"देऊळ"

Submitted by sarode_vaishnavi on 19 March, 2012 - 05:31

"देऊळ" बघितला खर तर जरा उशीरानेच.या चित्रपटाबद्दल काही लिहण्याइतप्रत मी मोठी नाही. पण देऊळ पाहून बिथरली. मुळातच आस्तिक स्वभावाची पण दोन मिनटांसाठी माझ्यातल्या श्रद्धेवर प्रश्न चिन्ह उभं राहिल्याची भावना जागली..!
राजकारणावर उभं असलेल्या "देऊळा" मुळे आपल्या सारख्या बोलणार्‍या असू देत, कि 'करडी' सारख्या मुक्या, जनावरांचे हाल कदाचित खरे दाखवलेही असतील..
पण-
'देऊळ','मंदिर' मला एक पवित्र स्थान वटते, असू देत कि राजकारणावर उभारलेल,तिथे विसावून,शांत बसून घंटेचा नाद एकताना मनाला जो सुकुन मिळतो तो शब्दात सांगता येणार नाही.देव भित्र्यांचा सहारा असतो,असे म्हणणारेही अनेक भेटतात्,कदचित ते बरोबरही असेल.पण आपला देव आपण निवडावा,ही प्रत्येकाची वैयक्तिक आणि श्रद्धेची बाब असते हेही तितकच खरं..!
उच-निच,गरिब-श्रीमंत,लहान-मोठा सर्व एकाच दगडासमोर अनवाणी पायांनी डोकं ठेवतात,म्हणून देऊळ मला समानतेचा मोठा दगडच वाटतो.तिथे येणारा प्रत्येक काही मागतो असा समज आहे.खर तर मला तो गैरसमज वाटतो,माझ्यासारखी फक्त देऊळात तिथली शांतता अनुभवायला,ती अंतरंगात भरुन घ्यायला जाते.
'देऊळ' कसही असू देत, राजकारणावर उभं वा श्रद्धेवर उभं,देउळात येउन निष्पाप मनानं दोन मिनिट शांत बसल्यावर जी उब अंतरी जागते ती मला आईच्या माये इतकिच प्रेमळ वाटते...

गुलमोहर: 

वैष्णवी, देऊळ मी पण पाहिला. पण तुम्ही जो मुद्दा लिहिला आहे, त्याचा या चित्रपटाशी काहीच संबंध नाही. सर्व भाविकांच्या भाबड्या श्रद्धेचे कसे स्वार्थी राजकारण केले गेले, याचे हा चित्रपट म्हणजे एक उदाहरण आहे. ज्याला दत्त दिसले त्यालाच देवळात प्रवेश मिळत नाही आणि ज्या करडीच्या रुपात हे देव दिसले, तिला खिळा लागूनही तिच्यावर साधे उपचारही न करता केवळ एक शोभेची वस्तू म्हणून देवळात ठेवले जाते. असल्या आपमतलबी लोकांनी मांडलेल्या ह्या श्रद्धेचा बाजार बघून अंध भक्तांचे डोळे उघडावे, हाच या चित्रपटाचा उद्देश आहे.

देवावर श्रद्धा असेल, त्याला भेटून मायेची उब लाभत असेल, तर कोणत्याही साध्या मंदिरात, दगडाच्या छोट्या देवळातही मिळायला हवी. त्यासाठी कोणीतरी चमत्काराची अफवा पसरवून मोठे केलेल्या मंदिरातच जायला हवे, असे नाही. पण लोक अंधपणाने असल्याच देवस्थांनांमध्ये जाण्यात धन्यता मानतात आणि श्रद्धेच्या बाजारातले एक गिर्‍हाईक होतात, ही प्रक्रिया या चित्रपटातून दाखवली आहे.