चहा?कॉफी? नाही नाही.... बोर्नव्हिटा! :P

Submitted by limbutimbu on 3 September, 2008 - 01:51

सॉरी, धिस पोस्ट वॉज वर्थलेस, आय रियलाईज्ड इट टू लेटर Sad

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे फोटो !
मला लहानपणी खूप आवडायचं या रंगाचं पूराचं पाणी पहायला :), चुकून पूर आला कि आम्ही लकडी पूला वर जायचो पहायला.
या रंगाचं पाणी बघून मला चहाचा पूर आलाय असं वाटायचं, गढूळ वगैरे काय म्हणतात लोक इतक्या सुंदर पाण्याला !

फोटो छान आहे. पंचगंगेचा पूर आठवला, आम्हीही पुलावर जायचो बघायला. नजर पोचेल तिथपर्यंत असं पाणी असायचं. पावसाळ्यात नळालाही असं पाणी यायचं कधीकधी. Happy
'पाऊस' विषय आहे तर स्पर्धेत चालेल की पुराचा फोटो. आपल्याकडे पावसानेच येतो पूर, बर्फ वितळून आला असता तर चालला नसता. Happy स्पर्धेच्या बीबीवर टाक.

मस्त. छोकरीच्या चेहर्‍यावरचे भाव न दिसता समजतायत.

किती गोंडुली आहे ती! मी तर पाणी बघायच्या ऐवजी तिलाच पाहत बसले...छोटुशी पावलं, झॉलरचा फ्रॉक, सुटलेला पट्टा, राऊंड कट!! मला माझाच फोटो आठ्वला लहानपणीचा..! Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नको दंड नको शिक्षा , शांत मंगलमय गणेशोत्सव हीच अपेक्षा!
Happy

किती छान फोटो...

खरंच रे लिंबू, मी पण तुझी बाहुलीच बघंत बसले. पाठमोरी (सुध्दा) किती गोड! आशुचं वर्णन अगदी परफेक्ट!

खरंच माझंही पहिल्यांदा तिच्याचंकडे लक्ष गेलं. खासकरुन झालर झालरच्या फ्रॉककडे. फ्रॉकचा रंगही तिला खुप छान दिसत आहे. Happy तुमच्या गोडुलीचाही एक फोटो टाकाचं.

लिंबूदादा, फोटोचं कौतूक सगळ्यांनीच केलं.
आता मी तू दिलेल्या शीर्षकाचं करतो.. Happy
विषय पावसाचा असला, तरी लहान मुलाच्या अनुषंगानं तुला सुचलेलं शीर्षक- खरंच भारी!!
लहान मुलं घरात आलेल्या पाहूण्यांना ताठ मानेनं सांगतात ना- चहा-कॉफी? नाही, नाही. मी फक्त दुध-काँप्लान-बोर्नव्हिटा पितो! त्याची पार्श्वभूमी, अन त्या छकूलीला भावलेला पाण्याचं रंग- याचा सुरेख मिलाफ या साध्या-सोप्या शीर्षकातून व्यक्त झालाय.

लिंबूदादा, मलाही आधी तुमच्या शीर्षकातच कुतुहल वाटलं.. म्हणून तर फोटो पाहिला...
शीर्षकातच वाचकाला खेचून आणण्याची ताकद असावी लागते. आणि ती नक्कीच या शीर्षकात आहे.. Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नको दंड नको शिक्षा , शांत मंगलमय गणेशोत्सव हीच अपेक्षा!
Happy

जस जशी मोठी होत्ये तस तशी निरागसता अर्थातच कमी कमी होत जाते!
Happy

खरंच आपला चेहरा हल्ली आरशात पाहवत नाही.. !! हा कोण असे वाटते.... 'पुर्वी' आपण 'असे' नव्हतो.. असं वाटतं बर्‍याच वेळेला....

Happy

लिंब्या अप्रतीम छायाचित्रण रे ! तुझ्या रोमा रोमात कलाकारी भिनलिये !
.................................................................................................................................
** आयुष्य म्हणजे एक फार मोठी गुंतागुंत आहे, ती सोडवत बसण्यापेक्षा त्यात गुंतुन मनमुराद जगावे **

बस, बस लिंबूदादा. वाचवत नाही. असं यापूढे लिहू नकोस. अन ते मनातही ठेऊ नकोस.
मी पण आता चटकन दुसर्‍या बीबीवर जातो.
तुझ्या छकूलीला यापुढे जगातली सर्व सुखे अन प्रेम मिळो.

>>तुझ्या छकूलीला यापुढे जगातली सर्व सुखे अन प्रेम मिळो.

असंच म्हणते.. तिच्या लक्षातही नसेल ते लिंबूदा.तिच्या मनात तो 'न मिळालेला बोर्नव्हीटा' नाही राहणार तर तुम्ही दिलेलं प्रेम्,जिव्हाळा राहील.. तेव्हा तुम्हीही नका ठेऊ मनात..

फोटो आवडला.. लहानपणची निरागसता डोळ्यासमोर आली!

अगदी छान!! पाण्याचा रंग आणि फ्रॉक चा आकाशी रंग काय मस्त जमलेत.. आणि त्यामुळे दोन्ही रंग खुललेत..
लिंबू अहो, बोर्नव्हीटा नसला तर काय झाले. मुलांना दूघ लागते वाढत्या वयात, ते मिळाले ना, मग अजून काय हवे? बोर्नव्हीटा वगैरे बोनस. मला तर त्याची चव पण माहीत नाही आणि आता मुलीला पण माहीत नाही Happy . मोठे झाल्यावर आठवते ते फक्त आई-वडीलांकडून मिळालेले प्रेम..
तुमच्या छकु चा उजवा छोटासा पाय दिसतोय बघा, फार गोड!!

खूपच छान आला आहे फोटो. तुमच्या छकुलीने घातलाय तस्साच फ्रॉक माझ्या धाकट्या बहिणीला आईने शिवला होता. तिचे लहानपणीचे "ध्यान" आठवून एकदम रडायलाच आले.

मोठे झाल्यावर आठवते ते फक्त आई-वडीलांकडून मिळालेले प्रेम..>>> अगदी अगदी. आणि तुमची धाकटी माझ्यासारखी असेल तर तो भंगार चवीचा बोर्नव्हिटा न दिल्याबद्दल कणभर जास्तच माया करेल तुमच्यावर Happy

साजिरा, आयटे, बीएस्के, सुनिधी, अमृता, चिन्नु, सिन्ड्रेला.... सर्वान्च्या मनःपुर्वक प्रतिसादाबद्दल धन्यवाद! Happy

एका मात्र आहे हं, बोर्नव्हिटा नाही तर नाही पण दोघीन्ना लहानपणी लिम्बीने शेळीच्या (की बकरीच्या?) दुधाचा स्पेशल रतिब लाऊन खुराक दिला होता! त्यामुळे बारिकसारिक आजारपणे होत नाहीत, त्वचा विकार दुर रहातात वगैरे ऐकण्यात आहे! खरेखोटे लिम्बी अन देव जाणे! Happy

साजिर्‍या, माझ्या मते व माझ्या सापेक्ष ती एक वाईट गोष्ट होती की मी काही एक पुरवू शकलो नाही! ते सत्य इथे फोटोच्या शिर्षकाच्या निमित्ताने मनमोकळेपणे माण्डले गेले, मान्डल्याशिवाय रहावले नाही, पण मी तसा वाईटातूनही चान्गले काढणारा, चान्गले शोधणारा माणूस! Happy
त्यामुळे असे आहे की अजुनही निमित्तमात्रे तिला काही भेट द्यायची असल्यास माझ्याकडे "बोर्नव्हिटाची बाटली" हा एक उत्तम पर्याय शिल्लक नाही का? अन आताच्या वयात तर तिला त्याचे अजुनच अप्रुप वाटेल! नाही का?
एनिवे.......!
या निमित्ताने एक जाणवते की माणसाच्या मनात अनेकानेक गोष्टी लपलेल्या वा लपवलेल्या अस्तात! चेहर्‍यावर चढवलेल्या "मुखवट्या" आड दडलेल्या अस्तात! फार क्वचित त्या उघड केल्या जातात वा होतात!

प्रतिसाद व शुभेच्छान्बद्दल सर्वान्चे पुन्हा एकदा आभार! Happy
...;
आपला, लिम्बुटिम्बु

लिंबूभाऊ, ती एवढे वाकून बघतेय बघून एकदम मनात "अगं जपूSSSन" असे उद्गार आले, पण ती तर मस्त घोरपडीसारखे खडकाला चिकटून स्वतःला सांभाळून खालचे दृष्य तन्मयतेने न्याहाळतेय !! (बोर्न्व्हिटा बद्दलचे पुढचे तुमचे लिखाण वाचून का कुणास ठाऊक अश्वत्थामाला त्याची आई पाण्यात पीठ कालवून दूध म्हणून प्यायला द्यायची ही गोष्ट आठवली) आम्हाला पण लहानपणी बोर्न्व्हिटा दुर्मिळच होता पण त्याचं काहीच कधी वाटले नाही कारण आईवडिलांचे प्रेम ही गोष्ट सगळ्याची भरपाई करत होती Happy

लिंबूदादा, प्लीज, असं कधीही मनात आणू नका.. आणि ते तिच्या समोर उघडही करू नका.. अजून जगात अशा खूप काही गोष्टी आहेत की ज्या फक्त तुम्हीच तिला देऊ शकता.. आता हा फोटोच घ्या ना.. असा फोटो आपला काढला होता का कुणी ??? आणि काढला असता तरी त्याचं इतकं कौतुक.. ओळखीच्या , अनोळखी ..ज्यांना आपण फक्त लिखाणावरुन ओळखतो अशा लोकांकडून झाले असते का? प्रत्येक आई वडिलांची मुलांना प्रेम द्यायची पध्दत वेगळी असते... पण जे काही त्यांना द्यायचे आहे ते त्यांच्या रक्तातल्या संस्कारांच्या वारशाने त्यांना आपोआपच मिळत असते... नाही का?
तुमची पोस्ट वाचून राहावलं नाही म्हणून लिहीलं.. वास्तविक तुम्ही माझ्याहून सर्वार्थाने मोठे आहात.. त्यामुळे चु.भु.द्या.घ्या. Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नको दंड नको शिक्षा , शांत मंगलमय गणेशोत्सव हीच अपेक्षा!
Happy

बोर्न्विटा आमच्या लहानपणी गावातच कुठेही मिळत नव्हता.... आता मिळतो...

लिम्बुदा तुमच्या ह्या फोटोच्या निमित्ताने खुपच चांगले विचार वाचायला आणि एक सुंदर फोटो पाहायला मिळाला.
तुमचे आणि प्रतिसाद लिहिणार्‍या सगळ्यांचे मनापासुन आभार!

लिंब्या भो खरच खुप छान फोटो Happy
****************************
Happy Blush Proud Lol Biggrin Rofl

लिम्बुटिम्बु,
मित्रा प्रकाशचित्र पाहुन मला माझ्या मुलीच लहानपण आठवल..... मस्तच आहे. आता ती अठरा वर्षांची आहे.
पण तु़झ लिखाण वाचुन मला माझ बालपण आठवल. एका दगडात दोन पक्षी तसलाच हा एक वेगळा प्रकार. तुझ्या नावातदेखील काहीतरी रहस्य असले पाहीजे असो......

पण फोटो मात्र झक्कासच........

लिंबू
मी फोटो पाहण्यास खूप उशिर केलाय, पण त्या निमित्ताने इथले सगळे लिखाण मुखत्वे करून तुमचे मनोगत वाचायला मिळाले, फोटोचे शिर्षक, छोटी, सगळंच उत्तम. Happy
तुमचे मनोगत वाचून अस्वस्थ झाले, आणी माझ्या ही मनात साजिर्‍याने केलेली प्रार्थना तरळून गेली..
खरंच तिला भविष्यात काही म्हणजे काही कमी पडू नये Happy

Pages