सांबार(कोथिम्बीर) वडी...... नागपुरी

Submitted by ''आई'' on 29 March, 2012 - 15:35
लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ वाट्या डाळीचे पीठ , १ वाटी कणिक , १/४ वाटी तांदळाचे पीठ , ओवा , जिरे , चवीला मीठ , तिखट ,तेल

सारणाचे साहित्य :-
३ जुड्या कोथिंबीर , २ कांदे ,१/२ वाटी दाण्याचा कूट, १/२ वाटी सुका नारळाचा कीस , १ चमचा खसखस , २ चमचे चारोळी , २ चमचे धने पावडर , २ चमचे जिरे पावडर , तिखट , लिंबाचा रस

क्रमवार पाककृती: 

कृती -
१. प्रथम वर दिलेल्या मापा प्रमाणे सर्व पीठ एकत्रा करून घ्यावा .
२. चावी नुसार मीठ, ओवा घालावा .तिखट अगदी थोड्या प्रमाणात घालावे
३. १ वाटी तेल गरम करून , ते मोहन पिठात घालावे .
४. हे मिश्रण एकजीव करून त्यात थोडा थोडा कोमाट पाणी घालून घट्ट भिजवावे (पुरीला जसा पीठ मळतो तेवढे घट्ट)

सारण कृती-
१ कोथिंबीर नित निवडून धुवून घ्यावी व कोरड्या कपड्यावर पसरवावी . थोडा पाणी शोषल्या गेल्यावर बारीक चिरून घ्यावी. कोथिंबीर च्या काड्या लक्ष पूर्वक बारीक चिराव्या .
२ . खसखस , खोबरा भाजून घ्यावे
३ काधाईत तेल गरम करायला ठेवावे .
४ . मोहरी फुटल्या नंतर कांदा घालून परतवावा . कांद्याला मंद आचेवर अर्धा शिजेल इतका परतवावा.
५ . कांदा झाला की , खसखस घालावी .
६. खसखस थोडी परतून त्यात नारळाचा कीस आणि दाण्याचा कूट घालावा (बरेच जणांना दाने सहन होत नसेल तर कूट थोडा घालून , नारळाचा कीस जास्त घालावा )
७. आता हळद , धने- जिरे पूड , गरम मसाला, मीठ आणि तिखट चावी नुसार घालावे .(गरम मसाला २ -३ चमचा पेक्षा जास्त घालू नये )
८. काधाई gas वरून खाली उतरवून त्यात कोथिंबीर घालावी .
९. मिश्रण चांगले हलवून त्यात २-३ चमचे लिंबाचा रस , चारोळी आणि साखर घालावी .

IMG_1346.JPG

तळण -
१. तळणासाठी तेल गरम करावे .
२ . थोडा गरम मसाला पाण्यात खालावून घ्यावा ..
३ भिजवलेल्या पीठाचे गोळे करून लाटावे ,लाटलेल्या पुरीवर पाण्यात कालवलेला गरम मसाला बोटाने लावावा .

IMG_1347.JPG

४ सारण मध्ये उभे पसवावे व बाजूच्या दोनी कडा एकमेकीवर येतील अशा बंद कराव्या . आता वरची न खालची कडा दुमडून्न पक्की बंद करावी .
५. जर वड्या आधी करून मग एकत्रा तालायाच्या असतील तर एक ओला कपडा वड्या वर झाकून ठेवावा मणजे त्या सुकून कडक होणार नाही.
६. वड्या बनवून झाल्या की तळाव्या. मध्यम आचेवर वाड्या तांबूस येत पर्यंत तळाव्या.
७. खायला देताना , सॉस , चिंचेची चटणी सोबत द्याव्या . या वड्या नुसत्याही खायला छान लागतात .

IMG_1355.JPG
.

वाढणी/प्रमाण: 
मधाम आकारच्या १५ वद्या होतात .
अधिक टिपा: 

१. समजा वडी करताना फुटली किवा कडा उमलल्या सारखी वाटली तर डाळीचे चमचा भर पीठ पाण्यात कालवून ते पाणी कडांना लावावे व मग तळाव्या.
२. सारण आदल्या दिवशी सुद्धा बनवून ठेवता येत. फक्त दुसर्या दिवशी वड्या करण्या पुरवी थोडी फ्रेश चीरेलेली कोथिंबीर घालावी . चव छान लागते

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सांबार म्हणजे विदर्भात कोथिंबीर हे डीस्क्लेमर टाका. Happy
नाहीतर लोकांना सौद इंडियन सांबार आठवेल आणि या पाकृ मध्ये सांबार मसाला कसा नाही म्हणून विचारत बसतील.

कोथिंबिरीच्या वड्या केल्या आणि खाल्या आहेत. पण हे प्रकरण अजूनच चविष्ट वाटतंय. Happy फोटु टाका प्लीज.

@ निम्बुडा अगदी खरा बोललात ''कोथिम्बीर '' तकायलाच हवी. मी प्रथम जेवा पुन्यात आले तेव्हा प्रत्येक भाजीवाल्या ने मला म्हटले असेल '' साम्बार होतेलात मिलतो इथे नाही''........:०)

पण कोणत्या डाळीचे पिठ? मला काही बनवता येत नाही पण खाता मात्र येते. म्हणूनच आपण खात असलेली वस्तू कशी तयार केली जाते हे तरी किमान माहीत असावे नै का? प्लिज सांगावे. Happy

-------------- आपला स्नेही,
सुधाकर..

छान दिसतोय पदार्थ . मला बर्याच दिवसांपासून एक प्रश्ण विचारायचा होता. पण कुठे विचारावा म्हणून इथे विचारते आहे.
मी काल वेगळ्या प्रकारच्या कोथिंबीर वड्या केल्या. तळणीचे तेल उरले आहे. त्याचे काय करता तुम्ही?