व्यंगचित्रचारोळी स्पर्धा चित्र क. १

Submitted by संयोजक on 2 September, 2008 - 21:11

कधी आपण एखाद्या प्रसंगावर चारोळी लिहतो... कधी एखाद्या व्यक्तीवर तर कधी कधी नुसतीच यमके जुळवत सुटतो....
झुळुकेवर तर पत्त्याची पाने टाकावीत इतक्या सहजतेने आपण चारोळ्या टाकत असतो.... कधीकधी तर चारोळ्यांचे सवाल्-जवाब रंगतात... जुगलबंदी होते!
खर म्हणजे चारोळी म्हणजे नेमक्या शब्दात केलेले "मार्मिक" भाष्य!
असेच एखाद्या विषयावर अतिशय "मार्मिक" भाष्य करण्याचे अजुन एक आयुध म्हणजे व्यंगचित्र.... त्या व्यंगालाही हसु येइल इतक निरागस (पण कधीकधी खोचकही!)
तर अश्या या दोन मार्मिक गोष्टी एकत्र करुन एखादी स्पर्धा घेउया का?
चालेल ना?.... काय धावेल.... तर मग ऐका :
इथे शब्दांविना फक्त रंगरेषातुन विषय पोहोचवण्याची किमया व्यंगचित्रकाराने अतिशय लीलया केलेली आहे... आता आव्हान आहे ते तुम्हाला.... हाच विषय समर्पक शब्दात आणि नेमक्या ओळीत तुम्हाला मांडायचाय!
तुम्हाला फक्त इतकच करायचय.... एरवी तुमच्याभोवती पिंगा घालत बसणार्‍या पण गरज लागते तेंव्हा गाव भटकायला जाणार्‍या शब्दांना हुडकुन आणुन एकेका ओळीत अचुक बसवायचय!
तुमच्यासाठी हे अवघड नाहिये..... एरवी बिनविषयाच्या विषयावर सुद्धा चारोळ्यांचे रतीब घालता तुम्ही झुळुकेवर : दिवा:.... इथेतर विषय तुमच्यासमोर मुर्तीमंत उभा आहे!

तर होउन जाउद्या.... कुंचल्याच्या चित्रलिपीला लेखणीच्या शब्दलिपीचा इंगा दावा!

तुमच्यासारख्या कलंदरांना काही नियम लावणे बरोबर नाही पण ही एक स्पर्धा आहे त्यामुळे... नाइलाज!
१) चारोळीचा विषय व्यंगचित्राला धरुन असावा
२) शब्दमर्यादा नसली तरी ओळीमर्यादा पाळावी
३) एका आयडी ला कितीही चारोळ्या लिहता येतील फक्त त्या वेगवेगळ्या पोस्ट मध्ये पोस्ट कराव्यात
४) विजेत्याची घोषणा जनमत पद्धतीने (पोलिंग) होइल!

************************************************************

आजचे चित्र :

Shetkaree.jpg

उदा :
कर्जं झालीत माफ
आता फास नाही गळी ...
पीकपाणी झाल बास
आता खेळू चेंडूफळी ...

लोकाग्रहास्तव सर्व स्पर्धांची अंतिम तारीख रविवार (१४ सप्टेंबर) ऐवजी सोमवार (१५ सप्टेंबर) केली आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

करुन करुन शेती
झाली आमची माती
म्याच फिक्स करण्या
ब्याटी घेतल्या हाती

सरकारने दिली कर्ज माफी
सोडुन गोफन आता ब्याट घ्यावी हाती
नी बैलाला करुन रनर
मिळवाव्या जाहिराती

आमच्या कृषी मंत्र्यांच आहे
नुसत क्रिकेटवर वरतीच प्रेम
आता ब्याट घ्या हाती नाहीतर
लागेल आपल्या फोटोभवती फ्रेम Happy

प्रवेशिका - १
गोफणीत आला चेंडू, स्टम्पांनी नांगरले शेत
कसे जुळले पहा शेतीचे क्रिकेटशी नाते
कर्जमाफीचा फॉलो-ऑन मिळाला
कृषीमंत्रालयात सुरु झाले क्रिकेटखाते

  ***
  If dreams are like movies, then memories are films about ghosts...

  प्रवेशिका - २
  क्रिकेटचं महत्व शेवटी
  शेतकर्‍यानंही जाणलं
  बर्'बाद' होऊ नये म्हणून
  क्रिकेटला शेतीत आणलं.

   ***
   If dreams are like movies, then memories are films about ghosts...

   प्रवेशिका - ३
   वनडे, टेस्ट प्रकार पुरेसे नाहीत
   गरिबीचे आमच्या हेच निदान आहे
   कृषी-क्रिकेटचा लागलाय पाट
   भारत कधीकधी कृषीप्रधानही आहे.

    ***
    If dreams are like movies, then memories are films about ghosts...

    बीसीसीआयच्या वृद्धाश्रमातही Proud
    अशी अन्गमेहनत करावी लागते
    म्हणूनतर कपिलदेवलाही
    वेगळी चूल थाटावीशी वाटते
    ...;
    आपला, लिम्बुटिम्बु

    आसीसीच्या खेळामधली,
    चेंडू आणिक फळी...
    पावसावरती डाव सोडला,
    अधुरी पिक पेरंणी...

    डोचक्यात न्हाई Halmet,
    पायात न्हाईत Pad...
    गेलं शेत, गेली Match,
    हाती र्‍हाईली Bat...

    आम्ही क्रिकेट पाहतो
    कधी कधी खेळतो
    पण श्वासात भिनलेले
    आम्ही क्रिकेट जगतो

    -अश्विनी

    फॉर्म गेल्यावरची टीम इंडिया
    पवारांनी अश्शी कामाला लावली..
    धोनीला नांगर, युवराज मळणीला
    अन दिपिका उखळापाशी आली!!

    क्रिकेटच आहे सर्व कायेत भरलेला...
    थारा नाही अन्य दुस-या कुठल्याही खेळाला.....
    क्रिकेटचीच लेणी सर्व अंगभरा......
    क्रिकेटविना नाही ईचारच दुसरा....

    शेतीही झाली ही गड्या क्रिकेटमय.....
    धानही फुलले हे छान खळीभर.....
    काढायच्या धावा आहेत रे लय....
    पळ रे ढवळ्या पळ...... लई जोरात पळ....!!

    साजिरा .... एक नंबर Happy

    काळ्या मातीत मातीत धोणी त्रिफळ चालितो
    युवी मळणी करितो भज्जी गोफण फिरितो
    मिरची मंदिरा कांडिते डोळा युवीला मारिते
    बर्ड पाखरं हाकितो जनता भंकस मारिते

    सच्या रं माझ्या राहुल्या रं माझ्या सौर्‍या रं माझ्या !!!

    ( बर्ड :- इथे अंपायर डिकी 'बर्ड' असं अभिप्रेत आहे Happy )
    'काळ्या मातीत मातीत' चा ठेका धरल्यास....!!........

    बो सही :d

    साजीरा नी बो सही!

    बो भौ.. Rofl
    -::- -::- -::--::--::--::--::-
    गणा धाव रे.. मला पाव रे..

    साजीरा बो धमाल Happy

    एरव्हि आमचि पावसाविना
    व्हायचि शेति साफ
    परि क्रिकेट्चा देव पावला
    अन झाला लगान माफ

    Happy

    धनदौलत उपभोगते चेंडू अन फळी
    अन्नदात्यावर येते जीव द्यायची पाळी
    थोडा ओघ वळवा रे ! थोडं त्यांना जगवा रे !
    भारतमातेला हवा आहे विषमतेचा बळी

    मायबोली गणेशोत्सवातील स्पर्धा प्रवेशिका स्विकारण्याही मुदत संपली आहे. यापुढे कुठलीही प्रवेशिका स्पर्धेसाठी स्विकारली जाणार नाही. लवकरच निकालासाठीचे मतदान सुरु केले जाईल त्यात सर्व मायबोलीकरांना मतदान करता येईल.

    मायबोली गणेशोत्सव २००८