दीड वर्षाच्या मुलाच्या activities

Submitted by तनू on 29 February, 2012 - 01:32

माझा मुलगा आता दीड वर्षाचा आहे. त्याला पुढचे ४ दात वर- खालि आनि दाढा येन्याची सुरवात झालि आहे. पण तो अजुन ही काही चावुन खात नाहि. चपाती, भात सर्व त्याला बारीक करुन भरवावे लागते. मध्ये एखादा घास जरि असाच भरवला कि लगेच उलटी करतो. मागे वरदा ने सान्गितल्या प्रमाणी कि त्याला बिस्किट चे तुकडे करुन दिले, तर त्याने ते उचलुन मलाच भरवले. त्याला काहीही दिल कि तो समोरच्या व्यक्तिलाच भरवतो, त्याने चावुन खान्यासाठी काय करु?

आणी अजुन एक, तो पकडुन उभा राहतो, आणि आपण बोलवल कि ५-६ पावल चालत पन येतो. पण अजुन आधाराशिवाय उभा राहत नाहि. तर त्यासाठी काय करत येइल?

मि doc ला पण विचारल या दोन्ही साठी, तर ते हेच सांगतात, कि त्याला वाटेल तेव्ह तो करेल, त्याला वाटेल तेव्ह तो खाइल, त्यात आपण काहि करु शकत नाही. Sad

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्याला थोडा वेळ दे
चावुन पण खाण्याची घाई नको करु
होईल त्याला प्रॅक्टीस
माझी मुलगी १४महीने पुर्ण आहे चावुन खात नाही तशीच गिळते
आता चालायला लागली आहे सो डोन्ट वरी

माझि मुलगी दीड वर्शाची आहे. तिला समोरचे खालचे वरचे दात, दाढा, सुळे सगळ आल आहे. तरी सुधा ती घास चावुन खात नाही. तसाच सरळ गिळते. मला वाटत की लहान मुलामधे चावुन खायचा पेशन्स नसतो. म्हणुन ती गिळत असावीत. काळजी करु नका. होइल आपोआप बरोबर. आई म्हणुन आपल्यालाच घाई असते.

आई म्हणुन आपल्यालाच घाई असते >> Sad

आमच्या शेजारी ९-१० महिन्याचि मुल आहेत, ती सर्व चावुन खातात,(त्या सर्वांचि आई घरिच असते, मग मला वाटत कि मि त्याच्या कडे नीट लक्ष देत नाही) मला माहित आहे अस compare करन चुकिच आहे पण तरि ही टेन्शन येतच

मला माहित आहे अस compare करन चुकिच आहे पण तरि ही टेन्शन येतच >>> नकोच करू compare Happy

अन टेन्शन तर मुळीच घेऊ नको. Happy

>>अचानक काहीतरी होतं आणि पुढची स्टेप सुरु होते..>> हे मात्र अगदी खरं. Happy

अवंतिका अज्जिबात टेन्शन घेऊ नका. प्रत्येक बाळाचे प्रगतीचे टप्पे वेगवेगळे असतात.

नीलू आणि हिम्सकूल ह्यांना अनुमोदन Happy
अवंतिका, जर डॉक्टरांनी काही काळजीचं कारण नाही असं सांगितलं असेल तर खरंच काळजी करु नका. माझ्या मुलगा वर्षाचा होईपर्यंत फक्त दूधच प्यायचा आणि नंतर अडीच वर्षापर्यंत फक्त खिचडीच खायचा.बाकी काहीही नाही. वर्षाच्या वाढदिवसाला चार दात होते. साधा गूळ जरी चाटवला तरी ओकार्‍या काढायचा. बाकी मुलं भाज्यांचं पाणी, मऊ खिचडी, दूधसाखर पोळी, भात, अंडी, भाज्या, फळं सगळं खातात. ह्याला भरवायला गेलं की तोंड घट्ट मिटून घ्यायचा. खूप प्रयत्न केले. त्याच्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की खायला पाहिजे हे खरं आहे. पण जर तो तोंडच उघडत नाही तर तुम्ही काय करणार ? बाकी प्रगती नॉर्मल आहे तर काळजीचं कारण नाही. मी पण मग सवय करुन घेतली. रोज सकाळ-संध्याकाळ खिचडी करायचा मलाच कंटाळा यायचा पण त्याला खायचा यायचा नाही Proud
असं करता करता त्यातून कधी बाहेर पडला आठवत पण नाही आता. आता इंडियन, मेक्सिकन, अमेरिकन, ब्रिटिश, इटॅलियन, चायनीज, ग्रीक, सगळं खातो Proud

>>आता इंडियन, मेक्सिकन, अमेरिकन, ब्रिटिश, इटॅलियन, चायनीज, ग्रीक, सगळं खातो
आणि तुझं डोकं..? (ते राहिलं का लिस्ट मध्ये!)

(आता त्यावरून मात्र तुलना नको हां..) Wink
~द. असो हा विषयच ईतका गहन आहे की यातून गेलेल्या सर्व आई बाबांनाच शेवटी डॉक्टरांना दाखवायची पाळी येते.
पूर्वीच्या काळी कसे करत असतील..? माझ्या आजीला अकरा मुले होती. ती गमतीत म्हणायची एक पोटात, एक मांडीवर, आणि एक बोट धरून चालणारे अशी तीची कायम अवस्था असे. सर्वांचं सर्व व्यवस्थित झालं.. ना हाताशी कुणी आया/बाया होती ना कंसल्टेशनसाठी कुणी डॉक्टर वा ईतर.
असो. अज्ञानात सूख आहे हे काही अंशी खरच.. नाहीतर आजकाल बाळ जन्माला आले की जगातील ईतर हजार बाळे त्या त्या वयात काय काय करतात याची नेट वरून माहिती घेवून तुलना सुरू होते आणी बाळाचं बाळपण मस्त एंजॉय करायच्या ऐवेजी नसत्या शंका आणि चिंता मध्ये आपण तो वेळ हरवून बसतो.

अगदीच काही "विचीत्र" निदर्शनास आलं तर जरूर सल्ले घ्यावेत. पण अन्यथा आनंद घ्यावा.
(च्यामारी परदेशात मूल जन्माला आलं की अगदी कुठल्या महिन्या पर्यंत बाळाच्या शी शू चा रंग काय असतो हे देखिल काटेकोरपणे पहातात- चलता है! वर्तमानपत्रांची एकेकाळची हक्काची जागा आता डायपरने घेतली आहे- दोन्ही अर्थाने! तेव्हा काळाचा महिमा!) Happy

माझा मुलगा चार वर्शाचा आहे, परन्तु अजुन बोलत नाहि. >>
रतन, शब्द बोलतो का? का काहीच बोलत नाही? डॉ.ला विचारून बघ. Speech Therapy करता येऊ शकते.

माझा अडिच वर्षाचा मुलगाही फार बोलत नाही. पण बरेच शब्द बोलतो पण पूर्ण वाक्य असे बोलत नाही. डॉने ३ पर्यत वाट बघायला सांगितले आहे, जर अशीच स्थिती राहीली तर Speech Therapy चा ऑप्शन दिला आहे.

योग >> Happy पोस्ट आवड्ली. माझा नवरापण नेहमी हेच म्हणतो माझी चिंता बघून.

मुलाचे वजन उंची, जनरल माइल स्टोन यासाठी एक ग्रोथ चार्ट मिळतो... तो पहा.. सरकारी दवाखाना, सरकारी नर्सबाई, आंगणवाडीतील मॅडम यांच्याकडे हा चार्त मिळू शकेल. त्याला रोड टु हेल्थ चार्ट असे म्हणतात.

आजच माझे बाळ बघून आलो. ( आई, बाळी Happy माहेरी आहेत.. ) .. अकरा महिने . सगळे खाणे खाते. आ आ , ब ब असले आवाज काढते... टेबल कॉटला धरुन चालते.... रंगीत चित्रे, खेळणी दाखवली की आनंदते.... Happy डॉक्टरान्नी कसलेही टॉनिक, फॅरेक्स वगैरे देऊ नका असे सांगितले आहे.. रोज सकाळी ताजे ताक आणि लोणी खाते... Happy

दाढा पूर्ण आल्या की तुमचे बाळ चावून खायला शिकेल. तोपर्यंत मऊ पदार्थ खायला द्या. दिनेशदाना विचारा. ते सांगतील रेसिपीज. अजून दोन चार महिन्यात तुमचा मुलगा चालेल बहुतेक.

सर्वांना प्रतिसादा साठी धन्यवाद.

योग >> तुमची पोस्ट एकदम बरोबर. मलाहि कधीतरी असच वाटत, पण तरीही मध्ये मध्ये चिंता डोक वर काढतेच. Happy

म्हणजे आता त्याने स्वताहुन करे पर्यत वाट बघावि लागेल.

<< रतन शब्द बोलतो का? का काहीच बोलत नाही? डॉ.ला विचारून बघ. Speech Therapy करता येऊ शकते<<
सुप्रिता, काहि शब्द बोलतो पन, meaningfull nahi bolat. SPEECT & OCCUPATIONAL THERAPY च्चालु आहे.
तु पन THERAPY लव्कर चालु कर, लहान वयातच मुल लवकर pick up करतात

धन्यवाद

माझी मुलगी १९महिन्याची आहे. ती बर्‍यापैकी चावून खाते. आजूबाजूला पडलेली प्रत्येक गोष्ट ही आपल्याला खाण्यासाठीच आहे अशी तिची ठाम समजूत आहे. जे दिसेल ते सरळ तोंडात. Happy एकदा पप्पाची चप्पल चावण्याचा प्रयत्न केला आहे.

मुलाना जेव्हा चावायला शिकवाल तेव्हा ती अतिभुकेली नसावीत. भुकेने त्याना पटापट गिळावंसं वाटतं. आपल्याला जबरदस्त भूक लागलेली असताना कुणी सुपारीचं खांड चघळत बस असं म्हटलं तर किती राग येइल? पण पोट पूर्ण भरलेले असताना काहीच खाणार नाहीत. म्हणून दोन खाण्याच्या मधल्यावेळामधे त्याना चावण्यासाठी पदार्थ द्यावेत. जेणेकरून त्याना चावणे या कृतीची सवय होइल. यासाठी बिस्कीटे अथवा मऊ धिरडे डोसा, अथवा पोळीचे तुकडे असे पदार्थ द्यावेत. एखादा छोटासा तुकडा खाल्ला तरी बास. त्याने वेगवेगळ्या चवीदेखील समजायला मदत होते. अशा वेळी अर्थात समोर आपण बसायलाच हवे. चुकून ठसका वगैरे लागला तर घाबरून न जाता पाठीवरून हातफिरवावा व पाणी पाजावे. बाळाचा मूड नसेल तर अतिप्रयत्न करू नका. हळू हळू शिकतात मुलं. दाढा आल्यावर तोंडातल्या तोंडात घास फिरवून त्याना चावता येणे सोपे जाते. पुढचे खालचे दात आलेले असतील तर चावून खाणे कष्टाचे काम आहे. प्रयत्न करून बघा. Proud

आमच्या शेजारी ९-१० महिन्याचि मुल आहेत, ती सर्व चावुन खातात,(त्या सर्वांचि आई घरिच असते, मग मला वाटत कि मि त्याच्या कडे नीट लक्ष देत नाही) मला माहित आहे अस compare करन चुकिच आहे पण तरि ही टेन्शन येतच
>>> अशी तुलना करण्यापेक्षा ती मुलं शहाणी आहेत. आईचं ऐकतात. माझंच रत्न दिव्य आहे अजिबात ऐकत नाही. असं म्हणा. याचा फायदा काही होत नाही. पण किमान स्वतःला विनाकारण दोषी मानणे कमी होते. Happy

अशी तुलना करण्यापेक्षा ती मुलं शहाणी आहेत. आईचं ऐकतात. माझंच रत्न दिव्य आहे अजिबात ऐकत नाही. असं म्हणा. याचा फायदा काही होत नाही. पण किमान स्वतःला विनाकारण दोषी मानणे कमी होते >> Happy

एकदा मि त्याला शेजारी घेउन गेले होते, त्यानि त्याला बिस्कीट दिल, मि म्हटल कि तो अजुन काही खात नाहि, टाकुन देइल. तर तिथे बसुन पठ्याने पुर्ण बिस्कीट खाल्ल. आणि त्यानंतर रोज आम्हि हातात द्यायला सुरवात केली, तर एकदाही तोंडाला लावल नाही.

त्याच्या न खाण्याचा एकच फायदा म्हणजे लक्ष ठेवाव लागत नाहि, कि जमिनी वर पडलेली वस्तु तोंडात घालेल.

अवंतिका,
ज्या दिवशी दोघे घरी असाल, त्या दिवशी, जेवणाची वेळ झाली तरी आपणहून त्याला काहि देऊ नका. पण त्याला आवडणारे पदार्थ त्याच्या हाताला लागतील, व त्याला दिसतील असे ठेउन द्या. बहुतेक हा प्रयोग यशस्वी होईलच.

अर्थात, काळजी करण्यासारखे अजिबात काही नाही. त्याच्या कलाने सर्व काही करेल तो.

>>एकदा मि त्याला शेजारी घेउन गेले होते, त्यानि त्याला बिस्कीट दिल, मि म्हटल कि तो अजुन काही खात नाहि, टाकुन देइल. तर तिथे बसुन पठ्याने पुर्ण बिस्कीट खाल्ल. आणि त्यानंतर रोज आम्हि हातात द्यायला सुरवात केली, तर एकदाही तोंडाला लावल नाही.

हे जवळजवळ प्रत्येक घरात होतं. मातापिताफजितीयोगावर जन्मलेले प्रत्येक बाळ असेच करते Proud

>>एकदा मि त्याला शेजारी घेउन गेले होते, त्यानि त्याला बिस्कीट दिल, मि म्हटल कि तो अजुन काही खात नाहि, टाकुन देइल. तर तिथे बसुन पठ्याने पुर्ण बिस्कीट खाल्ल. आणि त्यानंतर रोज आम्हि हातात द्यायला सुरवात केली, तर एकदाही तोंडाला लावल नाही.>>> हो हो हे ही हटकून सगळ्याच घरी चित्र दिसतं.. एव्हढचं काय आमच्या लहानपणी आम्ही असेच करत होतो असं आई सांगते. त्यामुळे याला पर्याय नाही असच वाटतं. Happy

>>>आजूबाजूला पडलेली प्रत्येक गोष्ट ही आपल्याला खाण्यासाठीच आहे अशी तिची ठाम समजूत आहे. जे दिसेल ते सरळ तोंडात>> नंदिनी Happy

>>पण अजुन आधाराशिवाय उभा राहत नाहि. तर त्यासाठी काय करत येइल?>> अवंतिका यासाठी बाळाच्या पायाला रोज थोडे तेलाने मॉलिश करण्याने फरक पडेल असं वाटतं.

न्यू यॉर्कच्या भारतीय डॉक्टरांकडे पोराला नेलं असता त्यांनी सांगितलं, " भारतीय मुलांची जास्त मेलानिन असलेली त्वच्या टॅन होताना एकसारखी दिसत नाही, कुठे कमी कुठे जास्त! म्हणून त्वचेवर धब्बे दिस्तात. मग आई-वडलांना 'ई व्हिटेमिन डेफिशिअन्सीचा' संशय येतो. चायनीज आईवडलांना मुलांची डोकी मागून चपटी वाटतात आणि कॅल्शियम डेफिशिअन्सीचा संशय येतो. " एकूण काय, मुलांबाबत अनाठायी काळजी करणे ही जागतीक समस्या आहे. Proud

वस्तू तोंडात घालण्यासंबंधी कुठेतरी वाचले होते. बाळाच्या स्पर्शज्ञान, दृष्टी, श्रवणशक्ती
वगैरे प्रगत झालेल्या नसतात. पण ओठ मात्र कमालीचे संवेदनशील असतात. त्यामूळे
आपल्याला एखादी नवी वस्तू दिसली, तर आपण जसा त्याचा स्पर्श, वास, रुप वगैरे पाहू, तसेच बाळ ती वस्तू काय आहे हे जोखण्यासाठी तोंडात घालते. त्याचा भूकेशी
संबंध नसतो.

अवन्तिका....खरच काळजी करू नका....सगळी मुले हेच कर्तात्...थोडेफर कमीजास्त्.....शेजारच्या मुलान्शी कम्पएरीजन तर अजीबात नको...
दात येण्याच्या वयात गाजराचा लांब तुकडा( हातात धरता येइल ईतका) साल काढून द्यायचा. चावण्यासाठी मुलान्चे दात या वयात शिवशिवत अस्तात्.....यामुळे चावण्याची सवय पण होते..गेला तर रसच पोटात जातो..आणि गाजर तसे कठीण अस्ल्याने सहज तुकडा मोडत नाही. माझ्या डेंटीस्ट दिरानेच हि कल्प्ना सान्गितली होती....करुन बघा. कदचित हे आवड्ले तर तो ईतरही गोश्टी खायला लागेल...
आणि चालण्याबद्दल तर फारच व्ह्राईटी असते...प्रत्येक मुलाची एक वेळ अस्ते तोपर्यन्त धीर धरा...

Thanks Phulrani

पण तोच तर प्रोब्लेम आहे, तो कोणताही पदार्थ तोंडात टाकतच नाही Sad

त्यला खाणे म्हणून देऊच नका ..खेळ्ण्यासाठी द्या...फक्त तुमचे लक्श नाही असे दाखवा....खा खा म्हणून मागे लागू नका...मुले बरोबर ते करतात जे आपण त्याना सान्गत नाही!

Pages