लाकडी सामान dismantle

Submitted by प्रितीभुषण on 24 March, 2012 - 06:26

लाकडी सामान dismantle ::माझ्या घरात एक बेड आणि एक wardrobe आहे
आता मला शिफ्ट करायचे आहे तर मी ते घरीच डिसमेनटल करायचा विचार करत आहे त्या साठी लागणारी उप्करणे मुंबईत कुठे मिळतिल???
घरीच डिसमेनटल करण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लगतिल??

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रिती, तुला घरीच डिसमेंटल का करायचे आहे?
आम्ही फ्लॅट पॅक फर्निचरसाठी अ‍ॅलन की आणि स्क्रु ड्रायव्हर, लागल्यास पाना वापरतो.

या कामा साठी तुम्हाला एक स्लाइड रेंच (सरकपाना : याचा आटे असणारा भाग फिरवून कोणत्याही आकाराचे नटबोल्ट खोलता व कसता येतात) आणि + /- चे स्क्रू ड्रायव्हर ( पेचकस : हे आजकाल वेगवेगळ्या साईज मधे मिळतात तुम्हाला जे नटबोल्ट उघडावे व नंतर परत कसायचे आहेत ते पाहुन एक सेटच घेतला तर चांगले होईल नव्या घरात ट्युब लाइट लावण्या सारख्या इलेक्ट्रिकल कामात ही उपयोग होइल. ) अशा दोन वस्तू किमान लागतील. वार्डरोब जर नव्या घरात भिंतीला स्क्रू वापरून फिक्स करायचा असेल तर भिंतीला छिद्रे पाडायला ड्रिल मशीन वा हातोडा/पंच लागेल आणि रावळ प्लग्ज व योग्य साईजचे स्क्रू लागतील. हे सगळे सामान तुम्हाला जवळच्या कोणत्याही हार्डवेअर च्या दुकानात मिळेल.
याकामात थोडे शारिरिक कष्ट पडतील्,अन भरपूर चिकाटी ही लागेल. ती मात्र कोणत्याही दुकानात मिळत नाही Happy

याकामात थोडे शारिरिक कष्ट पडतील्,अन भरपूर चिकाटी ही लागेल. ती मात्र कोणत्याही दुकानात मिळत नाही >>>> +१००

प्रिती, तुला घरीच डिसमेंटल का करायचे आहे?
>>>>हो

मी बेड आणि कपाट हाउस्फुल्ल मधुन घेतले आहे ते डिसमेंटल साठी हाउस्फुल्ल वाले २०००रु मागत आहेत
म्हटले घरी प्रयत्न करावा

ग्रेट थिंकिंग,

सर्व सामान घर च्या घरी सुट्ट करू शकाल. कपाटाच्या, पलंगाच्या उजव्या व डाव्या भागांवर, L / R Mark
केल्याने परत सामान जोडताना सोप्प जाइल.

बाकि
याकामात थोडे शारिरिक कष्ट पडतील्,अन भरपूर चिकाटी ही लागेल. ती मात्र कोणत्याही दुकानात मिळत नाही > +१००

मी अगरवाल पॅकर्स मूवर्स ची सर्विस घेतली होती. ते बेड वगैरे डिसमँटल करून शिप करतात व मग घरी अन पॅक करून जोडून देतात. जमले तर तसे करा. लहान बाळ संभाळून स्वतः हे करणे जरा अवघड आहे.
तुमची दमणूक ही होईल. आपण नीट डिसमँ केले तरी जोड्ताना फारच वैताग येतो.

बाकी डिसमँटल उपकरणांबद्दल काही सांगु शकणार नाही पण समजा फर्निचरच्या आतल्या बाजूला (जिथे स्क्रूज आहेत) मार्करने A, B असं लिहून त्या बाजूचे स्क्रूज झिपलॉकमध्ये ठेवून त्या पिशवीवरही A, B असं लिहिल्यास कुठले स्क्रू कुठे जाणार हे शोधायचा वेळ वाचेल, तसंच डिसमँटल करण्यापूर्वी (शक्य झाल्यास) मागील बाजूने बेडचा वगैरे फोटोही घेऊ शकता.

सायो +१
तसंच डिसमँटल करण्यापूर्वी (शक्य झाल्यास) मागील बाजूने बेडचा वगैरे फोटोही घेऊ शकता.

नव्हे घेऊनच ठेवा. त्याचा उपयोग होतो. खरे तर निरनिराळ्या कोनातून त्याचे अनेक छायाचित्रे घेउन ठेवणे उत्तम. त्यामुले मूळ वस्तू कशी होती ते चांगले कळते. तसेच एका एका वस्तूचे सगळे स्क्रू (याला मराठीत मळसूत्र म्हणतात! Happy ) एकत्र ठेऊन छायाचित्रे काढून ठेवा. त्याचाही उपयोग होतो. काही वेळा काही जोडण्या जटील असतात त्यांचे उघडत असतांना निरनिराळ्या टप्प्यांवर घेतलेले छायाचित्रे उपयोगी होतात.
हत्यारे:
आधी पाहून घ्या कोणत्या प्रकारे खिळे स्क्रू, नटस आहेत ते. मग त्यानुसार हत्यारे आणा. - तपारियाची हत्यारे त्यातल्या त्यात चांगली असतात - टिकतात.
स्वस्त चीनी बहूदा ऐनवेळी दगा देतात.

  • पक्कड (किंवा लांब नाकाचा पोपट पाना)
  • चपटा स्क्रूड्रायव्हर
  • ४ मार्गी (फिलिप्स स्क्रूड्रायव्हर)
  • पलंगाला मोठे नटबोल्टस असू शकतात तेथे सरकवता येणारा (वर उल्लेखलेला) अ‍ॅडजस्टेबल पाना उपयोगी पडावा.
  • - हे गरज असल्यास - एक लोखंडी पाईप साधारण फुटभर वगैरे. घट्ट बसलेले नटस उघडतांना पान्यावर पाईप लावला की त्याची लांबी वाढते आणि मग ताकद लावायाला चांगला उपयोग होतो.)

कोणतेही भाग उघडण्याआधी कसे जोडलेले आहेत ते व्यवस्थित पाहून घेणे.
काही लाकडी भाग खिळे ठोकून बसवलेले असल्यास शक्यतो काढू नका. कारण त्यात फेव्हिकॉल वापरलेले असेल तर खिळे काढूनही उपयोग होत नाही.
शक्य तो कमीत कमी भाग खोलण्याचे धोरण ठेवा.

(जर विकत आणलेली असतील तर) हत्यारे नंतरही उपयोगी पडत राहतील.

शिवाय त्या फर्निचरच्या दुकानात जाऊन त्यांनाच विचारून घ्या काय काळज्या घ्यायच्या ते. काही फुकट टिप्स मिळाल्या तर उत्तमच ~!
किंवा चिकटपणे तेथे थांबून ते कसे असेंबल करतात ते पाहून घेता येईल - शक्य झाल्यास.
एकदा पाहिले की मग घरी तसेच करता येईल.

असे असले तरी अश्विनीमामींच्या सल्ल्याचाही विचार करा. काय शक्य आहे त्या आढावा घेऊनच काम अंगावर घेतलेले बरे.
करणारच असाल तर अजून कुणाला तरी सोबत घेऊन करा एक से भले दो! Happy

रेडीमेड फर्निचर अ‍ॅसेंबल करताना कंपनीच्या चार चार माणसांना सुद्धा कष्ट पडतात. त्याचं सेटिंग चुकलं कि ते बसत नाही. तेव्हां विचार करून निर्णय घ्यावा. एखादा सुतार मिळाला तर बरं होईल. संपूर्ण बेडरूम सेट असेल तर शेवटी बजेट २००० रू. च्या आसपासच जाईल असं वाटतं.

मी क्रोममधून इटालियन फर्निचर घेतलं होतं. वॉर्डरोबची तक्रार आहे. बेडचीही तक्रार आहे. जुनं झालं असेल आणि घर शिफ्ट करत असू तेव्हा जागेवर विकून टाकावं आणि सुताराकडून दर्जेदार फर्निचर बनवून घ्यावं असं वाटतंय. रेडीमेड फर्निचर कितीही चांगल्या कंपनीचं असलं तरी त्याला बनवून घेतलेल्या फर्निचरची सर येत नाही.

खरे तर निरनिराळ्या कोनातून त्याचे अनेक छायाचित्रे घेउन ठेवणे उत्तम. >>> हे अगदी 'मस्ट' आहे! आम्ही आमच्या स्टीलच्या मांडणीचे तसे केले होते. त्यामुळे इथल्या भांडीवाल्या माणसाकडून करून घ्यायचे म्हणजे तो ५००/- मागत होता. मांडणी घेतली तेव्हा ७००/- ची होती. तेव्हा विविध बाजूंचे फोटो खूपच कामास आले. Happy

रेडीमेड फर्निचर अ‍ॅसेंबल करताना कंपनीच्या चार चार माणसांना सुद्धा कष्ट पडतात. त्याचं सेटिंग चुकलं कि ते बसत नाही. तेव्हां विचार करून निर्णय घ्यावा. >>> +१००

जुनं झालं असेल आणि घर शिफ्ट करत असू तेव्हा जागेवर विकून टाकावं आणि सुताराकडून दर्जेदार फर्निचर बनवून घ्यावं असं वाटतंय. रेडीमेड फर्निचर कितीही चांगल्या कंपनीचं असलं तरी त्याला बनवून घेतलेल्या फर्निचरची सर येत नाही. >>>> +१००००

सगळ्यानां ध्न्स
एक लिस्ट बनवली आहे आतच
points to remember Happy धन्स

रेडीमेड फर्निचर अ‍ॅसेंबल करताना कंपनीच्या चार चार माणसांना सुद्धा कष्ट पडतात. त्याचं सेटिंग चुकलं कि ते बसत नाही. तेव्हां विचार करून निर्णय घ्यावा. एखादा सुतार मिळाला तर बरं होईल. >> मिळालेला पण याला खुप्च हौस , आता पैसे वाचवायचे तर हि खाटाटो प Sad

लहान बाळ संभाळून स्वतः हे करणे जरा अवघड आहे.
>>अगदी

मला माझे wardrobe[ ३ doors] scrap करायचे आहे कारण
१>लेकी नी आरसा वाला दरवाजा आपटुन पुन्हा बसणार नाही या अवस्थेत आणला आहे
२> दुसरा मोठा ही वरील प्र माणे येण्याच्या मार्गा वर आहे
३> आडव्यापट्ट्या बसत नाही कारण तो भाग जास्त लांब गेला [फाकला] आहे
४> २ही डॉवर चे १२ वाजलेले आहेत

त्याच्या सुट्या फळ्याचे काही करता येईल का?

एखाद्या सुताराला दाखवा. म्हणजे कपाटासाठी वापरलेलं प्लायवुड चांगल्या अवस्थेत आहे का हे तो सांगू शकेल. प्रत्यक्ष बघितल्याशिवाय प्लायवूड परत वापरण्याजोगं आहे की नाही हे सांगता येणार नाही. जर प्लाय्वूड चांगलं असेल तर ते वापरून दुसरं काहीही करता येईल.
दुसरं म्हणजे फक्त दरवाजाच खराब झाला असेल तर तेवढा नविन सुद्धा बसवता येतो.

असं पोस्ट वरून नक्की कळत नाहीये. बघून जास्त व्यवस्थित सांगता आलं असतं. Happy