‘भूमितीय आयुष्य’

Submitted by अध्वन्य on 13 March, 2012 - 08:21

‘जे पिंडी ते ब्रम्हांडी!!’ .....
.......
आयुष्याच्या slambook कडे जरा डोकवून पाहिलं तर भूमितीचेच आकार डोळ्यासमोर उभे राहतात. समांतर आणि छेदणाऱ्या रेषा, प्रतल हे जणू परस्पर मानवी संबंधाचे प्रतिक असल्याचा भास का बरं होतो? समज आल्यापासून आपण कितीतरी मिती अनुभवतोच की !!!.....
.......
समांतर रेषा म्हणजे आयुष्याच्या रुळावर कधीही न भेटणाऱ्या किंवा अनोळखी व्यक्तींसारखाच... तर एकमेकांना छेदणाऱ्या रेषा अगदीच कुठेतरी भेटल्याची खुण असल्यासारख्याच नाहीत काय?
......
रेषा जरी वेगळ्या झाल्या तरी काही साधर्म्य राहतेच-प्रत्येक प्रतलात अनेक रेषा असाव्यात तसं. प्रत्येक प्रतालाची समूहाप्रमाणे एक frequency असते त्याच्या equation सारखी!!!
.....
एकदा cross झाल्यावर पुन्हा cross होण्याची शक्यताही धुसर...अन् एकरूप रेषा तर अशक्यप्राय....!! केवढी ही जीवनाची विविधता....!
.....
जर एखादा बिंदू, त्याला सामावणारी रेषा, रेषेला सामावणारं एखादं प्रतल दुसऱ्या प्रतलाला मिळत नसेल तर म्हणावं आपण त्या प्रतलाच्या तुलनेत 3-D मध्ये आहोत.
.....
पण प्रत्यक्षात space-time ला अशा भूमितीय आयुष्यात कसं रेखाटायचं? आता तिथे त्रिमितीय जाणीव कमी पडतेच. जाणीवेची चौथी मिती शोधायची कुठे?

for more read:

http://atul-ghalame.blogspot.in/

गुलमोहर: 
शब्दखुणा: