फर्निचर ट्रान्स्पोर्ट करण्याबद्दल माहिती

Submitted by सावली on 29 March, 2012 - 10:01

मला एक सोफा सेट मुंबईहुन दुसर्‍या ठिकाणी पण महाराष्ट्रातच पाठवायचा आहे.
साधारण किती खर्च येईल आणि कोणामार्फत पाठवता येईल?
कुणाचे अनुभव असतील तर तेही लिहा प्लिज.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुंबई ते ते ठिकाण, अशी डेली सर्व्हीस करणार्‍या ट्रान्स्पोर्ट कंपन्या आहेत. त्या
पाठवतात. व्यवस्थित पॅक करावा लागतो. खर्च, अंतरावर अवलंबून आहे.

धन्यवाद दिनेशदा.
अशा सर्विस करणार्‍या रिलाएबल कंपन्या माहित असतील तर त्याचा फोन नं वगरे माहिती असेल तर प्लिज द्या.

कोल्हापूर, सांगली भागाकडे, घाटगे पाटील चांगले आहेत. ठाण्याला ऑफिस आहे त्यांचे. दादरला पोस्ट ऑफिसजवळ पण आहे. बाकीच्या भागातल्या कंपन्यांची माहिती ते देऊ शकतील.

अशा सर्विस करणार्‍या रिलाएबल कंपन्या माहित असतील तर त्याचा फोन नं वगरे माहिती असेल तर प्लिज द्या.<<
मुंबईहुन दुसर्‍या ठिकाणी पण महाराष्ट्रातच पाठवायचा आहे.<<
त्या महाराष्ट्रातील दुसर्‍या ठीकाणाच (जिथे पाठवायच आहे तिथल) नाव सांगितलत तरच लोक तुम्हाला हवी असलेली योग्य माहीती सांगू शकतील. किमान जिल्हा तर लिहा!

पॅकर्स अँड मूव्हर्स्..खुप छान आहे.पॅकिंग तेच करतात व अनपॅक ही तेच करतात.रिलायबल आहे.चार्जेस इतरांपेक्षा थोडे जास्त असतात.

सावली कोकणात कुठे?? कोकणसाठी पांलाडे कुरियर्स आहेत. गावाच नाव सांगितलस तर मदत करायला सोप जाईल. रामेश्वर, सार्थक, जगदंबा ह्या मालवण पर्यंत मुंबईवरुन बसेस जातात आणि फर्निचर, फ्रिज, टिव्हि ट्रांन्सपोर्ट करतात.

२०१२ मध्ये माहिती मागितली गेली होती हो, तारीख तरी पहायची. आत्तापात्तर तर त्यो सोफा मोडीत नायतर बंबात सुद्धा ग्येला असंल.

जेम्स वांडांना समर्थन तरीपण,
ट्रान्सपोर्ट ने का पाठवताय?
OLX वर दोन प्रोफाईल बनवा. एकाने विका. दुसय्रा प्रोफाईलने विकत घ्या.
OLX वाले उचलून घेऊन जाऊन डिलीव्हरी देतील.
पैसे पेटीएम ने पे करा. आणि शगून म्हणून कॅशबॅक मिळवा.

Are you looking for professional packers and movers in Bangalore? Loyal Cargo Packers and Movers are professional Movers and Packers in Bangalore which provide the relocation services such as household shifting, home shifting, transportation, warehousing, car transportation etc...