कहानी

Submitted by बेफ़िकीर on 26 March, 2012 - 00:37

कहानी चित्रपटाबाबतची माहिती या धाग्यात होती. ती मी आता बदललेली आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान विश्लेषण आहे. चित्रपटाचा वेगही इतका जोरदार आहे की काही त्रुटी असल्या तरी नंतर त्यावर विचार करताना जाणवतात. पिक्चर पाहताना नाही. फक्त दोन क्लूज होते जे लगेच लक्षात आले
१. "खान" - ही व्यक्ती व्हिलन असणार नाही हा क्लू. यात काही स्पॉईलर नसल्याने हे लिहीले आहे.
२. दुर्गापूजा.

बेफिकीर - हे लेखन चित्रपट विभागात हलवता येते का बघा.

फार एन्ड, धन्यवाद

मी हितगूजमध्ये चित्रपट हा भाग क्लिक केला

मला वाटले की ते आपोआप चित्रपट या विभागात येईल

Sad

मला खरच माहीत नाही कसे चित्रपट या विभागात आणायचे ते

सिनेमा पाहिला. पहिल्यापासुन पकड घेतो. बिद्या रॉक्स. काही नगण्य त्रुटी (सिनेमाच आहे हे गृहित धरल्यास) वगळता सिनेमा कुठेही स्वतःचा वेग आणि सस्पेन्स घालवत नाही हे विशेष.
विद्या शिवाय लक्षात राहिलेली पात्रे म्हणजे खान आणि सात्यकी. सात्यकी अगदीच नवथर, विद्याच्या स्मार्टनेसने, बोल्डपणाने तिच्या प्रेमात पडलेला. खान निडर आणि तितकाच कर्तव्यनिष्ठ Happy

सिनेमा मस्ट सी कॅटॅगिरीत मोडणारा.

बेफिकीर, चित्रपट परिचय आवडला कुठलाही स्पॉयलर न देता दिलेला. Happy

चित्रपटाला एका रहस्यकथेपेक्षा अधिक महत्व नाही. या चित्रपटाने कोणतेही सांस्कृतीक अथवा सामाजिक मूल्य ग्लोरिफाय केलेले दिसत नाही.

अनावश्यक वाक्य वाटतंय.

सिनेमा पाहताना उशिरा आलेल्या प्रेक्षकांमुळे त्यांच्यातील आणि बॅटरीवाल्यातील संव्दाने काही संवाद कळाले नाहीत. विद्या पोलीस ठाण्यात येते तेव्हां ती तिचा पती वर्षभरापासून बेपत्ता आहे असं पहिल्यांदा सांगते का ? हा भाग नीटसा ऐकू न आल्याने पुढे प्रश्नचिन्हं निर्माण झाली आणि मेंदू भलत्याच दिशेने विचार करू लागला. अशा सिनेमाला किमान वेळेवर जावं, झालाच उशीर तर आजूबाजूंच्यांचा रसभंग होणार नाही हे कधी कळायचं लोकांना इतके पैसे घालवूनही ?

सिनेमा अप्रतिम आहे. फ्रेम बाय फ्रेम लॉजिक वापरलेलं आहे. व्योमकेश बक्षी प्रमाणेच यातलं रहस्य देखील चकचकीत वातावरणात घडत नाही. महागड्या कार्स, जीवघेणे पाठलाग आणि संशयास्पद व्यक्तिरेखा नसतानाही साध्या साध्या प्रसंगातून रहस्य कसं गडद होत जातं हे कहानीने चांगलं दाखवलं आहे. हीच या सिनेमाची ताकद आहे. नवे चेहरे घेतल्याने पूर्वग्रह राहत नाहीत हे एक...

चित्रपट पाहिला. आवडला Happy
चित्रपट परिचय आवडला कुठलाही स्पॉयलर न देता दिलेला>> अनुमोदन.

मग शेवटी तो भेटतो का तिचा नवरा?

Proud
खामोश या सिनेमाची आठवण एकाने सांगितली होती. अलंकारला मॅटिनीला होता सिनेमा. कॉलेजची काही पोरं तिथं थांबली होती. डोअरकीपला तिकीट दाखवतानाच ही पोरं एक्स्क्युज मी म्हणायची.. येस्स विचारलं कि " अमोल पालेकर इज द किलर " असं उत्तर यायचं...

डर्टी पिक्चरच्या वेळेसच ह्या कहानीचा प्रोमो बघितला होता....... डर्टी डोक्यात गेला असला तरी "कहानी" मध्ये विद्याने भन्नट काम केलेय हे प्रोमोज मधेच कळत होतं....... पण अजून बघायचा राहिलाय.
घरी सीडी आहे आणि नेटवर पण चांगली प्रिंट आहे, पण मला हा पिक्चर थिएटरमध्येच बघायचा असल्याने अजून बघितलेला नाही. Sad कधी योग येतोय बघूया.

येस्स विचारलं कि " अमोल पालेकर इज द किलर " असं उत्तर यायचं...
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

युरी...... "गुप्त" च्या वेळी मी पहिल्यांदाच पिक्चर पाहताना इंटर्व्हल नंतर अनुपम थिएटर मध्ये ओरडलो होतो "काजोल खूनी आहे". आजुबाजुचे वैतागले होते. मी ग्रूपबरोबर होतो म्हणून वाचलो.
शो बघून बाहेर आलो तर एक आमच्या ग्रूपमधली मैत्रीण फॅमिलीबरोबर नेक्स्ट शो बघायला आली होती, तिला सांगितलं "कुणाला सांगू नकोस... काजोल खूनी आहे" जाम वैतागलेली. Happy

नंतर उर्मिलाच्या "कौन" च्या वेळी योगायोगाने तीच मैत्रीण थिएटरबाहेर फॅमिलीसकट पिक्चर बघायला उभी दिसली.... तिला जाऊन पुन्हा सांगितलं... "उर्मिला खूनी आहे, कुणाला सांगू नकोस" Rofl
तिच्या आणि काका - काकूंच्या (तिचे आई वडील) जाम शिव्या खाल्या होत्या Proud अजूनही आठवण आली की खातो शिव्या Wink

मा. प्रशासक / संपादक ,

आपले मनापासून आभार, हा धागा चित्रपट या सदरात आणल्याबद्दल

मीही शिकून घेतो असा धागा योग्य प्रकारात कसा द्यायचा ते

तसदीबद्दल क्षमस्व

न पटणार्‍या / न पटू शकणार्‍या गोष्टी : ३ >> सहमत! शेवटचे काही क्षण भराभर दाखविल्यामुळे काही गोष्टींचा sequence एकदम लागत नाही. रहस्य कळाल्यानंतर थोडा विचार केल्यावर आधीचे scene/reason कळतात. म्हणजे माझे तरी असेच झाले. Happy

५. अर्णव बागची नावाचा माणूस कोलकात्याला आलेलाच नाही हे पोलिसांनी सांगितल्यावरही विद्याची शोध मोहीम चालू राहणे >> सिनेमा पुर्ण बघितल्यावर ही गोष्ट नाही खटकत.

सिनेमाची कथा, वेग, विद्या चा अभिनय, अमिताभ चे गाणे आणि नवीन कलाकार - ही जमेची बाजू.

डर्टी पिक्चर मला पण तितकासा नाही आवडला (त्याचे dialogue मात्र खूप आवडले होते) आणि त्यात विद्या ला अभिनयासाठी अवॉर्ड अजून कुठला बरा सिनेमा नव्हता म्हणून मिळाला असे वाटले. ह्या सिनेमात तिला अवॉर्ड मिळाला पाहिजे असे मनापासून वाटते ...

प्रिया, तुझा प्रतिसाद ऑब्जेक्शनेबल शब्दांमध्ये असल्याने तो डिलीट करण्यात आला Sad

५. अर्णव बागची नावाचा माणूस कोलकात्याला आलेलाच नाही हे पोलिसांनी सांगितल्यावरही विद्याची शोध मोहीम चालू राहणे >> सिनेमा पुर्ण बघितल्यावर ही गोष्ट नाही खटकत.
>>>
अनुमोदन Happy

कोलकता दाखवलय तसच आहे अगदी

२. सात्यकी राणाची आऊट ऑफ द वे झालेली मदत
>>> त्याच कारण पण चित्रपट पहाताना कळत Happy

४. विद्याचे एकटी असताना रडणे
>>
याच कारण पण चित्रपट संपताना कळत....

३. एखादे रहस्य सुटताना इतक्या कमी अवधीत सुटते की मागचा सिक्वेन्स नीट लक्षातच येत नाही काही वेळा
>>>>>
मला अस मुळीसुद्धा वाटलं नाही एकदा पण

मला तर खुप आवडला पिक्चर..मी ४ वेळा पाहिला
माझ्यासाठी तरी मस्ट वॉचच आहे

प्रिया, तुझा प्रतिसाद ऑब्जेक्शनेबल शब्दांमध्ये असल्याने तो डिलीट करण्यात आला
>>
नाही काय
मी अस काहीच लिहिल नव्हत त्यात Sad
मी लिहिलेल की मला लेख आवडला आणि सिनेमा पण
बहुदा त्या डुप्लिकेट लेखावर लिहिल असेल

नाही काय
मी अस काहीच लिहिल नव्हत त्यात
मी लिहिलेल की मला लेख आवडला आणि सिनेमा पण
बहुदा त्या डुप्लिकेट लेखावर लिहिल असेल>>

अच्छा, मग असेल तिथे तो प्रतिसाद

नाहीतर म्हंटलं प्रशासकांशी संपर्क साधायचा असला तर साध Happy

मला आवडला कहानी.
विद्या बद्दल लिहिलेलं सगळं +१ - अ‍ॅवार्ड मिळायला हरकत नाही.
कोलकाता - कधी जावं असही वाटु नये चित्रपट पाहिल्यावर Sad
खान - मस्तच. मलातबै आवडला भारीच.
राणा - छानै. इनोसन्ट वाट्तो.
वेग- अफाट.
रहस्य / धक्कातंत्र - अफाट. म्हणजे एक्दम पटणेबल. खोदा पहाड निकला चुहा नाही.
एकुणात मस्तच चित्रपट. पैसा वसुल. Happy

कहानी बघितला पहिल्याच दिवशी. केल्या होत्या तेवढ्या सार्‍या अपेक्षा पूर्ण झाल्या. आवडला सिनेमा.

कोलकता हे गचाळ आहे की नाही, हा भाग वेगळा. पण इथं ते एक 'पात्र' बनून आलं आहे. या शहराच्या गल्ल्या, रस्ते, भाषा, लोक, घरं, पोलिस ठाणी, हॉटेल्स, चौक हे सगळेमिळून एक विशिष्ठ वातावरणनिर्मिती करतात. हे सारं वातावरण या रहस्यकथेचा अविभाज्य भाग बनून बसतं. मुंबईच्या पार्श्वभूमीवर घडणार्‍या हजारो कथा चित्रपटांत बघितल्यानंतर हे वेगळेपण आवडलं, भावलं. कोलकत्याच्या गलिच्छ-गचाळपणाकडे लक्ष गेलं नाही. जिथं गेलं तिथं ते कोलकत्याचं 'तसं' दिसणं आवश्यकच होतं, असं वाटलं. तुमचं "चित्रपट कोलकाता माणसाच्या मनात घर करत राहील अशा पद्धतीनेच प्रवास करत राहतो." हे वाक्य वेगळ्या संदर्भाने अगदीच परफेक्ट आहे.

"विचार केल्यावर लक्षात येईल की कोलकाता असा दाखवत राहणे हेही विद्याच्या शोधमोहिमेत तिला किती कष्ट पडले हे प्रभावीपणे नोंदवण्यासाठीच आहे." अशी काही वाक्ये आणि "महत्व" हा संपूर्ण परिच्छेद- हे सखाराम गटण्याने लिहिल्यागत वाटलं. हे नसतं, तर परीक्षण अधिक प्रभावी वाटलं असतं. विशेषतः "चित्रपटाला एका रहस्यकथेपेक्षा अधिक महत्व नाही. या चित्रपटाने कोणतेही सांस्कृतीक अथवा सामाजिक मूल्य ग्लोरिफाय केलेले दिसत नाही" सारख्या वाक्यांनी तुमच्या लेखाला अक्षरशः पॅथॉलॉजी लॅबच्या रिपोर्टची कळा आणली आहे. एकेक मुद्द्याला अनुसरून परीक्षण लिहिण्याचा प्रयत्न मात्र आवडला. (कुठच्याही चित्रपटाचं गुणांकन उत्तरपत्रिकेतल्यासारखं असं एकाखाली एक ऑब्जेक्टिव्ह मुद्द्यांवर आणि निव्वळ मार्कांसाठी लिहिल्यागत करता येत नाही, हे गृहित धरूनही.) Happy

उत्तम उहापोह घेतला आहात.

सिनेमा पाहिला आहे, बर्‍याच गोष्टी पटल्या.

चित्रपटाचं कथानक सुरेख आहे. पटण्याजोगं आहे. वस्तुस्थितीला धरून आहे. मेंदूला चालना देणारं आहे. त्यामुळे वेगळीच लज्जत येते. विद्याबाईंचा अभिनय तर चांगला आहेच! स्मित

चित्रपट शंभरेक मिनिटांचा आहे. वाढवून दोन तासांचा केलेला चालला असता. त्याकरिता कथा आकळण्यास मदत होईलसा एखादा प्रसंग मध्ये घालता आला असता.

-गा.पै.

छान चांगली ओळख करुन दिलेय चित्रपटाची.
पहावा लागेल आता.
भुलभुलैय्या आणि मुन्नाभाई नंतर एकही सिनेमा पाहीला नाही विद्याचा. Sad

*
(माझी पोस्ट चुकीची होती म्हणुन ऊडवली आहे, माझ्या पोस्टमधले वाक्य ज्यांनी कुणि कॉपी पेस्ट केले असल्यास ते कुपया ते संपादित करा ही विनंती!)

चित्रपटाची छान ओळख दिलेय तुम्ही बेफिकीर! तेही त्यातील कथेची गुप्तता राखुन.
बघितला जाईल चित्रपट आता.

>>अर्णव बागचीला शोधायला गर्भवती विद्या बालन लंडनहून एकटीच कोलकात्यात येते.<<

>>विद्या खरी प्रेग्नंट नाही हे लगेच लक्षात आले होते पण त्याला तेवढा करूण संदर्भ असेल अस वाट्ल नाही उलट खान म्हणतो ती शक्यता जास्त वाटली.<<

म्हणजे या चित्रपटात विद्या "प्रेग्नंट" असल्याच नाटक करते कि काय.?

बेफिजी,

'बॉब (बोब) बिस्वास' ला विसरलात! ते पण महत्वाचं पात्र आहे! Wink
बॉब चं धक्कातंत्र एकदम भारी आहे...

Pages