फळे, ज्युस लागेल.
मुलांना सायकल लागेलच. मोठ्यासाठी क्रिकेट्चे सामान नेले तर अजुन मजा येईल. बाकी वर निनाद यांनी लिहिले आहेच.
पहिल्यांदाच जाणार आहात का तुम्ही?
धन्यवाद निनाद्,विद्याक हो
धन्यवाद निनाद्,विद्याक
हो पहिल्यांदाच जानार आहे.