पहिला पहिला क्रश ......

Submitted by पियु१२३ on 30 March, 2012 - 01:32

पहिला पहिला क्रश ......

प्रत्येकाच्या आयुष्यात हा दिवस येत्तोच (अपवाद वगळता)
आमच्याही आयुष्यात हा दिवस तसा जरा लवकरच आला असेच म्हणावे लागेल .
त्यावेळी मी नववीत असेन ,आमच्या धिंगाणेबाज कंपूत आम्ही ५-६ मुली होतो आमच्या वर्गात दोन मॉनिटर होते एक मुलांचा ,आणि एक मुलींची ,(ती मी होते )
त्यामुळे काही मुली माझ्यावर नेहमी खार खाऊनच असायच्या
वर्ष संपत आले होते जवळ जवळ, पण ग्रुप मधल्या काही मुलींमधला
बदल थोडा उशिराच लक्षात आला माझ्या !
म्हणजे तमुक तमुक मुलगा दिसला कि चोरून चोरून स्मैलींची देवाणघेवाण.......
चोरून चोरून चिठ्या - चपट्या, गाणी गुणगुणन, ...
(मुलींसाठी )सक्तीची दोन वेण्या आणि काळी रिबीन असताना हि कधीकधी पोनी बांधन, दोन चार केसांची बट मुद्दाम गालावर रुळवन, आणि म्याड्मचे वेणी का नाही घातली ? म्हणून बोलणे खाण.....
आणि विशेष ज्यां -ज्यां कबुतरांच्या जोड्या जमल्या होत्या ती टाळकी आम्हाला नेहमी टाळायचे ......खेळायला पण आणि अभ्यासाला पण .....
गंमत अशी कि ज्या मुलींशी आमची खुन्नस होती त्या बाकी मला जरा टरकायाच्या जरा नरमाईने वागायच्या ... (मी कधी त्यांच्या घरी पचकले (त्यांच्या प्रेमप्रकरणावर )तर नसती पंचाईत !म्हणून बहुतेक )
मला आणि कपूला (कल्पिता ) इंटरेस्ट, त्याना चिडवण्यात वाटायचा
वर्गाच्या खिडकी जवळच बेंच होता आमचा ,बाहेर येणारे जाणारे आणि विशेष आत डोकावणारे या सर्वावर आमचा डोळा असायचा
" ए गौरे......................देखो तेरा शाहरुख जा .... रहा हे हे हे ....
हि हि हि हु हु हु ...
गौरी लगेच बद्कासारखी मान उंचावून पहायची ...........
काय पण सोल्लिड मजा यायचीत्यांना चिडवायला .........

शाळेच्या रस्त्यावरच एका छोटस टपरीछाप कॅन्टीन होत आणि त्या शेजारीच एक मावा(मटका) कुल्फी , सरबत ,रॉयल कुल्फीची गाडी लागलेली असायची भर दुपारी उन्हात मावा कुल्फी खाणे म्हणजे अहाहा....सारा थकवा पळून जायचा ......पण सध्या आम्हाला फुकट मध्ये मावा कुल्फी मिळायची कारण ओळखीची एक दोन कबुतरांची जोडी तिथे लुडबुडत असायची आणि आम्ही त्यांना पाहिलं हे
(त्यांच्या मुद्दाम लक्षात आणून द्यायचं )

त्याच्या लक्षात आल कि लगेच आम्हाला फुकटात कुल्फी नाहीतर सरबत फ्री फ्री फ्री ......................
दिवाळीच्या सुट्ट्या सम्पल्या ,आमचे आवड्ते स्पोर्ट days आले
आम्ही रनिंग मध्ये भाग घेतला होता नेमकी जिंकायच्या बेतात असताना मध्येच माझा टांगा कल्टी झाला बाकीच्या मॅडम धावत आल्या त्यांनी मला हाताला धरून साईडला घेतले ,पाणी पाजले, आणी त्यात ते पण होते विनय सर ......

आमच्या फुटलेल्या ढोपराणा त्यांनी हळुवार मलम लावले आणि तिथून पुढे......... माझ आयुष्य काही दिवसासाठी प्रेमाच्या झोक्यावर बसून हिंदोळ्या खाऊ लागल.
मला काय झाल हे मलाच समजत नव्हत न अभ्यासात मन लागेना ना खेळण्यात ! मला पण अचानक प्रेमाचा साक्षात्कार झाला होता ...
आणि तो हि आमच्या विनय सरांवर (अरे बाप रे) !!!!
विनय सर , २४-२५ वर्षाचे ,जॉग्रोफी शिकवायचे ,गोरा रंग ,कुरळे केस ,नाजूकसा चष्मा , बोलणे हि अगदी मृदू !(त्यामुळ मुली फार मरायच्या त्यांच्यावर ,आणि मुल जळायचे त्यांच्यावर )
वर्गात आले कि पहिला सुविचार वाचणार (लिहिणारी मीच ) ...मग तासाला सुरुवात ....
शिकवण पण कित्ती छान ,मधेच एखाददुसरा विनोद करून सर्वाना हसवणार मधेच एखाद्या झोपाळूला टपली मारणारत्यांना त्यांची खुर्ची नेहमी स्वच्छ हवी असे ,एकदा त्यावर धूळ दिसली तर त्यांनी " बोरसे (मुलांचा monitar ) ला बोलावले
"ये बोरसे ये खुर्चीवर बैस ...लाजू नको बैस बैस ....त्याला सुरुवातीला काही कळलेच नाही सर का अस म्हणताय ?
तो लाजत लाजत खुर्चीवर बसला आणि त्याची प्यांट
मागून खडूच्या धुळीन पांढरी झाली तेव्हा सर्व वर्गात हास्याचे तुषार उडाले होते
बिचारा ..........
सर ;-"बोरसे समजले ना तुला काय ते ?" उद्यापासून धूळ दिसली नाही पाहिजे ओके ...monitar ना तू?
त्यांच्या अश्या गमती -जमती मूळ हसून हसून वाट लागायची
त्यांचा तास संपूच नये असे वाटायचे मला !
आता रोज सकाळी आम्हाला " खरा तो एक ची धर्म जगाला प्रेम अर्पावे ", " "शेजार्यावर प्रेम करा" "

"तुम्ही जेवढे प्रेम जगाला द्याल ,त्याच्या दुप्पट तुम्हाला मिळेल"

हेच सुविचार आठवायचे
सगळ्यां जोडप्यांना चीडवणारी मी आता मला त्यांची अवस्था समजत होती...........
मला कुठलाही पिक्चर पहिला कि विनय सरच हिरो म्हणून दिसायचे भले तो, सलमान असो कि शाहरुख .....मन अगदी पिसासारख अलगद, " कभी इस क्लास में, कभी उस क्लास मे" त्यांना शोधायचं
ते दिसले कि पाहून गोड हसायचं, ते पण हसायचे ........
वर्गात त्याचंपण सारख पियू आज सुविचार छान लिहिला ,अक्षर छान आहे तुझ !
"तू टेस्ट मध्ये छान स्कोर केला ह ! कीप इट up गुड ........"

आमची स्वारी एकदम हवेत ..................
असेच आमचे आयुष्यातले मोरपिसा सारखे सुंदर दिवस मजेत चालले होते
होते पण पण
अचानक तो दिवस आला ....
"पियू जरा इकडे ये ....काय सर '"
सर ; -आग त्या प्रभा मॅड्म बरेच दिवस झाले आजारी आहेत त्यांना भेटलीस का तू ?
(मी अन तिला भेटेन अशक्य ! एक नंबरची खडूस,पण ह्यांना काय पडलाय तीच )
मी : नाही हो सर, का?
सर : तुला माहित आहे का त्या कुठ राहतात?
(डोम्बल तुमच कशाला भेटताय ? दाल मे कुछ काला तो नही)
मी :चअज्जिबात माहिती नाही हो सर मला त्या कुठ राहत्तात!
सर : होका जाऊदे , अग मला कुणीतरी सांगितलं कि पियू त्यांच्या घरी
डान्स प्र्याक्टीसला जायची म्हणून सहज विचारलं ! (कुणी काडया केल्या कुणास ठाऊक )
शाळा सुटली तरी तेच विचार
विनय सर कशाला चालले तिकडे मरायला नसता खुराक डोक्याला माझ्या .........
दुसर्या दिवशी सकाळी सकाळी आधी विचारले "भेटले का हो सर तुम्ही प्रभा मॅड्मला......"
सर : नाही ग वेळ नाही मिळाला आणि तश्यापण त्या आल्या आहेत शाळेत आज !
हो क्का (हुश्श... .......................बर झाल )मरून दे ..
आम्हाला अस सुखी बघन देवाला खटकल की काय जाने?
आम्हाला चिकन pox (कांजण्या )झाल्या आणि सर्व चेहरा भर पसरल्या
डॉक्टरांनी त्या बर्या होई पर्यंत शाळेत जाऊ नको ह ! नाहीतर दुसर्यानाही होतील असा प्रेमळ सल्ला दिला
म्हणजे काय १०-१५ दिवस घरी .....नही............बोंबला...............
कांजण्या पेक्षा विनय सर दिसणार नाहीत भेटणार नाहीत ह्या विचाराण गलबलून आल मला Sad
एक एक दिवस कसा कसा गेला मला विचारू नका !
आणि शेवटी तो दिवस आला आणि आम्ही सायकलवरून शाळेकडे
प्रस्थान केले
८.१५ ची शाळा असून एरवी आम्ही ८.२५ पोहचून ग्राउंडला दोन राउंड मारायचो
आणि आज चक्क ८ ला पोहचून आम्ही विनय सरांची आतुरतेने वाट पाहत बसलो ........प्रार्थना झाली,वर्गात जाउन बसलो.सुदैव माझ पहिला तास भूगोलाचाच होता माझ सर्व लक्ष दाराकडे आत्ता येतील मग येतील १० मिनिट झाली ....
मध्येच सायन्सच्या मॅड्म टपकल्या आणि सायन्सचा तास सुरु झाला
मी वेळापत्रक तीनदा चेक केले अरेच्या हे कस काय बुवा ?
मी कपुला कोपराने ढूसनी दिली " हे काय ग कपू मॅड्म भणजाळली का ?
भूगोलाचा तास आहे ना?
अन काय ग विनय सर कुठाय ?
आले नाही का आज ? बर नाही का त्यांना ?
कपू हळूच : चुप्प ए " बावळे जस काय तुला माहितच नाहीं"
मी : आईशपथ !! सांग कि क्काय क्काय ?सांग न प्लीज ?
आग त्याचं लग्न झाल ५-६ दिवसापूर्वी प्रभा मॅड्मशी ...
मी : क्काय ?कधी? कस? केव्हा ?

(कपू अक्ख्या वर्गाची नव्हे शाळेची जेम्स बॉंण्ड होती अस म्हटल तरी चालेल, पट्ठीला सर्व खबरबात असायची )

कपु : "छुपे रुस्तुम होते दोघ पण, लव्ह मॅरेज केल त्यांनी ,आता १५ दिवस रजेवर!

हे ऐकूनच माझ्या डोक्यात हजार घंटा वाजू लागल्या टन टन टन..........

"प्रभा sss ई....... ती दात फारुळी ,सश्यासारखे दोन दात पुढ आलेली खडूस, ती आवडली ?

क्काय पण चॉइस आहे विनय सरांचा .....?

कुठ विनय सर अन कुठ ती ? बाकीच्या मुली (मी ) मेल्या होत्या का ?

कपू :" अबे जाऊ दे ना ,तुला काय इतक ? ती म्हण आहे ना " दिल आया गधी..पे ..........."अपनेको क्या फरक पडता हे ?

हम्म्म........(फरक तो पडता हे भाई तुम नहीं समझोगी ") Sad

"देवा तू मला ५ -६ वर्ष आधी जगात पाठवलं असत तर तुझ क्काय बिघडल असत का रे ?"

(हे बालिश विचार तेव्हाचे ,म्हणून भाषा तशीच वापरली आहे, गुरूंचे स्थान आदरणीय आहे ) Happy

गुलमोहर: 

सह्हीच ... मस्त लिहिलय ....

आमच्या शाळेत ( न्यु इंग्लिश स्कुल सातारा) मधे असाच एका मुलीचा एका सरांवर क्रश होता ....पण त्या सरांन्नी लग्न केलं नाही असं झटपतीत ....आम्ही पोरांन्नी त्या सरांन्ना त्या मुली बरोबर डायरेक्ट हनिमुन करतना पकडलं .९वी क च्या कोपर्‍यातल्या वर्गात ..:खोखो:
( नंतर नोकरी गेली बिच्चार्‍याची Sad )

च्यायला आम्ही पंण गाढवच होतो तेव्हा....कॉलेजात गेल्यावर अक्कल आली ... मग कॉलेजातल्या सरांना कोनी "पकडलं नाही" अन म्हणुन सरांनीही आम्हाला "पकडलं नाही" Happy

जुन्या आठवणी जाग्या केल्यात ...मस्त लेख !!

पहिला क्रश - चौथीमध्ये - गणिताच्या बाई - माझे स्वताचे गणित चांगले असल्याने त्यांचाही मी वर्गातील सर्वात लाडका विद्यार्थी होतो. माझा मस्त गालगुच्चा घ्यायच्या तेव्हा स्वर्ग दोन बोटे उरल्यासारखे वाटायचे.


दुसरा क्रश - सातवीमध्ये - पुन्हा बाईच -
यावेळी मात्र शारीरीक शिक्षणाच्या - यांचा लाडका होण्यासाठी किंवा यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी जमेल तेवढी मस्ती करायचो - आणि ती मला भारीच जमते यात कोणाला संदेह नसावा - पण ती मस्तीही अशी असायची की त्यांना कुठेतरी आवडावी. डोक्यावरून हात फिरवत जेव्हा त्या म्हणायच्या माझा अभिबाळ कधी सुधारनार.. स्वर्गाच्या दारातच पोहोचल्यासारखे व्हायचे.

 

तिसरा क्रश - आठवीमध्ये - परत एकदा बाईच - त्याच वर्षी शाळेत नवीन आलेल्या - आणि आल्या आल्या शाळेत फेमस झालेल्या - हस्तकला चित्रकला असले विषय शिकवायचे - माझी चित्रकला जाम बकवास असल्याने यांना कसे ईंम्प्रेस करू हा प्रश्न नेहमी असायचा, तरी काहीतरी शक्कल लढवून यांच्या नजरेत भरेन असा प्रयत्न राहायचा. जसे की एकदा सर्कशीचे चित्र काढायचे होते. मी कसेबसे मेहनतीने तोडकेमोडके चित्र काढले. आणि त्यानंतर सार्या चित्रावर काळ्या रंगाचा वॉश मारला.. सगळे चित्र काळपट केले आणि विषयाचे नाव असे दिले की ऐन सर्कस चालू असताना लाईट गेली आणि अंधार झाला. एवढ्या हसल्या होत्या ना त्या तेव्हा.. चित्राची वाट लागेल, मार्क किती मिळतील याची पर्वा न करता हा मुलगा असा काहीतरी विचार करून असा प्रयोग करायचे धाड्स करतो हे त्यांना कुठुनतरी आवडले. शेवटपर्यंत त्यांनी मला या चित्रावरून लक्षात ठेवले होते.

 

चौथा क्रश - नववीमध्ये - अर्थात पुन्हा बाईच - किंवा मॅडम बोलूया कारण या बाई शेजारच्या ईंग्लिश मिडीय़ममधील होत्या. मी वार्षिक स्नेहसंमेलनात नाटकात भाग घेतला होता. या आमच्या ग्रूपला मदत करायला आल्या होत्या. माझी वेषभुषा मध्ये मला धोतर घातला होता. पण १ नंबर लागली म्हणून मी तो सोडला होता. आणि परत घालायला जमत नव्हता त्या नादात आणखीनच विस्कटला. अश्यावेळी या मॅडम मदतीला धावल्या आणि मला स्वताच्या हाताने धोतर घातले. स्वर्गसुख म्हणजे काय असते हे मला त्या दिवशी समजले. मग त्यानंतर मी नेहमी मित्रांना घेऊन संध्याकाळी शाळा सुटल्यावर ईंग्लिश मिडियमच्या बाहेर उभा राहायचो. तेवढेच कधीतरी यांचे दर्शन यांचे जाता जाता दर्शन व्हायचे. गुडईव्हनिंग मॅम बोलल्यावर गोडश्या हसून मात्र नक्की जायच्या.

हायला... आमच्या वेळी असे काही न्हवते हो.. च्यायला आम्ही शाळाच नाही तर सगळी कॉलेज लाईफ पण वाया घालवली.. नुसत्याच उनाडक्या आणी मारामार्‍या.. असले भावनाप्रधान लोक न्हवतेच आमच्या वेळी..आम्ही आपले शिनुमातल्या हीरवणीवरच मरायचो.. Happy

भारी!

आमची शाळा आठवली Happy
क्रश(s) आठवले. एका मित्राची एक 'लाईन' होती. आख्खा वर्ग त्याला तिच्यावरून चिडवायचा. मीही चिडवायचो. पण फार वाईट वाटायचं. कारण ती माझीसुद्धा गुप्त लाईन होती Uhoh
एक मुलगा आणि एक मुलगी आहे म्हणे तिला आता.. Proud

<< udayone | 30 March, 2012 - 17:58 नवीन
देवा तू मला ५ -६ वर्ष आधी जगात पाठवलं असत तर तुझ क्काय बिघडल असत का रे >>>>>. आयला हा प्रश्न आम्हाला का नाही पडला........ बहुतेक आम्ही मुल...सचिन तेंडुलकर चे चाहते आहोत म्हणुन नाही असेले प्रश्न पडत
>> १०००%! कोणाकडून कुठली प्रेरणा घ्यावी याबद्दल काही ठोकताळे असतात.
सचिन आणि विनोदची जोडी अशीच Light 1

अरे वा इतक्या प्रतिक्रिया "आज का दिन बन गया "
सर्व वाचकाचे मनापासुन आभार Happy

नमस्कार मी मा.बो.वर नविन आहे ( लॉगिन ७-८ महिन्यापुर्वीच केले होते पण अमळ पासवर्ड विसर्ल्यामुळे इतक्या दिवसानी आल्ये मायबोलीवर ) Happy
मला एक प्रश्न विचारयचा आहे इथे मायबोलीवर खुप विभाग आहेत त्यामुळे माझी गोची होत आहे सध्या ,
मला जर एखादी पाकक्रुती टाकायची असल्यास नक्की कुठ लोड करावी लागेल ? इथे मला इन्डेक्स मध्ये पाक. विभाग दिसत नाहिये कुणी मदत कराल का प्लिज ?

छान!:स्मित:

मस्त Happy कोणी केयुर सरांचे ( कार्ला शुक्ला क्लास ,जीवशास्त्र ) पंखे आहेत का ईथे ? किती मुली मरायच्या त्यांच्यावर ,:)

तुमचा अभिषेकच्या पोस्टवरची माझी प्रतिक्रिया दिसत नाही इथे...

चौथीतच क्रश, बोलती बंद

यात काही वावगे आहे का? तसं असेल तर हरकत नाही.

Pages