लहान मुलांच्या आजारपणानंतर....(वय वर्षे १ -५)
आता उत्तर अमेरीकेत सगळीकडे हिवाळा संपत असेल म्हणजे ज्यांच्याकडे मुलं विशेषतः १ -५ वयोगटातली आहेत त्यांच्याकडे सर्दी,खोकला,ताप या सर्वांचा जोमाने सामना करून झाला असेल किंवा काहीजणांकडे हे पाहुणे अद्यापही असतील....मायदेशात विशेषतः मुंबईत तर सर्दी,खोकला नाही अशी १-५ किंवा त्यापुढची मुलंही कायम असतात..प्रदुषण,पाळणाघरं काय असतील ती कारणं..
पण जेव्हा हे तिन्ही आजार किंवा कुठलाही आजार जातो आपल्याबरोबर आपल्या सानुल्या/सानुलीचं आपण मेहनत करून वाढवलेलं वजन घेऊन जातो.....कपडे काढले तर ही मुलं काहीवेळा इतकी बारीक दिसतात की पालक म्हणून आपल्या डोळ्यात पाणीच येतं..अर्थात आता झालं ते झालं..पुढे काय?? म्हणून हा धागा..
ज्यांच्याकडे या विषयीचा पुर्वानुभव आहे त्यांनी कृपया मदत करावी जेणेकरुन इतर पालकांनाही मदत मिळेल.....
माझ्या डॉक्टरने इतक्यात दिलेल्या काही टीपा...
१. त्याला चांगले फ़ॅट्स दे उदा. अॅव्होकाडो...बटर प्रचंड प्रमाणात वापरू नकोस असं तिने खास सांगितलं...मी बटरचा अर्थ तूपही घेऊ का??
२. दर दोन तासांनी काहीतरी छोटं छोटं खायला द्यायचं जसं फ़ळं (ज्युस नको)
३. वय वर्षे दोन नंतर दुधाचं प्रमाण दिवसाला दोन कपांपेक्षा जास्त नको म्हणजे ते इतर पदार्थ खातात...
४. त्याला चालत असतील तर सुकामेवा अक्रोड, बदाम खायला द्या.
५. आठवड्यात तीनवेळा तरी अंडी (खात असतील त्यांनी)
तुम्ही वजन वाढवण्यासाठी आपल्या लहानग्यांना काय काय देता?? भारतीय पद्धतीच्या पदार्थांची माहिती दिलीत तर आणखी बरं....
पंढरपुरी डाळे आणि भारतीय
पंढरपुरी डाळे आणि भारतीय दुकानात मिळणारे डाळे (सोललेले) यात काही फ़रक आहे का??
आणखी एक म्हणजे मी भारतीय दुकानात मिळणारं नाचणीचं पीठ (आणि दुसरं एखादं पीठ) जास्त तुपावर भाजून त्यात गूळ/पाणी घालुन शिजवून ते दिलं तर अध्येमध्ये मुलगा खातो..रोज नाही खाणार अशी लक्षणं आहेत...