एक सुगंधी, प्रसन्न सकाळ..

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

आजची सकाळ म्हणजे तसं पाहिलं तर अगदी नेहेमीसारखीच सकाळ. सिद्धार्थला शाळेत पाठवायचंय, आवरुन काकांकडे पूजेला जायचंय या विचारात उठून आवरायला सुरुवात केली. नेहेमीप्रमाणे एकीकडे चहा टाकला, एकीकडे ओट्यावरचा सगळा पसारा आवरणं चालू होतं. चहा होत आला आणि पेपरवाल्याने पेपर टाकल्याचा आवाज आला. पेपर उचलायला म्हणून दरवाजा उघडला. गम्मत म्हणजे, बाहेरच्या सेफ्टी डोअरला आतून एक पिशवी बांधलेली होती. पिशवी आईकडचीच! लगेच ओळखलं मी. पेपर उचलायचे सोडून अर्थातच आधी ती पिशवी सोडली. आत काय असेल............? पंधरावीस ताजी, टवटवीत सोनचाफ्याची फुलं. Happy त्याक्षणी कसलं निरागस, निर्मळ, प्रसन्न, झकास वाटलं! नक्की काय वाटलं ते शब्दात सांगणं सुद्धा कठीण. पिशवी उघडताच चाफ्याच्या घमघमाटानी आमच्या संपूर्ण घराचाच ताबा घेतला. अर्थात हा उद्योग बाबांचा ..! आपल्या नातवाला शिक्षकदिनासाठी बाईंना चाफा देता यावा, गणपतीला ताज्या चाफ्याचा हार मिळावा म्हणून हा सगळा खटाटोप.

त्या एका क्षणानी सगळा दिवस कसा चाफ्यासारखा बनला सुंदर, सुगंधी, टवटवीत! खूपवेळा वाटतं मला की माझ्या बाबांचं माणसांपेक्षा जास्त प्रेम फुलांवर, फुलझाडांवर आहे. आज सकाळी त्या चाफ्यानी असा काही आनंद दिला आणि वाटलं, का नसावं.... ? आपल्या नुसत्या असण्यानी जो चाफा इतका आनंद देऊन जातो, त्याच्यावर नाही प्रेम करायचं तर कुणावर....?

हा बाबांच्या बागेतला चाफ्याचा फोटो..

IMG_1860.jpg

माझ्या बाबांनी टेरेसवर केलेली फुलबाग पहायचीय?

http://picasaweb.google.com/meenakshi.hardikar/MyDadSBeautifulGarden?aut...

विषय: 
प्रकार: 

नमस्कार मीनूताई,
मी मायबोलीवर नवखीच आहे. मायबोलीवर मनसोक्त वाचन करत असताना आपला हा लेख द्रुष्टीस पडला. लेख सुरेखच आहे. आपल्या वडिलांनी फुलवलेली बाग अप्रतिमच... डोळे त्रुप्त झाले. बागेतील ताजी ,टवटवीत फुले पाहुन खूप प्रसन्न वाटलं.
मी सध्या अमेरीकेतील वाळवंटात रहाते... जिथे निवडुंगाव्यतिरिक्त एक झाड दिसणं दुर्मिळ आहे. अशा परिस्थितीत आपल्या बागेतील फुलं पाहुन मनाला आनंद झाला...मोग-याचा, चाफ्याचा सुगंध इथपर्यंत पोचला.

-सुमन

बाबा या बागेसाठी जवळजवळ रोज चार पाच तास खपतात. जीवापलिकडे जपतात बाग. >>>> झाडे, रोपे, वेली यांनाही प्रेम कळतच असणार की तुमच्या बाबांनी केलेले..... फारच भरुन आले हे सर्व वाचून....
झाडाफुलांवर असं जीवापाड प्रेम करणारे तुमचे बाबा भाग्यवान का असं प्रेम मिळणारे ती झाडे जास्त भाग्यवान हेच कळेनासं झालं मला.....

Pages