लहान मुलांच्या आजारपणानंतर....(वय वर्षे १ -५)

Submitted by वेका on 29 March, 2012 - 16:10

लहान मुलांच्या आजारपणानंतर....(वय वर्षे १ -५)

आता उत्तर अमेरीकेत सगळीकडे हिवाळा संपत असेल म्हणजे ज्यांच्याकडे मुलं विशेषतः १ -५ वयोगटातली आहेत त्यांच्याकडे सर्दी,खोकला,ताप या सर्वांचा जोमाने सामना करून झाला असेल किंवा काहीजणांकडे हे पाहुणे अद्यापही असतील....मायदेशात विशेषतः मुंबईत तर सर्दी,खोकला नाही अशी १-५ किंवा त्यापुढची मुलंही कायम असतात..प्रदुषण,पाळणाघरं काय असतील ती कारणं..

पण जेव्हा हे तिन्ही आजार किंवा कुठलाही आजार जातो आपल्याबरोबर आपल्या सानुल्या/सानुलीचं आपण मेहनत करून वाढवलेलं वजन घेऊन जातो.....कपडे काढले तर ही मुलं काहीवेळा इतकी बारीक दिसतात की पालक म्हणून आपल्या डोळ्यात पाणीच येतं..अर्थात आता झालं ते झालं..पुढे काय?? म्हणून हा धागा..

ज्यांच्याकडे या विषयीचा पुर्वानुभव आहे त्यांनी कृपया मदत करावी जेणेकरुन इतर पालकांनाही मदत मिळेल.....

माझ्या डॉक्टरने इतक्यात दिलेल्या काही टीपा...

१. त्याला चांगले फ़ॅट्स दे उदा. अ‍ॅव्होकाडो...बटर प्रचंड प्रमाणात वापरू नकोस असं तिने खास सांगितलं...मी बटरचा अर्थ तूपही घेऊ का??
२. दर दोन तासांनी काहीतरी छोटं छोटं खायला द्यायचं जसं फ़ळं (ज्युस नको)
३. वय वर्षे दोन नंतर दुधाचं प्रमाण दिवसाला दोन कपांपेक्षा जास्त नको म्हणजे ते इतर पदार्थ खातात...
४. त्याला चालत असतील तर सुकामेवा अक्रोड, बदाम खायला द्या.
५. आठवड्यात तीनवेळा तरी अंडी (खात असतील त्यांनी)

तुम्ही वजन वाढवण्यासाठी आपल्या लहानग्यांना काय काय देता?? भारतीय पद्धतीच्या पदार्थांची माहिती दिलीत तर आणखी बरं....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या मुलाला खाण्यापिण्याच्या प्रचंड आवडीनिवडी आहेत. शाळेत तो डबा खात नाही म्हणजे योगर्ट पूर्ण संपतं. फळं अर्धी संपतात आणि मेन जेवण पाव संपतं. घरी आल्यावर दूध पिऊन काहीतरी खातो. रात्री शक्यतो भाज्या, मूगडाळ घालून खिचडी किंवा मग भाज्या घालून पराठे हे मनापासून खातो. पोळी विशेष आवडत नाही त्याला.

आपल्या सानुल्या/सानुलीचं आपण मेहनत करून वाढवलेलं वजन घेऊन जातो.....कपडे काढले तर ही मुलं काहीवेळा इतकी बारीक दिसतात की पालक म्हणून आपल्या डोळ्यात पाणीच येतं>>> हे अलिकडेच अनुभवले. Sad
चांगला धागा. वाचत आहे.

मिल्क पावडर दूध, सिरियल्,भातामधे वगैरे मिसळल्यास प्रोटीन आणि कॅल्शियम पटकन वाढतात.मुले, मोठी माणसे सगळ्यांसाठी छान..
कधी बाळाचा मूड खाण्याचा नसल्यास पेडियाशुअर द्यायला हरकत नाही.

स्नेहा, पिडियाशुअरचं लेबल वाचलंस का तू ?? मला त्यात दूध कमी आणि पाणी/साखर जास्त वाटतं..एक आहे मुलांना ते आवडतं....
बस्के, अनुभव इथेही ताजेच आहेत म्हणून हा धागा सुरु करतेय...
खिचडी आजारपणातपण तीच दिलेली असते म्हणून बदल म्हणून मी पराठे देते...फ़क्त माझा मुलगा दही खात नाहीत...फ़्लेवर्ड योगर्ट म्हणून इथे जे काही मिळतं ते बहुदा साखरेमुळे खात असावा पण मी साखर फ़ार द्यायच्या मतात नाहीये..त्यामुळे मग त्याऐवजी पराठ्यात किसलेलं चीज घालते.....
आणखी एक पाहाते मी माझ्या मुलाला तरी कधीही पिनट बटर जेली सॅंडवीच फ़ार आवडतं..म्हणून मी कॉस्को/टिजे मध्ये मिळणारं अल्मंड बटर आणते आणि पाव धान्याचा अस्तो.....
गुळ-तूप-चपाती पण मुलं खातात ...आणि साखरेपेक्षा गूळ बरा.....देशातून कुणी आलं तर मी तिथला रसायन विरहीत गूळ आणून पुरवून पुरवून वापरते...अमेरीकेत तो गूळ मिळतो का??

लहान खूपच पिकी आहे ..हे आवडेल ते आवडेल ..किती हि विचार करून आपण डब्बा दिला.. तरी घरीच येत.. अगदी भूक लागली तरच डब्बा संपतो..
मी घरी मात्र तूप टाकून खिचडी, वरण भात किवा वरण पोळी पराठा केच अप खावू घालते.. संध्याकाळी त्याने दुध टोस्ट, भडंग (चिरमुर्याचा चिवडा ) असं काही खाल्लं कि तो जेवत नाही .. मग आमचं जेवण झालं कि ९ नंतर जेवू घालते.. तेव्हा भूक असली तर खातो आणि सगळं संपवतो .. ह्यातलं काहीच खाल्लं नाही तर आधी मी शेवयाची खीर, भाताची खीर, दलिया खीर किवा शिरा करून खावू घालायची आता पेशंस संपतो.. आजारातून उठला तर करून देते.. त्याला खोकला नसला तर तुपाने त्रास होत नाही.. बटर आणि तूप यात नक्कीच फरक आहे.. ज्या डॉक्टरला तो फरक माहिती आहे ते नक्की द्यायला सांगतील.. माझ्या अमेरिकन डॉक ने स्वतः रिसर्च करून हो सांगितलंय.. तरी हि मी बघते आधी कारण उलटी काढायचे चान्सेस जास्त असते तेव्हा फार देत नाही..
बाकी वेळेस ---
काजू/बदाम, मनुके, खजूर हे आणि कुठलही एक फळ देते..
त्याला गोड खूप आवडतं त्यामुळे राजगीर्याचा लाडू किवा चिक्की देते.
त्याची सर्दी/कफ खूप दिवस असते ..दुध तसं हि देता येत नाही पण तो लिंबू आणि मध टाकलेलं गरम पाणी पितो ते सिप्पर मध्ये टाकून देते.. नाही तर साध लिंबू पाणी पण पितो..
किवा आल्याचा रस, मध, पाणी देते.. त्याने कफ कमी होतो..
खाकरा, भडंग जे सहज तो खावू शकेल आणि थोडी भूक हि राहील असं काही तरी देते..
बाकी वेळेस डोसा, आयते/धिरडे, पेसरतू जे म्हणेल ते लग्गेच करून देते (अर्थात संध्यकाळी Sad किवा घरी असेल तेव्हा )

आमच्या इथे सध्या तर tonsils वाढलेत आणि त्याला अलर्जी आहे त्यामुळे थंडी आहे म्हणून विंटर मध्ये, स्प्रिंग/फाल वातावरण बदल म्हणून उन्हाळ्यात थंड गरम खावून त्याची सर्दी कधीच थांबत नाही... म्हणजे २ दिवस असते आणि १ दिवस नसते अशी गतं असते.. त्यामुळे डॉक ने पण आशा सोडली आहे.. त्याचं वजन वाढण्याची.. पण तो इतका active आहे कि ती मला स्पेशल काही सांगत नाही

आजारपणातून उठल्यावर वजन वाढण्यासाठी पौष्टीक आणि पचायला हलके म्हणून सत्तूचे पीठ, नाचणीचे सत्व, डाळ्याचे लाडू, बदामाचे कूट घालून गोड शीरा देता येइल. नुसते डाळ-तांदूळाचे डोसे करण्या ऐवजी कुळीथ घालून डोसे करायचे. इडल्याही करता येतील्. आवडत असेल तर मॅश पोटॅटो, स्क्रॅबल्ड एग, भाज्या, चिकन आणि होलविट पास्टा घालून सूप देता येइल. सुके अंजीर, खजूर, खारीक, प्रुन्स, मनुका मुलं आवडीने खातात. सफरचंद आणि जोडीला आल्मंड किंवा पिनट बटर पण देता येइल. हनिनट चिरीओज स्नॅक म्हणून माझा मुलगा आवडीने खायचा.

स्वाती२ च्या प्रतिक्रियेला अनुमोदन.

सर्दीची लक्षणे दिसायला लागली.. जसे शिंका येणे, नाक बंद झाल्यासारखे वाटणे किंवा नाक गळणे....कि लगेच उपचार सुरु करायचे. गरम पाणी प्यायला द्यायचे, कोंबडी सुप, जेवणात अंड, ब्रॉथ मधे शिजवलेल्या भाज्या, भरपूर लसुण घालुन खिचडी खायला द्यायची. फुटाणे खायला द्यायचे.
झोपायच्या आधी वाफ द्यायची. झोपताना बाजुला नीलगिरीचे २-३ थेंब टाकायचे.

वजन वाढीसाठी माझ्या मुलाला (डॉ.च्या सल्ल्यानुसार) रोज ..whole milk+heavy cream, whole milk+ice cream, जेवणात रोज cheese द्यायचे. पण आता त्याचे cholesterol वाढले आहे.(HDL जास्त, LDL border वर) त्यामुळे आता cheese कमी देते अन heavy cream बंद.

चांगले fat आणि वाईट fat यासंबंधी http://www.helpguide.org/life/healthy_diet_fats.htm येथे छान माहिती आहे

दिवसातून एकदाच दुध पितो....ते pediasure/complan/carnation b'fast essentials अस आलटुन पालटुन देते.
सकाळीची न्याहरी गोड असते. त्यामधे दुधात शिजवून ओट्मील, दलिया, शीरा, quinoa, sweet potato किंवा yam-रताळे यापैकी एक देते. ते गोड करायला गुळ अन बारीक केलेला खजुर्/मनुका टाकते. अधिक काजु,बदाम्,पिस्ता, walnut याची पावडर टाकते. त्यानंतराचे जेवण शाळेत होते.
घरी आल्यानंतरचे (२)जेवण...... १.भाजी/चिकन्/अंड-पोळी/पराठा आणि २.भाजी-भात असं देते. त्याला देताना भाजी मधे वरुन १चमचा ऑलिव्ह तेल टाकते.
मधल्यावेळेत भुक लागली तर multi-grain बिस्किट,योगर्ट, चिरीओज, आवडीचे फळ,पौष्टिक लाडु, खजुर-प्रुन paste मधे केळे कुस्करुन देते.
जेवणाच्या वेळा ठरलेल्या असाव्यात आणि जेवणाच्या ३० मि. आधी काहीही खायला देऊ नये. जेवताना त्याच्या आवडीचे संगीत(कोणतेही instrumental) नक्की लावते मी. सकाळी लवकर ऊठवायलाही तेच करते Happy
पण सतत उड्या मारणं आणि कमी झोप या दोन गोष्टी बदलायला मला अवघड जात आहे Sad
माझा मुलगा(वय ३) खुप बारीक आहे....लोकांना त्याकडे बघुन वाटत असेल...'याची आई याला पुरेसं खायला देत नाही वाट्ट' Sad

पण आता त्याचे cholesterol वाढले आहे>> ३ वर्षाच्या मुलाचे पण कोलेस्ट्रॉल वगैरे चेक करतात का? वयाच्या कितव्या वर्षापासून ह्या टेस्ट्स करतात? माझा मुलगा आता ८ होईल पण अश्या टेस्ट्स अजूनपर्यंत केल्या नाहीत.

सोनालीएस whole milk+ice cream...तुमचा मुलगा डॉक्टर आणि तुमच्यावर एकदम खूश होऊन नाचायला लागला असेल...

ते उड्या मारण्याचं आमच्याकडे पण तसंच....पण त्याची चांगली बाजू डॉ.म्हणते की याचा अर्थ त्याच्याकडे एनर्जी आहे...वजन हा प्रकार सगळ्या मुलांच्या बाबतीत वेगळा...(आणि तसंही लठ्ठ असण्यापेक्षा बरं) फ़क्त त्याचं ते कमी वजन आजारात घटतं त्याची चिंता मला जास्त....
आनंदाचं खाणं ही लेखमाला चांगली आहे....आणि दिनेशदा तुमचा आणखी एक धागा आहे नं ज्यात लहान मुलांचं खाणं लिहिलेय तेही...:)

स्वाती२ छान माहिती....माझ्याकडे फ़्रीजमध्ये सत्तुचं पीठ आहे ते काढते आता...(जुनं झालं नसेल होपफ़ुली)

मुले healthy असतील किंवा नेहमीचे आजार- सर्दी,खोकला,ताप असेल तर नाही सांगत.
पण माझा मुलगा underweight आहेच शिवाय त्याच्या medical condition मुळे आम्हाला दर ३-४ महिन्याला त्याची रक्त-लघवी तपासायला सांगतात. सुदैवाने खाण्या-पिण्यावर काही बंधने नाहीत. पण ईथे(अमेरिकेत)जरा जास्तच तपासणी करायला सांगतात. त्याची डॉ. गोरी बाई आहे. तिला ईथल्या मुलांच्या मानाने तो लहान वाटतो. आधी तर रोजच त्याला अंडी,कोंबडी,मटन खायला दे असे सांगायची. पण तपासणी अहवाल बघितल्यापासून गप्प आहे. मधे एकदा बोलली कि तुमची हरकत नसेल तर आपण growth hormone therapy चालु करु. मी नकार दिला तर लगेच Bone age test साठी X ray काढायला सांगितला....त्यात तो OK आहे हे पाहिल्यावर ती थांबली.

सर्दी वा चिकट कफ येत असेल तर दूध बिलकूल देवू नये. तसेही आजारपणात दूध पचायला जड असते लहानांना.
आपल्याला कळत पण नाही , चुकून अ‍ॅलर्जी देवलप होवु शकते.

पण सतत उड्या मारणं आणि कमी झोप या दोन गोष्टी बदलायला मला अवघड जात आहे अरेरे
माझा मुलगा(वय ३) खुप बारीक आहे....लोकांना त्याकडे बघुन वाटत असेल...'याची आई याला पुरेसं खायला देत नाही वाट्ट' अरेरे>>>>ह्याकडे कधी हि लक्ष देवू नये.. खरं तर आपण स्वतः सुद्धा हा गिल्ट ठेवायला नको मनात. एक तर आई म्हणून सगळ्याच जणी आपल्या परीने प्रयत्न करताच असतात कि आपल्या मुलांना योग्य आहार द्यावा .. त्यामुळे दुसर्यांच्या मुलांकडे बघताना माझा तरी दृष्टीकोन हा नसतो ..कोणाचाही नसावा पण काही लोकांना सवय असते खरी Sad लग्गेच रीयाक्त करायची

मधे एकदा बोलली कि तुमची हरकत नसेल तर आपण growth hormone therapy चालु करु. मी नकार दिला तर लगेच Bone age test साठी X ray काढायला सांगितला....त्यात तो OK आहे हे पाहिल्यावर ती थांबली.>>>

सोनाली , का कोण जाने (मदर इन्स्टिंक्ट म्हणा हव तर. शास्त्रीय नॉलेज मला नाही.) मला हे खुप चुकीचे वाटतेय डॉक चे सांगणे. कारण इथले डॉक नेहमी अ‍ॅज लाँग अ‍ॅज मुल आनंदी, उड्या मारणार, अ‍ॅक्टीव्ह दिसत तोवर त्याच्या वजनाची चिंता मुळीच करत नाहीत.
दुसर म्हणजे ग्रोथ चार्ट अमेरिकन मुलांच्या वाढीप्रमाणे असतो. सो नेहमीच एशियन मुलांची वाढ त्याप्रमाणे करुन चालणार नाही अस म्हणतात डॉक.
माझी मुलगी बारीक आहे. पण प्रचंड अ‍ॅकटिव्ह आहे. अजुन पर्यंत तिच्या वजनाची डॉकने चिंता केलेली मला आठवत नाही. हा आता जगातल्या तमाम आयांप्रमाणे मी करते कधी कधी ते सोडून द्या.

सोनाली, तुमच्या डॉक्टरांनी खरंच होल मिल्क + हेवी क्रीम द्यायला सांगितलं ? मूल कितीही कमी वजनाचे असेल तरी चांगले फॅट्स, चिकन ब्रेस्ट किंवा चरबी काढलेले नॉनव्हेज, २ % दूध, भाज्या असाच आहार सांगतात. एक ( का दोन ? मला नक्की आठवत नाही. ) वर्षानंतर होल मिल्क बंद करुन २ % दुधावर आणतात. भारत, अमेरिका, युके तिन्ही ठिकाणी आम्हाला सारखेच सल्ले मिळाले आहेत.
तुम्हाला घाबरवायचा अजिबातच हेतू नाही पण आजूबाजूच्यांशी बोलून डॉक्टर बदलता येतील का ह्याचा विचार करा.

होल मिल्क का द्यायचे नसते लहान मुलांना ? रोज सकाळी १ कप जे दूध मूल पिते ते २% च असावे की होल मिल्क चालेल ? ... डॉक ला पण विचारेनच.

सो नेहमीच एशियन मुलांची वाढ त्याप्रमाणे करुन चालणार नाही अस म्हणतात डॉक.>>अगदी..पण माझी गाय्नाक डॉक्टर माझ्या मुलाला पीनट बेबी म्हणायची.. आणि प्रेग्नंट असताना सुद्धा तिने मला सगळ्या टेस्ट करायला लावल्या होत्या.. कारण बाळ छोटं दिसतंय.. लकीली मुलांच्या डॉक्टर ने असं काही म्हटलं नाही.. तिने फक्त एकदा खात्री करून घेतली कि त्याला पचतंय का सगळं कारण १ वर्षानंतरचं त्याचं वजन आणि आत्ताच्या वजनात फक्त ७ एल्बी वाढ झालीय..

मला हि हे खूप जास्त वाटतंय. कधी तरी त्याच क्लिनिक मध्ये किवा बाजूच्या एरीयामधल्या डॉक ला दाखवून बघ.. हेवी क्रीम, चीज देवून बाकी हि फार परिणाम होतात.. माझ्या मैत्रिणीचा मुलगा फक्त सूप प्यायचा .. मग ती त्यात फिश, राइस जे काही ढकलता येयील ते टाकायची.. नंतर तिला सगळं बंद करावं लागला कारण दीड वर्षात मुलाने २० एल बी वाढवलं आणि त्याला ओबीज मध्ये गणायला लागले डॉक्स .. त्यामुळे इथे वाटल तर क्रॉस चेक करून बघावं

मवा, माझ्या माहितीप्रमाणे लहान वयापासूनच योग्य प्रमाणातच फॅट्स मुलांच्या शरीरात जातील ह्याची काळजी घेतली तर पुढच्या आयुष्यातही लठ्ठ होण्याची शक्यता कमी होते. तसंही लहान मुलांमधील वाढणारा लठ्ठपणा ही चिंताजनक बाब झालेली आहे सध्या. भारतातही आपण दूध उकळून साय काढलेलं दूध मुलांना देतो तसं इथे २ %. त्याव्यतिरिक्त भारतीय जेवणातून तूप, लोणी, अंडी, सुकामेवा ( पाश्चात्य जेवणात लोणी, चीज, चरबीयुक्त मांस ) ह्यातून पुरेसं ( कधीकधी जरुरीपेक्षा जास्तही ) फॅट शरीरात जातच असतं Happy

ओके अगो. :).. ज्या दुधावर परसेंट लिहीलेलं नसतं ते होल मिल्क का ? मग मुलांना दही पण २% मिल्कचंच द्यायचं का इथे ?

मवा २ वर्षानंतर मुलांना दोन टक्के वालं दूध सांगतात द्यायला..मला वाटतं की ते शरीरातलं फ़ॅट नियंत्रीत ठेवण्यासाठी असावं..कारण आजकाल जे लवकर हार्टचे प्रश्न सुरू होताहेत त्याच्यामागे एक संशोधन असं म्हणतं की हे अतिरीक्त चरबी तयार व्हायचं प्रमाण लहानपणापासून सुरू होतं म्हणून आजकाल दुधातलं फ़ॅट कमी करायचा सल्ला देतात..मला दोन कप (मोजणीचे) पेक्षा दूध नाही दिलं तरी चालेल असं सांगितलं आहे डॉक्टरने.....

त्याच्या pediatrician चा सल्ला मी जास्त पाळत नाही. पण त्याची दुसरी एक स्पेशलिस्ट डॉ आहे, ती मला नेहमीच चांगल्या fats देण्याबद्दल सांगते. (त्यामुळेच HDL चे प्रमाण जास्त असेल). दीड-दोन वर्ष तर formula द्यायला सांगितला होता नंतर organic whole milk सुरु केलं. ती म्हणते...ईथल्या मुलांप्रमाणे तो रोज चिकन, red meat , जंक फुड, bread, candy, chocolates, fried, frozen food खात नाही आणि आठवड्याताले ५ दिवस शाकाहार करतो, घरी बनवलेलं low fat chicken खातो. दिवसातुन एकदाच ते पण जास्तीत जास्त 6 oz दुध पित असेल तर ते whole milk द्यायला काही हरकत नाही.
प्रित....ह्याकडे कधी हि लक्ष देवू नये.. खरं तर आपण स्वतः सुद्धा हा गिल्ट ठेवायला नको मनात. एक तर आई म्हणून सगळ्याच जणी आपल्या परीने प्रयत्न करताच असतात कि आपल्या मुलांना योग्य आहार द्यावा >>>अगदी अगदी. गिल्ट वाटण्यापेक्षा मला तर राग यायचा अशा लोकांचा. एक मैत्रिण तर सांगायला लागली...."त्याला दुधातून कच्च अंड दे रोज ..माझ्या मुलाला मी देत होते"....मी म्हटलं "बापरे!!! शक्यच नाही", तेव्हापासुन तिने सल्ला देणं बंद केलं.

माझा पण मुलगा बर्‍यापैकी बारीक आहे. जन्माला आल्यापासूनच बारीकच आहे. मला त्याचा डॉ. त्यावरून काहीही बोलत नाही. तो नीट जेवतो ना, म्हणजे सगळं जेवतो ना, अ‍ॅक्टिव आहे ना आणि ग्रोथ चार्ट चढता आहे ना मग बास असं म्हणतो.

मवा इथे १ वर्षानंतर बाहेरचं दूध सुरू करायला सांगतात. होल मिल्क. तोपर्यंत फॉर्मुला. मग २ वर्ष झाली की २%. मी हा बारीक आहे म्हणून २ वर्षांचा झाल्यावर पण त्याला होल मिल्क देत होते. पण डॉ. ला कळल्यावर (मीच सांगितलं) त्याने बंद करायला लावलं. म्हणे तेवढ्या फॅटस ची गरज नसते आणि गरज नसताना कोणतीही गोष्ट खाऊ नये.

सोनाली मला पण तुमच्या डॉ. चं म्हणणं वेगळच वाटतय.

आपली मुलं यांच्या मुलांच्या तुलनेत बारीक/बुटकी दिसतातच.

माझा मुलगा लहान होता तेव्हाही बारीक होता आणि आता १७ वर्षांचा होईल तरीही वजनाच्या बाबतीत १० परसेंटाईलमधे आहे. आमच्या डॉकने तो लहान असतानाच सांगितले की हे चार्ट साऊथ एशियन साठी नाहियेत तेव्हा इतर मुलांशी तुलना करुन काळजी करायची नाही. वजनाबद्दल मला काळजी वाटली तर योग्य ते उपाय मीच सुचवेन. :).
माझ्या डॉकचे म्हणणे अ‍ॅनिमिया किंवा इतर कसली कमतरता नसेल तर काळजी करु नये.