रानफुलांच्या रानवाटेवर (भाग - ५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 20 March, 2012 - 01:40

रानफुलांच्या रानवाटेवर (भाग १) - http://www.maayboli.com/node/29535
रानफुलांच्या रानवाटेवर (भाग २) - http://www.maayboli.com/node/29694
रानफुलांच्या रानवाटेवर (भाग ३) - http://www.maayboli.com/node/30580
रानफुलांच्या रानवाटेवर (भाग ४) - http://www.maayboli.com/node/31203

७१) मोतिया

मोतियाच्या कळ्या

७२) रान तेवण

७३)

७४) लवे

७५) Panicled Spot Flower

७६) दसमुळी/जंगली अबोली

७७) दिंडा

७८) Cinderella Weed

७९) बांडगुळ

८०)Grey Leaf Heliotrope

८१) गायरी/Hooker's Woodrose

८२) Haplanthodes

८३) सीतेचे पोहे/चायनिज लव्ह्ग्रास

८४) गोंदवेल/स्वेलो फिंगर ग्रास

८५)

८६)

८७) माऊंटन ग्रास

८८)

८९) धोतरा

९०)

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

जागु, मस्तच काम गं.

किती चिकाटीने केलेय्स सगळं.. ह्यातली काही फुले इतकी बारिक असतात की फोटो काढायचा म्हटला तरी कंटाळा येईल.

लहानपणी सितेच्या पोहे हा खेळण्यातला एक प्रमुख प्रकार असायचा Happy

मस्त मस्त Happy

किती चिकाटीने केलेय्स सगळं.. ह्यातली काही फुले इतकी बारिक असतात की फोटो काढायचा म्हटला तरी कंटाळा येईल>>>>+१

साधना, जिप्सि, ससा, मम्हईकर धन्यवाद.
खर सांगायच तर मला सगळ्या फुलांची नाव हवी होती पण मिळत नाहीत.

जागू , मस्तच....
लहानपणी गोदवेलीचे ते तुरे मनगटावर ठेवून कोपराजवळची त्वचा खाजवली की तो तुरा शर्टच्या बाहीमध्ये जायचा.... असा जादूचा खेळ खेळायचो आम्ही.....

वा जागू कित्ती छान फोटो काढलेस आणि नावे देखील दिली आहेस त्याबरोबरीने.......
चांगलाच अभ्यास दिसून येतोय - फोटोग्राफी तंत्राचा आणि वनस्पतीशास्त्राचाही.
डॉ. सानेमॅडम म्हणातातच - ज्यांना बॉटनी काही माहित नाही त्यांनीच या क्षेत्रात खूप काम केले आहे, त्यांनाच वनस्पतींबद्दल जास्त प्रेम असते (अर्थात अपवाद असणारच याला - हे लिहायचे कारण असे की कोणीतरी बॉटनीवाला एकदम धावून येईल ना माझ्यावर........;))

शशांक धन्यवाद. तुम्हाला जर वरील काही फुलांची नावे सापडली तर मला नक्कीच सांगा. आणि अभ्यास वगैरे नाही हो ही आवड आहे.

मस्त फोटो!
जगू, तो ७९ नंबरचा फोटो आहे ना, तशी खूप फुलं मी कोकणात ऑस्ट्रेलियन बाभळीच्या झाडावर बघितलीत. ही त्या झाडाचीच फुलं आहेत म्हणून सांगितलं मला तिथल्या लोकांनी.

जागू, धन्य आहेस.
आणि चिमणीचे पोहे तर माझ्याही लहानपणात घेऊन गेले.
मोतियाची फळे पण सुकल्यावर सुंदर दिसतात.

वा! सह्हीच आहेत ही पण फुलं. हे एक माझ्याकडून रानफुल :

हे झाड. संपूर्ण काटेरी. :

ful1.jpg

हे फुल, जवळून. किती सुरेख पिवळाधमक रंग आहे. :

ful2.jpg

ही फळं :

ful3.jpg

गौरी अग बांडगुळ हे काही ठरावीक मोठ्या झाडांना लागतात. एक गाठ तयार होऊन तिथुन बांडगुळाची वाढ होते.

मामी आमच्याकडे ह्याला रिंगण म्हणतात. माझ्या घराच्या मागील कंपाऊंडच्या बाहेर आहे हे कधीपासुण फोटो काढायचा राहीलाय. ह्याच्या फळांचा नागीण ह्या रोगावर उपचारासाठी वापर करतात.

झकासराव, प्रज्ञा, चातक, दिनेशदा अवल धन्यवाद.