आधीच्या रचनेत थोडेफार बदल केले आहेत.
त्या वेळच्या प्रतिसादांच्या संदर्भांसाठी ती रचना खाली तशीच ठेवली आहे.
ही बदल केलेली रचना :
प्रीत गझलियत
बहर दोन मिसर्यांस फुलवून गेली
गझल अंतरंगास खुलवून गेली
अलामत जुळावी जशी काफियाशी
तशी प्रीत हृदयांस जुळवून गेली
खयालात धुंदी, सुरा भासली ती
नशा रोमरोमात भिनवून गेली
जमीनीत जडवून सानी उलांना
गझल अंबरी सैर करवून गेली
अमर्याद उल्हास, कैफात गात्रे
गझल प्रीत-झूल्यास झुलवून गेली
.... उल्हास भिडे (२-४-२०१२)
===============================================================
आधीची रचना :
प्रीत गझलियत
बहर दोन मिसर्यांस फुलवून गेली
गझल अंतरंगास खुलवून गेली
अलामत जुळावी जशी काफियाशी
तशी प्रीत हृदयांस जुळवून गेली
बिलगली अलामत अशी काफियाला
नशा रोमरोमात भिनवून गेली
पुराण्या रदीफा अतीतात गेल्या
तयां गैरमुरद्दफ मिटवून गेली
जमिनीत जडवूनी सानी उलांना
गझल अंबरी सैर करवून गेली
मतला नी मक्ता दुरावा न राही
द्वीपदावली संग घडवून गेली
उल्हास, तखल्लुस कशाला हवे ते
तुझी प्रीत जगतास दिपवून गेली
.... उल्हास भिडे (२५-३-२०१२)
२ कडव्यांत थोडेसे बदल केले आहेत.... (३०-३-२०१२)
ही कविता आणि त्यावरील चर्चा
ही कविता आणि त्यावरील चर्चा उदबोधक आणि रंजक वाटते,
कविता आवडली आणि बरीच माहितीही मिळाली !
सर्वांना धन्यवाद
सर्वांना धन्यवाद
Pages