देव अस्तित्वात आहे का?असल्यास, विश्वनिर्मितीमागे त्याचा काय हेतु असावा.?

Submitted by जेम्स बाँड on 12 March, 2012 - 11:37

देव अस्तित्वात आहे का?असल्यास विश्वनिर्मितीमागे त्याचा हेतु काय असावा.जर देव अस्तित्वात नसेल तर विश्वाच्या अस्तित्वाला काय कारणीभूत(cause) असावे ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विश्वाच्या अस्तित्वाला माया (गुणधर्म, त्या नावांची स्त्री नव्हे) कारणीभूत आहे. आपल्याला असे वाटते की विश्व अस्तित्वात आहे, अ‍ॅक्च्युअली ते अस्तित्वात नाहीच आहे.

देव आता अस्तित्त्वात नाही. वैश्विक स्फोटात गेला... आता मानव शिल्लक आहे. अधून मधून देव कधिकाळी असल्याच्या खुणा सापडतात पण... गेला तो आता!

हो आहे ना.
आणि विश्वनिर्म्रिती हि त्याच्या हातुन घडलेली चूक आहे.
त्याची सजा आपण भोगत आहोत.

चारशे एक व्या प्रतिसादात भेटू
कुणास ठाऊक इतके प्रतिसाद होतील की नाही.
त्या आधीच प्रथम हिंदू धर्माची निंदा, ब्राह्मणांची निंदा, मग काँग्रेस, भाजप यांना लाथा, मग एकमेकांची अक्कल काढायची, इ. गोष्टी होऊन हा धागा बंद पडेल. आणि ते बुद्धिप्रामाण्यवादी? त्यांना तत्वज्ञानातले ओ का ठो कळत नाही, कुठल्यातरी अज्ञान लोकांचा संदर्भ देऊन म्हणतात देव नाही, धर्म खोटा!! पण इतरांसारखे मान्य करणार नाहीत, की हे पूर्णपणे समजले नाही तोपर्यंत काही मत देऊ नये!!

कुठल्याहि विषयावर चर्चा म्हणजे हेच, असे मायबोलीचे वैशिष्ठ्य आहे. त्यामुळे आजकाल मायबोलीवरील चर्चा म्हणजे विनोद झाला आहे.
तर देव वगैरे राहू दे. फार मोठा विषय आहे तो.
आपले नेहेमीसारखे सुरु करा, हं, कुठे गेले मधुकर, जामोप्या, रानडुक्कर इ. नेहेमीचे लढवय्ये? लै मज्जा, त्यांच्या अक्कलेचे तारे तोडलेले पहाण्यात!

निर्जिव म्हणजे काय...?
कंम्पूटर च्याबाबतीत आपण निर्जिव.... आपण आपल्या जगात..... ते त्यांच्या जगात

निर्जिव
म्हणजे काय...?>>>कॉम्प्युटरला जाणिव(consciousness) नसते मनुष्याला असते.

बॉन्डा,
तुम्ही देव कशाला म्हणता यावर ते अवलंबुन आहे,
निसर्ग हा आमचा देव, त्याचे अस्तित्व दिसते, त्याचा कोपही दिसतो आणि त्याची मायाही आपल्यापर्यंत पोहोचतेच नै का

जसे काही जण संगणकाला देव मानतात, त्याची पुजा करतात, त्याला साकडं घालतात, आणि तुमचे काही चुकले तर त्याचा कोपही होतो.

बाँड,

देव म्हणजे काय हे बघण्यापूर्वी दुसरा एक प्रश्न बघूया. तो म्हणजे : या सृष्टीत काही अचल, अढळ, अपरिवर्तनीय आहे का? तसं काही असल्यास ते अंतिम सत्य (अल्टिमेट रियॅलीटी) ठरेल. त्यालाच देव म्हणता येईल.

आपली इंद्रिये चालण्यासाठी उत्तेजना (स्टिम्युलस) लागते. ती जर मिळाली नाही तर इंद्रिये काम करीत नाहीत. ही उत्तेजना नेहमी म्हणजे जगतातील बदल (चेंज इन एन्व्हायरन्मेंट) या स्वरूपातच उपलब्ध होते. साहजिकच इंद्रिये केवळ बदल टिपू शकतात. त्यांना स्थिर वस्तू दिसू शकत नाही. म्हणून इंद्रियजन्य ज्ञान भामक मानले आहे. इथे भ्रामक म्हणजे खोटे नव्हे, तर सतत बदलणारे असा अर्थ अभिप्रेत आहे.

जर सगळ्या गोष्टी बदलत आहेत, तर स्थिर काय आहे? तर, या जगात एकच गोष्ट स्थिर आहे. ती म्हणजे 'मी अस्तित्वात आहे' ही जाणीव. भारतीय तत्त्वज्ञानात या जाणीवेलाच सद्वस्तू मानले गेले आहे. यालाच आत्मा म्हणतात. तो अचल, अविनाशी, अढळ आहे.

आत्म्याबद्दल भ्रामक आणि अभ्रामक दोन्ही स्वरूपाची ज्ञाने उपलब्ध आहेत. त्यांनाच अनुक्रमे अपराविद्या आणि पराविद्या असं म्हणतात.

विश्वनिर्मिती म्हणजे काय आणि तिचा हेतू काय याविषयी मला फारशी माहिती नाही. मला वाटतं की इथे थांबावं.

आ.न.,
-गा.पै.

अलिकडेच रिचर्ड डॉकिन्स ह्या विख्यात Athiest ने ते खरेतर अज्ञेयवादी असल्याचे स्पष्ट केले आहे.त्यामुळे देवाच्या अस्तित्वावर पुन्हा चर्चा सुरु झाल्या आहेत.

नविन
काहितरी विषय घ्या,
हा विषय आता खुप
जुना झालाय आणि प्रचंड
चघळला गेलाय>>>लिंक द्या की राव त्या धाग्यांची.

चिन्चवडला "श्री विघ्नहरीमहाराज देव" आहेत, तुम्हाला चालताहेत का बघा.
स्वतः जाऊन त्यान्च्या पायी अन मोरयागोसावी समाधीवर मस्तक ठेवलेत चिन्चवडात तर बराच फरक पडेल तुमच्यात Proud

>>> महाराजांच्यात फरक नाही पडला म्हणजे मिळवलनित, काय <<< Lol
तरीच, काहीकाही महाराज पाया पडणार्‍याच्या डोकीपाठी फटके का मारतात ते आत्ता कळले, फरक पडतोय अस वाटल की मारला फटका...... Lol
तरी बर, "देव" आहेत का अस पुरुषीसापेक्षतेनेच का विचारलं, देवी आहेत का अस का नाही विचारल असा लिन्गसापेक्षी स्त्रीवाद उसळला नाहीये! Wink
हल्ली काय बोवा, लिन्गनिरपेक्षजगण्यावागण्याबोलण्याची इनथिम आहे! काळजी नको घ्यायला?

मंदार जोशी, limbu timbu आपल्याला नम्र विनंती, या धाग्यावर भंकस करु नये विषयाला धरुन बोला.

आता यात भन्कस काय केली? तुम्ही विचारलेत देव अस्तित्वात आहे का! आता मला चिन्चवडचे देव माहिती आहेत अस्तित्वातले, त्यान्ना बघितलय प्रत्यक्ष, मग सान्गायला नको ते? सान्गितल तर भन्कस कशी काय बोवा? Wink
असो. तुमचे चालुद्यात Happy

या धाग्यावर भंकस करु नये विषयाला धरुन बोला.<<< या वाक्याने मला जास्तच हसू यायला लागलयं,

असो
बॉन्डा देव म्हणजे तुला काय वाटते ते तू आधी मनात कोणतीही आढी न ठेवता लिही म्हणाजे त्यावर चर्चा / टि का / टिप्पणी करायला सोपे जाईल नाहितर हे असेच चालू राहिल, चर्चा होणारच नाही आणि .......

>>मंदार जोशी, limbu timbu आपल्याला नम्र विनंती, या धाग्यावर भंकस करु नये विषयाला धरुन बोला.

Look who is talking Light 1 Proud Biggrin Rofl Lol

आता यात
भन्कस काय
केली?>>चांगलय, आधी टगेगिरी करायची आणि नंतर ईतरांच्या नावाने एडमीनकडे जावुन बोंब मारायची.
<<एक सुक्ष्म
निरिक्षण -
बाकी धाग्यांवर भंकस
चालते तेव्हा ? मग इकडे
झाली तर का नको ?>>कोणत्या धाग्यावर महेश.

जेम्स
बाँड
तुम्ही
बाकी
च्या
धाग्यां
वर
असं
काहीतरी
बरळत
असता
तेव्हा
कुठे
गेला
होता
राधासुता
तुझा
धर्म? >> Wink

मुद्देसूद असते आणि राधासुत असते, कृपया फरक लक्षात घ्यावा.
>>कोणत्या धाग्यावर महेश
जिथे जिथे देव, धर्म, हिंदू, ब्राह्मण, सावरकर, इ. विषय असतात असे धागे.
आणि मी "भंकस चालते" असे लिहिले आहे, तुम्ही करता असे नाही, त्यामुळे गैरसमज करून घेऊ नये.
पुढच्या पोस्टीपासुन भंकस न करता, धाग्याच्या विषया संदर्भात लिहिन.

.

धाग्याच्या विषया संदर्भात लिहिन.<<< विषय मुळात्च खुप मोठी व्याप्ती असलेला आहे. आणी पाहिजे तसा भरकटणारा , प्रथम देव, नंतर धर्म, जात-पात, अतिशय खालच्या पातळी / वर्गा पर्यंत ही चर्चा जाऊ शकते त्यामूळे धाग्याची सुरवात करताना तुम्ही (बॉन्ड) तुमचे प्रस्ण मुद्देसुद लिहावयास पाहिजे होते म्हणजे अम्हाला त्यावर प्रतिक्रिया देण सोपे गेले असते. आता भो.आ.क.फ

आस्चिग, एक सुक्ष्म निरिक्षण
> आपले नेहेमीसारखे गुरु करा, हं, मधुकर, जामोप्या, रानडुक्कर इ. नेहेमीचे
झक्कींच्या पोस्टमधे "सुरू" असे आहे.

चुकून 'गुरू' झाले, 'सुरू' म्हणायचे होते.
शिवाय ते देव का देवी हा वाद विसरलोच होतो. तोहि होऊन जाउ द्यात. मराठी आंतर्जालावर स्त्रियांचे प्रमाण कमी आहे , असे काही झेंडे फडकवून सिद्ध केले होते. त्यानिमित्ताने स्त्रिया येथे येऊन ते झेंडे उलटे फडकवायला लागतील.

'देव' 'ईश्वर' 'गॉड' 'अल्लाह' या नवांवर भंकसच होत असते सभागृहांत आजकाल .... Uhoh

काही तरी आहे त्याचे नाव नक्की 'देव' आहे का? ते माहीत नाही.

पण काही/कोण तरी आहे....ज्याने मला, तुम्हाला जगायला भाग पाडले आहे.....आपण तसा 'अर्ज' न करताच आपल्या परवानगी शिवाय.

बघा ना, आपल्याला एकदा विचारलं सुध्दा नाही. त्या 'देव' का 'घेव' ने.
जगशील का रे माणसांत,जनावरांत कशात???
की, दगड धोंडे, खापर कोळशे काय बनायला काय आवडेल??
अशी साधी 'चॉईस' सुध्द्दा विचारली नाही..

ठिकै.....

त्यानंतर काय....., जिवन दिले तर दिले......आपल्या मर्जि प्रमाणे गरिब'जिव' जगुही शकणार नाही नी मरुही शकणार नाही अशी अवस्था अर्थात 'व्यवस्था' करुन ठेवली.

म्हणुन मी म्हणतो.....तो आहे तर त्याला असु द्या, नसेल तर नसु द्या (नसण्याला पुरावे अपुरे पडतील्) पण...., तुम्ही जगा सर्व बंधन, सर्व पाश फेटाळुन.., सकल नियमांना फाट्यावर मारुन फुकट मिळालेल्या जिवनाला मनमुराद जगा...... परीणामांचा विचार (करायचा असल्यास) करुन त्यास सामोरे जायची तयारी असल्यास... जे वाट्टेल ते करा........ शासनश्वास जगुन घ्या......जगण्यास कारणे खुप आहेत या सृष्टीत.....त्यावर वेगळे लेख होतील. अरे मी म्हणतो....... क्षणाक्षणांत 'युगे' जगुन घ्या....कारण जसा न मागताच एक एक श्वास मिळाला आहे तसा तो कोणत्या क्षणी काढुन घेण्यात येईल हे ही तो सांगायला येणार नाहीय.

आणि हो असले प्रश्न विचारत बसण्यापेक्षा स्वतःला एकदा जरुर विचारुन बघा की, तुमच्या स्वतःचे अस्त्तित्त्व आहे कि नाही ते?'बाकी प्रश्न आपोआप सुटतील.

*हात पाय चालतायत म्हणजे 'अस्त्तित्त्व' नव्हे.

आणि हो असले प्रश्न
विचारत
बसण्यापेक्षा स्वतःला
एकदा जरुर विचारुन
बघा की, तुमच्या स्वतःचे
अस्त्तित्त्व आहे
कि नाही ते?'बाकी प्रश्न
आपोआप सुटतील.>>>कन्फ्युज्ड

Pages