पहिला पहिला क्रश ......

Submitted by पियु१२३ on 30 March, 2012 - 01:32

पहिला पहिला क्रश ......

प्रत्येकाच्या आयुष्यात हा दिवस येत्तोच (अपवाद वगळता)
आमच्याही आयुष्यात हा दिवस तसा जरा लवकरच आला असेच म्हणावे लागेल .
त्यावेळी मी नववीत असेन ,आमच्या धिंगाणेबाज कंपूत आम्ही ५-६ मुली होतो आमच्या वर्गात दोन मॉनिटर होते एक मुलांचा ,आणि एक मुलींची ,(ती मी होते )
त्यामुळे काही मुली माझ्यावर नेहमी खार खाऊनच असायच्या
वर्ष संपत आले होते जवळ जवळ, पण ग्रुप मधल्या काही मुलींमधला
बदल थोडा उशिराच लक्षात आला माझ्या !
म्हणजे तमुक तमुक मुलगा दिसला कि चोरून चोरून स्मैलींची देवाणघेवाण.......
चोरून चोरून चिठ्या - चपट्या, गाणी गुणगुणन, ...
(मुलींसाठी )सक्तीची दोन वेण्या आणि काळी रिबीन असताना हि कधीकधी पोनी बांधन, दोन चार केसांची बट मुद्दाम गालावर रुळवन, आणि म्याड्मचे वेणी का नाही घातली ? म्हणून बोलणे खाण.....
आणि विशेष ज्यां -ज्यां कबुतरांच्या जोड्या जमल्या होत्या ती टाळकी आम्हाला नेहमी टाळायचे ......खेळायला पण आणि अभ्यासाला पण .....
गंमत अशी कि ज्या मुलींशी आमची खुन्नस होती त्या बाकी मला जरा टरकायाच्या जरा नरमाईने वागायच्या ... (मी कधी त्यांच्या घरी पचकले (त्यांच्या प्रेमप्रकरणावर )तर नसती पंचाईत !म्हणून बहुतेक )
मला आणि कपूला (कल्पिता ) इंटरेस्ट, त्याना चिडवण्यात वाटायचा
वर्गाच्या खिडकी जवळच बेंच होता आमचा ,बाहेर येणारे जाणारे आणि विशेष आत डोकावणारे या सर्वावर आमचा डोळा असायचा
" ए गौरे......................देखो तेरा शाहरुख जा .... रहा हे हे हे ....
हि हि हि हु हु हु ...
गौरी लगेच बद्कासारखी मान उंचावून पहायची ...........
काय पण सोल्लिड मजा यायचीत्यांना चिडवायला .........

शाळेच्या रस्त्यावरच एका छोटस टपरीछाप कॅन्टीन होत आणि त्या शेजारीच एक मावा(मटका) कुल्फी , सरबत ,रॉयल कुल्फीची गाडी लागलेली असायची भर दुपारी उन्हात मावा कुल्फी खाणे म्हणजे अहाहा....सारा थकवा पळून जायचा ......पण सध्या आम्हाला फुकट मध्ये मावा कुल्फी मिळायची कारण ओळखीची एक दोन कबुतरांची जोडी तिथे लुडबुडत असायची आणि आम्ही त्यांना पाहिलं हे
(त्यांच्या मुद्दाम लक्षात आणून द्यायचं )

त्याच्या लक्षात आल कि लगेच आम्हाला फुकटात कुल्फी नाहीतर सरबत फ्री फ्री फ्री ......................
दिवाळीच्या सुट्ट्या सम्पल्या ,आमचे आवड्ते स्पोर्ट days आले
आम्ही रनिंग मध्ये भाग घेतला होता नेमकी जिंकायच्या बेतात असताना मध्येच माझा टांगा कल्टी झाला बाकीच्या मॅडम धावत आल्या त्यांनी मला हाताला धरून साईडला घेतले ,पाणी पाजले, आणी त्यात ते पण होते विनय सर ......

आमच्या फुटलेल्या ढोपराणा त्यांनी हळुवार मलम लावले आणि तिथून पुढे......... माझ आयुष्य काही दिवसासाठी प्रेमाच्या झोक्यावर बसून हिंदोळ्या खाऊ लागल.
मला काय झाल हे मलाच समजत नव्हत न अभ्यासात मन लागेना ना खेळण्यात ! मला पण अचानक प्रेमाचा साक्षात्कार झाला होता ...
आणि तो हि आमच्या विनय सरांवर (अरे बाप रे) !!!!
विनय सर , २४-२५ वर्षाचे ,जॉग्रोफी शिकवायचे ,गोरा रंग ,कुरळे केस ,नाजूकसा चष्मा , बोलणे हि अगदी मृदू !(त्यामुळ मुली फार मरायच्या त्यांच्यावर ,आणि मुल जळायचे त्यांच्यावर )
वर्गात आले कि पहिला सुविचार वाचणार (लिहिणारी मीच ) ...मग तासाला सुरुवात ....
शिकवण पण कित्ती छान ,मधेच एखाददुसरा विनोद करून सर्वाना हसवणार मधेच एखाद्या झोपाळूला टपली मारणारत्यांना त्यांची खुर्ची नेहमी स्वच्छ हवी असे ,एकदा त्यावर धूळ दिसली तर त्यांनी " बोरसे (मुलांचा monitar ) ला बोलावले
"ये बोरसे ये खुर्चीवर बैस ...लाजू नको बैस बैस ....त्याला सुरुवातीला काही कळलेच नाही सर का अस म्हणताय ?
तो लाजत लाजत खुर्चीवर बसला आणि त्याची प्यांट
मागून खडूच्या धुळीन पांढरी झाली तेव्हा सर्व वर्गात हास्याचे तुषार उडाले होते
बिचारा ..........
सर ;-"बोरसे समजले ना तुला काय ते ?" उद्यापासून धूळ दिसली नाही पाहिजे ओके ...monitar ना तू?
त्यांच्या अश्या गमती -जमती मूळ हसून हसून वाट लागायची
त्यांचा तास संपूच नये असे वाटायचे मला !
आता रोज सकाळी आम्हाला " खरा तो एक ची धर्म जगाला प्रेम अर्पावे ", " "शेजार्यावर प्रेम करा" "

"तुम्ही जेवढे प्रेम जगाला द्याल ,त्याच्या दुप्पट तुम्हाला मिळेल"

हेच सुविचार आठवायचे
सगळ्यां जोडप्यांना चीडवणारी मी आता मला त्यांची अवस्था समजत होती...........
मला कुठलाही पिक्चर पहिला कि विनय सरच हिरो म्हणून दिसायचे भले तो, सलमान असो कि शाहरुख .....मन अगदी पिसासारख अलगद, " कभी इस क्लास में, कभी उस क्लास मे" त्यांना शोधायचं
ते दिसले कि पाहून गोड हसायचं, ते पण हसायचे ........
वर्गात त्याचंपण सारख पियू आज सुविचार छान लिहिला ,अक्षर छान आहे तुझ !
"तू टेस्ट मध्ये छान स्कोर केला ह ! कीप इट up गुड ........"

आमची स्वारी एकदम हवेत ..................
असेच आमचे आयुष्यातले मोरपिसा सारखे सुंदर दिवस मजेत चालले होते
होते पण पण
अचानक तो दिवस आला ....
"पियू जरा इकडे ये ....काय सर '"
सर ; -आग त्या प्रभा मॅड्म बरेच दिवस झाले आजारी आहेत त्यांना भेटलीस का तू ?
(मी अन तिला भेटेन अशक्य ! एक नंबरची खडूस,पण ह्यांना काय पडलाय तीच )
मी : नाही हो सर, का?
सर : तुला माहित आहे का त्या कुठ राहतात?
(डोम्बल तुमच कशाला भेटताय ? दाल मे कुछ काला तो नही)
मी :चअज्जिबात माहिती नाही हो सर मला त्या कुठ राहत्तात!
सर : होका जाऊदे , अग मला कुणीतरी सांगितलं कि पियू त्यांच्या घरी
डान्स प्र्याक्टीसला जायची म्हणून सहज विचारलं ! (कुणी काडया केल्या कुणास ठाऊक )
शाळा सुटली तरी तेच विचार
विनय सर कशाला चालले तिकडे मरायला नसता खुराक डोक्याला माझ्या .........
दुसर्या दिवशी सकाळी सकाळी आधी विचारले "भेटले का हो सर तुम्ही प्रभा मॅड्मला......"
सर : नाही ग वेळ नाही मिळाला आणि तश्यापण त्या आल्या आहेत शाळेत आज !
हो क्का (हुश्श... .......................बर झाल )मरून दे ..
आम्हाला अस सुखी बघन देवाला खटकल की काय जाने?
आम्हाला चिकन pox (कांजण्या )झाल्या आणि सर्व चेहरा भर पसरल्या
डॉक्टरांनी त्या बर्या होई पर्यंत शाळेत जाऊ नको ह ! नाहीतर दुसर्यानाही होतील असा प्रेमळ सल्ला दिला
म्हणजे काय १०-१५ दिवस घरी .....नही............बोंबला...............
कांजण्या पेक्षा विनय सर दिसणार नाहीत भेटणार नाहीत ह्या विचाराण गलबलून आल मला Sad
एक एक दिवस कसा कसा गेला मला विचारू नका !
आणि शेवटी तो दिवस आला आणि आम्ही सायकलवरून शाळेकडे
प्रस्थान केले
८.१५ ची शाळा असून एरवी आम्ही ८.२५ पोहचून ग्राउंडला दोन राउंड मारायचो
आणि आज चक्क ८ ला पोहचून आम्ही विनय सरांची आतुरतेने वाट पाहत बसलो ........प्रार्थना झाली,वर्गात जाउन बसलो.सुदैव माझ पहिला तास भूगोलाचाच होता माझ सर्व लक्ष दाराकडे आत्ता येतील मग येतील १० मिनिट झाली ....
मध्येच सायन्सच्या मॅड्म टपकल्या आणि सायन्सचा तास सुरु झाला
मी वेळापत्रक तीनदा चेक केले अरेच्या हे कस काय बुवा ?
मी कपुला कोपराने ढूसनी दिली " हे काय ग कपू मॅड्म भणजाळली का ?
भूगोलाचा तास आहे ना?
अन काय ग विनय सर कुठाय ?
आले नाही का आज ? बर नाही का त्यांना ?
कपू हळूच : चुप्प ए " बावळे जस काय तुला माहितच नाहीं"
मी : आईशपथ !! सांग कि क्काय क्काय ?सांग न प्लीज ?
आग त्याचं लग्न झाल ५-६ दिवसापूर्वी प्रभा मॅड्मशी ...
मी : क्काय ?कधी? कस? केव्हा ?

(कपू अक्ख्या वर्गाची नव्हे शाळेची जेम्स बॉंण्ड होती अस म्हटल तरी चालेल, पट्ठीला सर्व खबरबात असायची )

कपु : "छुपे रुस्तुम होते दोघ पण, लव्ह मॅरेज केल त्यांनी ,आता १५ दिवस रजेवर!

हे ऐकूनच माझ्या डोक्यात हजार घंटा वाजू लागल्या टन टन टन..........

"प्रभा sss ई....... ती दात फारुळी ,सश्यासारखे दोन दात पुढ आलेली खडूस, ती आवडली ?

क्काय पण चॉइस आहे विनय सरांचा .....?

कुठ विनय सर अन कुठ ती ? बाकीच्या मुली (मी ) मेल्या होत्या का ?

कपू :" अबे जाऊ दे ना ,तुला काय इतक ? ती म्हण आहे ना " दिल आया गधी..पे ..........."अपनेको क्या फरक पडता हे ?

हम्म्म........(फरक तो पडता हे भाई तुम नहीं समझोगी ") Sad

"देवा तू मला ५ -६ वर्ष आधी जगात पाठवलं असत तर तुझ क्काय बिघडल असत का रे ?"

(हे बालिश विचार तेव्हाचे ,म्हणून भाषा तशीच वापरली आहे, गुरूंचे स्थान आदरणीय आहे ) Happy

गुलमोहर: 

कांजण्या पेक्षा विनय सर दिसणार नाहीत भेटणार नाहीत ह्या विचाराण गलबलून आल मला>>> Lol
छान लिहल आहेस ग पियु..मला माझे क्रश आठवले सगळे Happy

"देवा तू मला ५ -६ वर्ष आधी जगात पाठवलं असत तर तुझ क्काय बिघडल असत का रे ?">>>>>>>>>>>>>> Lol
एकदातरी प्रत्येकाला हा प्रश्न पडतोच पड्तो Happy

छान Happy

@ युरी
अग मी काही म्हातारी वैग्रे नाही झाले ग अजुन लक्षात न रहायला Wink

पुन्हा
अरे बाबा.. खूप बारीक सारीक डिटेल्स आहेत. ते लक्षात राहीलेत म्हणून कौतुक केलंय उलट

ओकिज रे ,धन्स अ लॉट Happy

छान Happy

ताबडतोब हि कथा 'शाळा' च्या दिग्दर्शकांना पाठवा ! Part-2 करतायत म्हणे! Lol

Jokes Apart.... छान लिहिलय... मजा (आणि आठवण!) आली वाचताना!

मी अजुनहि विचार करतोय माला जी मुलगी आवडची शळेत असताना.. ती नक्कि का आवडलेलि त्या वेळी ! Happy

असो....! चालायचचं !!!!

देवा तू मला ५ -६ वर्ष आधी जगात पाठवलं असत तर तुझ क्काय बिघडल असत का रे >>>>>. आयला हा प्रश्न आम्हाला का नाही पडला........ बहुतेक आम्ही मुल...सचिन तेंडुलकर चे चाहते आहोत म्हणुन नाही असेले प्रश्न पडत Lol

"देवा तू मला ५ -६ वर्ष आधी जगात पाठवलं असत तर तुझ क्काय बिघडल असत का रे ?">>>> Lol

पियु, खुप्प्प्प मज्जा आली गं... Happy

नानुभाऊ +१.... शाळा पार्ट २ नक्कीच बनेल यावर. Happy

छान आहे हे Happy
ये सबको होताहे क्या का फक्त मुलींना होण्याच प्रमाण जास्त आहे Happy ह्याला क्रश म्हणायच अन ते हलकं घ्यायच हे अम्हा पोरांना माहीतीही नव्हतं नायतर लय जण वाचले अस्ते कारण ती दिव्या गेली तव्हा निम्मा वर्ग टकला झालता आमचा Happy

मस्त!

दादाश्री Lol जेंव्हा हा सो कॉल्ड 'क्रश' होतो, तेंव्हा त्या त्या वेळी त्याला प्रेमच म्हटलं जातं आणि हलकं बिलकं काही कोणी त्या वेळेला घेत नसतं... मागे वळून पाहतांना आपण या सगळ्याकडे विनोदबुद्धीने पाहू शकतो, त्या वयात ही अवस्था जीवघेणीच असते, मुलं असो नाहीतर मुली- सर्वांसाठीच... Happy

मस्त गं पियु.....काय छान लिहिलेस.....घाव वर्मी लागला होता ....वर्णन ढासू आहे....

शाळासारखं मुलींसाठीपण एक पुस्तक काढायचंय का तुला?? सुरू कर लिहायला....तुझी मेमरी तशी पण चांगली आहे......

श्शी !
शाळेत वैगेरे असताना क्रश बिश झालंच नाही मला
आईच्या शाळेत होते ना Sad एकतर सगळे मुलं मला आणि मी आईला टरकुन असायचे त्यामुळे आमच्या डोक्यात असे प्रकाश खरच पडले नाहीत
गपचुप दर वर्षी प्रत्येक मुलाबरोबर रक्षाबंधन साजरं करायचे मी
ती गंमत मिसलीच मी Sad Sad Sad
पण खर सांगायच तर माझ्या वर्गात पण कोणत्याही मुलीच "असं" काही नव्हतं
मुलांचे होते क्रशेश... आता एक एक बाहेर पडतायेत Happy
आता भेटलो की एक एक किस्से ऐकुन आम्ही सगळ्या मुली थक्क होतो

Pages