उद्योजक ओळखा स्पर्धा (२)

Submitted by माध्यम_प्रायोजक on 30 March, 2012 - 01:26

धडपड हा तसा प्रत्येक उद्योजकाच्या कारकिर्दीचा अविभाज्य भाग. उद्योगाची सुरुवात, परिश्रम, आलेले चढउतार, चाखलेलं यश, अपयशाला धीरानं तोंड देणं अशा काही पायर्‍या या प्रत्येकाच्याच व्यावसायिक आयुष्यात दिसून येतात. बर्‍याच उद्योजकांचा हा प्रेरणादायी प्रवास आपण कुठेना कुठे वाचलेला असतो. त्यातल्या घटनांमुळे तो आपल्या लक्षातही राहिलेला असतो.

'मसाला' हा चित्रपट मांडतो कहाणी एका उद्योजकाच्या धडपडीची...

या चित्रपटाच्या निमित्तानं आम्ही घेऊन आलो आहोत एक आगळीवेगळी स्पर्धा - 'उद्योजक ओळखा'.

चला तर मग खेळूया 'उद्योजक ओळखा' हा खेळ..

या स्पर्धेतले दुसरे उद्योजक ओळखण्यासाठी क्लू -

चित्र क्र. १.

uospardha2-1.jpg

चित्र क्र. २.

uospardha2-2.jpg

चित्र क्र. ३.

uospardha2-3.jpg

चित्र क्र. ४.

uospardha2-4.jpg

चित्र क्र. ५.

uospardha2-5.jpg

चित्र क्र. ६.

uospardha2-6.jpg

या सहा क्लूंचा वापर करू तुम्हांला या उद्योजकाचं नाव ओळखायचं आहे.

खेळाचं स्वरूप आणि नियम येथे पाहता येतील.

एक महत्त्वाची सूचना. Happy

उत्तर देताना तुम्हांला या तिन्ही (किवा सहाही) क्लूंचा उद्योजकाशी काय संबंध, हे सांगायचे आहे. पूर्ण स्पष्टीकरण नसेल, तर उत्तर ग्राह्य धरलं जाणार नाही. शिवाय, 'अमुकतमुक हे उत्तर का?' अशी प्रश्नात्मक उत्तरंही (त्यात उद्योजकाचे नाव बरोबर असले तरी) ग्राह्य धरली जाणार नाहीत. Happy

सर्वप्रथम बरोबर उत्तर देणार्‍या विजेत्यास मिळतील 'मसाला' चित्रपटाच्या खेळाची २ तिकिटे!

आपली उत्तरं या बाफावर लिहा (स्पष्टीकरणासह Happy )आणि जिंका 'मसाला' चित्रपटाची दोन तिकिटं..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर दोराबजी टाटा.. अगदी बरोबर... पहिल्या चित्रात ते काहीतरी राक्षसी बॉक्सिंग तत्सम खेळून सर फोडतात..म्हणून सर.. दुसरे बायनरी कोड- दो-राबजी.... आता तिसरे टाटा कसे जुळवायचे? Light 1

केशुब महिंद्रा.
१. महिंद्राची फुटबॉल टीम आहे.
२. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी आयटी क्षेत्रातही आहे.
३. केशुब महिंद्रा मुळचे कराचीचे.

पहिल्या चित्रावरुन दोन संघातले वैर.. म्हणजे दोन घराण्यातले वैर..
दुसर्‍या चित्रावरुन द्विमान पद्धती.. त्या संदर्भातील नाव किंवा व्यक्ती...
तिसर्‍या चित्रावरुन. ती व्यक्ती पाकिस्तान मध्ये जन्मलेली..

पहिलं चित्र बास्केटबॉलचं आहे.... लेकर्स आणि सेल्टीक मधल्या वैराचं.. २०१० साली कोण विजेता होणार त्यासंदर्भातले.. २०१० शी काही तरी संदर्भ असावा..

बिल गेट्स.

पहिलं चित्र एक्स बॉक्स चा गेम NBA 2k10 हा संदर्भ
दुसर्या चित्रातील बायनरी कोड
शेवटच्या door patient dept ह्यातील door ह्या वरून काढलेला तर्क.

अक्ष्ररी, मला पण पहिल्यांदा तेच डोक्यात आले होते पण पहिल्या चित्राचे प्रयोजन कळत नाही आहे.
मग हे सापडले.A new Kinect Sports 2 Basketball activity was unveiled today as part of Microsoft’s $1M sponsorship of the Right to Play charity

पहिल्या चित्रात प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व (मायक्रोसॉफ्टचे होते/आहे)
दुसर्‍या चित्राततले बायनरी कोडस (सॉफ्टवेअर रिलेटेड)
तिसर्‍याचित्रातील गेट

बिल गेटस

Paul Allen (पॉल एलन)

बिल गेट्स बरोबर मायक्रोसॉफ्ट सुरु केली.

पहिलं चित्रं NBA संदर्भ पॉल कडे Portland Trail Blazers of the National Basketball Association (NBA) ही टीम आहे.

त्याने बिल गेट्स बरोबर मायक्रोसॉफ्ट सुरु केली. ates and Allen formed a partnership they called Micro-Soft, a blend of "micro-computer" and "software."

Microsoft (Gates and Allen dropped the hyphen in less than a year) started off on shaky footing. Though their BASIC software.....

दुसर्या चित्रातील बायनरी कोड - 101010 binary is basic computer code.
शेवटच्या door patient dept ह्यातील door = गेट्स वरच्या तर्काचं परत हेच स्पष्टीकरण. Happy

माप्र, काही लिहीत नाहीत, म्हणजे उत्तर वेगळ आहे दिसतय. पुढचे क्लू मागायचे का? की अजून थांबूयात.

एवढ्यातच नवे क्लू? Proud
अजून थोडा विचार करा... उत्तर अगदी सोपं आहे.. वरच्या काही पोस्टींमधल्या काही गोष्टी नीट बघा. त्यांचे कदाचित काही वेगळे अर्थही असतील. Happy

हिम्सच्या म्हणण्याप्रमाणे २०१० शी काही तरी संदर्भ असावा..
हे जर एक शक्यता म्हणुन विचारात घेतले तर....
२०१० मध्ये फायनान्शियल क्रॉनिकलने द बिझीनेसमॅन ऑफ द इयर म्हणून निवडले होते श्री. मुकेश अंबानी यांना.
लेकर्स किंवा सेल्टिक प्रमाणे त्यांचा देखील स्वतःच्या मालकीचा एक क्रिकेट संघ आहे 'मुंबई इंडियन्स'
रिलायन्स आय.टी. तसेच टेलिकॉम क्षेत्रातही आहे जिथे बायनरी कोडींग वापरले जाते.
पण तिसरा क्ल्यु काय सांगतोय?

मुकेश अंबानी टेलिकॉम क्षेत्रात नाहीये हो Happy तसं बघायला गेलं तर घरची गरज वगळता आय.टी. मधेही नाहीये.

ऊप्स Lol Proud

हे "धीरूभाई अंबानी" असावेत.......................

पहिला क्ल्यू - गोल्ड असावा
दुसरा क्ल्यू - शेअर मार्केट
तिसरा क्ल्यू - हॉस्पिटल (कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल - धीरूभाईंचे स्वप्न)

अनुराग दिक्षित --- ऑनलाईन पार्टी गेमिंग
बास्केटबॉल आणि बायनरी कोड -- ऑनलाईन गेमिंग कडे अंगूली निर्देश करतायेत,
batkhela.com ही अजून एक ऑनलाईन गेमिंग साईट आहे.

अनुराग दिक्षित अतिशय यशस्वी भारतीय 'ऑनलाईन पार्टी गेमिंग' ऊद्योजक.

मधलं चित्रं सॉफ्टवेअर क्षेत्रं दर्शवतं. पहिलं चित्रं प्रतिस्पर्धी आणि तिसर्‍या चित्रात कमान दिसत आहे. म्हणून पहिलं आणि तिसरं चित्रं मिळून बनतात 'आर्च रायव्हल्स'. सॉफ्टवेअर क्षेत्रातले आर्च रायव्हल्स आहेत - मायक्रोसॉफ्ट आणि अ‍ॅपल म्हणजेच बिल गेटस आणि स्टिव जोब्स.

वरचं एकही उत्तर बरोबर नाही. Happy

हे घ्या पुढचे क्लू -

चित्र क्र. ४.

uospardha2-4.jpg

चित्र क्र. ५.

uospardha2-5.jpg

चित्र क्र. ६.

uospardha2-6.jpg

उत्तर खूप सोपं आहे, मंडळी Happy

चित्रांकडे, चित्रांमधल्या शब्दांकडे थोडं नीट लक्ष द्या, म्हणजे लगेच उत्तर सापडेल.

पहिली तीन चित्रे डोक्यावरून गेली होतीच. चौथ्या चित्रात वेताळ आणि विक्रम आहेत असं वाटतय. पाचवे चित्र हॅरी पॉटरचा पुस्तकं. सहावे चित्र कुठलेतरी टेक्नोलॉजी हॉस्पिटल वाचून अधिक भंजाळले. Proud

बास्केटबॉल, बायनरी कोड, हॉस्पिटलचे गेट, विक्रम वेताळ, हॅरी पॉटर आणि टेक्नॉलोजी हॉस्पिटल. Sad
Sad

Pages