रंगकर्मींचे 'पसायदान'

Submitted by नीधप on 27 March, 2012 - 03:20

आज म्हणजे २७ मार्च २०१२ हा ५० वा जागतिक रंगभूमी दिन. १९६१ साली युनेस्को च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूट ने जागतिक रंगभूमी दिनाची रूजवात केली. पहिला जागतिक रंगभूमी दिन १९६२ साली साजरा झाला. जगभर या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम व उपक्रम होत असतात.
युनेस्कोच्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूट तर्फे नाट्यजगतातील महत्वाच्या कुणी दिलेला संदेश हा एक दरवर्षीच्या कार्यक्रमांपैकी महत्वाचा भाग.
पहिल्या वर्षी म्हणजे १९६२ साली हा संदेश ज्याँ कॉक्चू यांनी दिला होता.
यावर्षीचा संदेश अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक जॉन माल्कोविच यांनी दिलेला आहे. हा संदेश म्हणजे रंगकर्मींसाठीचे 'पसायदान' असल्यासारखाच आहे.
या पसायदानाचा मी केलेला अनुवाद इथे देत आहे.

" युनेस्कोच्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने मला ५० व्या जागतिक रंगभूमीदिनानिमित्त संदेश द्यायला सांगून माझा सन्मानच केला आहे. माझे सह-रंगकर्मी, मित्र आणि आप्तपरिवारासाठी मी माझे दोन शब्द मांडतो.

तुमचे काम (नाट्यकर्म!) खिळवून ठेवणारे आणि सृजनात्मक असो. ते विचारांना खाद्य देणारे, बुद्धीला चालना देणारे, हृदयाला भिडणारे आणि एकमेव असे असो. तुमच्या कामाचा उपयोग मानवता समजून घेण्यासाठी होवो व त्यामधे सहृदयता, निष्ठा, प्रामाणिकपणा आणि दैवी सौंदर्याचा वास असो. तुम्हाला ज्यांचा सामना करावा लागतो असे सर्व अडथळे, सर्व बंधने, गरिबी आणि सगळ्या मूल्यांना तिलांजली देण्याची, नाश करण्याची वृत्ती या गोष्टींना तुम्ही पार करून जावे. तुम्हाला तुमचे आयुष्यभराचे नाट्यकर्म साकारण्यासाठी कौशल्य, मानवाच्या हृदयाच्या धडधडीच्या अनवट हरकती दाखवण्यासाठी लागणारी अचूकता, कारूण्य, जगाप्रती उत्सुकता यांचे वरदान मिळो. तुम्हापैकी जे सर्वोत्तम आहेत - सर्वोत्तम असणारेच केवळ आणि तेही क्वचित काही क्षणांपुरतेच - ते "जगण्याचे संचित काय?" या प्रश्नाला हात घालण्यात यशस्वी होवोत.
देव भले करो!"

- जॉन माल्कोविच

मूळ संदेश इथे वाचता येईल

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जॉन माल्कोविच यांचा संदेश अनुवादित करून आमच्यापर्यंत पोहोचविल्याबद्दल धन्यवाद.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
नवीन काहीतरी मिळेल आणि जडही जाणार नाही असं काय असेल हे कळत नाहीये. तुम्ही सुचवा.. >>>>

नमस्कार नीधप,
मला वाटतं,
(१) विषय मराठी नाटकांपुरता मर्यादित असल्यास बरे. माझ्यासारख्या सामान्य प्रेक्षकांना (वाचकांना) विषयाशी सहज कोरिलेट होता येईल.
(२) फार मागे न जाता, साधारण गेल्या ५०/६० वर्षातल्या मराठी नाटकांत (विशेषकरून व्यावसायिक)
होत गेलेले बदल, प्रयोग, प्रेक्षकांची आवड/निवड, नाटककार, नट याबाबतचा आढावा असावा.
साधारण ५/१० वर्षांचा (किंवा सुयोग्य असेल तो) टप्पा/कालखंड कल्पून हा आढावा घेतला गेल्यास
हे बदल कसे आणि का घडत गेले हे वाचकांच्या दृष्टीकोनातून सुलभ होईल असं वाटतं.
(३) व्यावसायिक नाटकांच्या वाटचालीबरोबरच प्रायोगिक रंगभूमी, चळवळी, उपक्रम तसेच नाट्यस्पर्धा
यांची माहिती आणि या दोन्ही रंगभूमींचा एकमेकांवरील परिणाम इ. इ. हेही ओघाने आलेच.
(४) या सगळ्याबरोबर थोड्या प्रमाणात का होईना; पण नेपथ्य, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत आणि वेशभूषा इत्यादि आहार्य अभिनयाच्या (शब्द बरोबर आहे का हो ? .... १९७६ नंतर आज प्रथम वापरलाय.) अंगांचा परामर्श घेतला गेल्यास सोनेपे सुहागा.
--------------
हा आढावा क्रमश: टप्प्या-टप्प्याने न घेता, गुलजारसारखी ’अचानक’(विनोद खन्नाचा) टाइप ’फ्लॅशबॅक्मध्ये फ्लॅशबॅक’ अशी गुंफण केल्यास केवळ माहितीपूर्णच नव्हे तर रंजक होऊन वाचकांना तुलनात्मक अभ्यासाचा अनुभव घेता येईल.
--------------

हे म्हणजे, घरात टीव्हीसमोर बसून सचिनने “असं खेळावं-तसं खेळावं” हे सुचवण्यासारखं झालंय. पण काय करणार, तुम्हीच सुचवायला सांगितल्याने एक सामान्य रसिक/वाचक म्हणून सुचविण्याचं धाडस केलंय इतकंच.

कॉलनीच्या गॅदरींगमधल्या नाटकाबद्दल नाहीये हे टवाळ..
क्लिष्ट ज्याला वाटतं तो जात नाही या वाट्याला.

नी तुझ्यकडुन मिळणार्‍या माहीतीचा फायदाच होईल, बाकी अनुवादास अनुमोदन........ सर्वसुखी सर्वभुति संपुर्ण होईजे.....................

नी आणि वरदा, भारतीय शास्त्रीय नृत्य आणि नाट्यशास्त्र यांचा घनिष्ट संबंध आहे का? त्याबद्दलदेखील जरा लिहाल का?

इथे मंगळूरमधे जेव्हा पहिल्यांदा यक्षगान पाहिलं होतं तेव्हा मी अक्षरशः भारावून गेले होते. इतकं प्रभावीरीत्या ते सादर केलं जातं. अशा वेगवेगळ्या लोककलाबद्दल जाणून घ्यायला आवडेल. खासकरून फारशा प्रसिद्ध नसलेल्या लोककलांबद्दल.

जागतिक रंगभूमीवरच्या विविध यशस्वी आणी अयशस्वी प्रयोगाबद्दल पण लिहीशील का?

टवाळा, नाटक करणे हे जगातले सर्वात सोप्पे काम असते बरं का Light 1

कॉलनीच्या गॅदरींगमधल्या नाटकाबद्दल नाहीये हे टवाळ..
क्लिष्ट ज्याला वाटतं तो जात नाही या वाट्याला

याला काही अर्थ नाही ! कॉलनीच्या गॅदरींगमधली नाटकं ही देखील त्या वेळची अभिव्यक्तीच असते ! आणि ती जास्त खरी असते कारण नैसर्गिक असते ! जाऊ दे, मी काही वाद घालण्यासाठी ईथे आलेलो नाही ! खरंच काही माहिती-पुर्ण लिहीलं असेल म्हणून वाचलं आणि नाही कळलं म्हणून प्रतिक्रिया दिली ईतकंच ! मेळ्यांमधून (ही पण एक प्रकारची कॉलनीतली नाटकंच असतात) कामं केलेले कित्येक कलावंत पुढे थोर नट म्हणून प्रसिद्ध झालेत !

टवाळ बर्‍याच गोष्टींची उत्तम गल्लत करून तुम्ही नाटक शिकणार्‍यांना, नाट्यकर्मींना एका वाक्यात कमीपणा देऊ पाहताय. तर ठिके. आम्हाला हे अजिबातच नवीन नाही. पण हा धागा यासाठी नाही.
नाटक ही एक कला आहे. जी इतर कुठल्याही ललित कलेच्या इतकीच सहज वा क्लिष्ट आहे. इतर कुठल्याही ललित कलेइतकीच इथेही तंत्रशिक्षणाची, साधनेची, सरावाची आणि बुद्धीचीही गरज असते.

उल्हास भिडे,
सूचनांबद्दल आभार. मोलाच्या सूचना आहेत.
मराठी रंगभूमीबद्दल लिहेनच पण जागतिक पटलावरचे अनेक संदर्भ अधून मधून येणं अपरिहार्य आहे.

तुम्ही नाटक शिकणार्‍यांना, नाट्यकर्मींना एका वाक्यात कमीपणा देऊ पाहताय.

हे तर शक्यच नाही ! आणि का ते काल-परवा मी कट्ट्यावर सांगीतलंच आहे ! उलट कॉलनीतल्या नाटकांचा उल्लेख कमीपणा दाखवण्यासाठी तुम्हीच केला आहे ! मी नाटक क्लिष्ट म्हटलं नाही, त्याचं विवेचन जे ईथे तुमच्या व्यतिरिक्त काही लोकांनी केलं आहे ते कळलं नाही असं म्हणतोय ! मुळात तुमचं या धाग्यावरचं मुळ लिखाण ईतकं कमी आणि निरूपद्रवी आहे की त्याबद्दल मी प्रतिक्रिया देण्याची गरजच नव्हती.

इतर कुठल्याही ललित कलेइतकीच इथेही तंत्रशिक्षणाची, साधनेची, सरावाची आणि बुद्धीचीही गरज असते.

मान्य ! पण तांत्रिकतेच्या हव्यासापायी नैसर्गिकता जर दाबली जात असेल तर त्याला काही अर्थ नाही !

टवाळा, नाटक करणे हे जगातले सर्वात सोप्पे काम असते बरं का <<<<<< नाटक की नाटकं म्हणायचय नंदीनी ?

गुड जॉब नी, लिही ग लिही , पुष्कळ लिही. शुभेच्चा!!!

नी, येऊदेत ना जागतिक रंगभूमीचे संदर्भ. मला ठार काही माहित नाहीये अशा गोष्टींबद्दल ते कळून घ्यायला आवडेल.

नीधप,
पसायदान-अति उत्कृष्ट भाषेत केले आहे.नेमक्या शब्दात संपुर्ण आराखडा मांडला आहे.
जागतिक आणि क्षेत्रीय रंगभुमीवर आधारीत ,तुझ्या पुढील लिखाणाची वाट पहात आहे.

हो, आणि इतकं लिहून महत्वाचं लिहायचं राहूनच गेलं.. की हे पसायदान फार सुरेख आहे. मूळ पण आणि अनुवाद पण.
<<ते "जगण्याचे संचित काय?" या प्रश्नाला हात घालण्यात यशस्वी होवोत.>> हे तर अगदी फारफार आतपर्यंत भावलं.

अत्यंत अप्रतिम अनुवाद!
माझा नाटक बसण्याच्या प्रक्रियेशी पहिला संबंध गेल्यावर्षी माझ्या शाळेतल्या पोरांची आंतरसदन नाट्य स्पर्धा आयोजित केली होती तेंव्हा आला.
चारपैकी एका सदनाचा मी मुख्यशिक्षक आहे त्यामुळे कलाकार, स्क्रिप्ट, तालमी, नेपथ्य, बॅकस्टेज अशा अनेक गोष्टी जवळून पाहता आल्या. मी आधी फारसा उत्सुक नव्हतो पण नंतर नाट्क कसे 'चढते' ते चांगलेच अनुभवाला आले. माझ्या आळशी, वांड, निरुत्साही, वात्रट, अस्ताव्यस्त, बेशिस्त इ.इ. विद्यार्थ्यांचे जे अफाट आणि अमूलाग्र परिवर्तन या 'नाट्क' नावाच्या जादूने केले तो निव्वळ अजब प्रकार होता.
आणि ही सर्व शाळेतल्या पोरांच्या हौशी नाट्काची किमया, समजून-उमजून यात आलेल्यांचे काय होत असेल!!!
अदभुत प्रकार आहे हो हा!

आगाऊ, तुझ्या शाळेत 'थिएटर इन एज्युकेशन' हे प्रकरण कितपत आलेय? फार इंटरेस्टिंग आहे ते सर्व. तुला माहिती हवी असेल तर मी काही कॉन्टॅक्टस देऊ शकते. ते लोक या विषयातच शिकलेले आहेत, शिकवतायत आणि काम ही करतायत.

माझ्या आळशी, वांड, निरुत्साही, वात्रट, अस्ताव्यस्त, बेशिस्त इ.इ. विद्यार्थ्यांचे जे अफाट आणि अमूलाग्र परिवर्तन या 'नाट्क' नावाच्या जादूने केले तो निव्वळ अजब प्रकार होता. <<<
हे मात्र १००% खरं. मी पण अनुभवलंय.

सहमत आहे

या पामराने एकदा यशवंतराव चव्हाणमध्ये असलेल्या स्पर्धेत भाग घेऊन एक नाटक बसवून सादर केले होते. 'सगुणा' नावाचे. नाटक 'चढते'च. Happy

अर्थात, माझा एक आणि तोही कसाबसा केलेला प्रयत्न येथे नोंदवणे योग्य नाही याची जाणीव आहे, पण आगाऊंच्या प्रतिसादानंतर तसे लिहावेसे वाटले

नीधप्.अगं ते नेमक्या शब्दात भाषांतर करणे हे सोपे नव्हे मी कॉलेजला असताना रहात्या जागी इतक्या उपलब्ध सोयी नसताना,गुजरातीचे मराठी ,हिंदी व इंग्रजी भाषांतर करणे किती अवघड असते ते मी चांगलेच जाणते.

मूळ संदेश आणि अनुवाद दोन्ही मस्त पण आता 'नमनाला रांजणभर तेल' झाले काहीतरी वाचण्याजोगे येउद्या की आता... Happy
उगाच टीआरपी वाढतोय बीबीचा

नाटक आधी डसते आणि मग चढते... जन्मभरासाठी..
'थिएटर इज माय रिलिजन' म्हणण्याइतके चढते.

नाट्यशास्त्रातील संदर्भाप्रमाणे सर्व ललित कला सादर करणार्‍या कलाकारांना जातीच्या उतरंडीत एकदम शेवटच्या स्तरावर ठेवले गेले. हे माझ्यासारख्या नाटकवालीला एका दृष्टीने बरेच वाटते. अच्चंच वागायचं तच्चंच वागायचं हे नियम नाहीत. काहीच निषिद्ध नाही. इमान केवळ गोष्ट सांगण्याशी, रंगमंचाशी आणि स्वतःच्या प्रतिभेशी... Happy

नी, नेकी और पूछपूछ! प्लीज माहिती दे.
माझा एक आणि तोही कसाबसा केलेला प्रयत्न येथे नोंदवणे योग्य नाही याची जाणीव आहे>>> उलट नाट्काशी आलेला ओझरता संबंधही त्याची जादू जाणवून देतो हेच रंगभूमीदिनानिमित्त सांगणे योग्य होईल नाही का!

कृपया एखादे वाक्य पकडून किंवा फाटे फोडून वाद घालण्यापेक्षा, विषयाचा अभ्यास फार नसलेल्या लोकाना कळेल असा नाट्यशास्त्र आणि नाट्यकलेचा रसास्वाद कुणी केला तर वाचायला आवडेल..

मूळ संदेश [ व भाषांतर ] एका वेगळ्या पातळीवर नेतं . आयुष्यभरच्या 'डेडिकेशन' व चिंतनाचा तो परिपाक आहे हें जाणवतं - म्हणूनच थोडक्यात पण नेमकं !!
[ प्रेक्षक सुजाण होणं हें नाटकांचा सर्वसाधारण दर्जा उंचावण्याचा एक हमखास उपाय असावा; तेंव्हा, असंच आम्हाला नाटक 'बघायला' शिकवत चला ]

Pages