कविता थोडी लांबलेली असेल, पण वाचावी असा रसिकांपुढे हट्ट करतो. आताचे ठाऊक नाही पण काही काळापूर्वीचे हे घरोघर दिसणारे चित्र आहे. पूर्वीच्या मराठी चित्रपटांतील खाष्ट व प्रेमळही सासूबाई इंदिरा चिटणीस याना नजरेपुढे ठेऊन या कवितेतले सासुचे पात्र शब्दांकीत केले आहे.
सुनबाई तुला, येतच नाही काही
आईने कसे वळण लावले नाही
आम्ही उठायचो पाचाच्या ठोक्याला
घालून सडा लागतसू पूजेला
चल उठ आता सूर्य आला माथ्याला
जायचे आहे कचेरीस नव-याला
स्वैपाकाची तयारी नाही काही
आईने कसे वळण लावले नाही
चल घाल घड्या वाळुन पडले कपडे
ते झाल्यानंतर आरशात बघ रुपडे
भांडीकुंडी तशीच मोरीत पडली
भाजिही तशी विना निवडता सडली
सारे करुनी ऒफीसची कर घाई
आईने कसे वळण लावले नाही
****
हॆलो अहो, मीच बोलते आहे
सासुबाई, काहीही बोलत राहे
छळणूक आता होत सहन मज नाही
म्हणतात मला वळण मुळीच ते नाही
****
ये जाउनिया दोन दिवस तू घरी
मम आईची भिती न मनी धरी
आताच तिला लाविन येथून फोन
भावास तुझ्या ताप आला सांगेन
****
येते जाऊन घरी मी सासुबाई
भेटीस पुन्हा दोन दिसांनी येई
"थांब गे मुली अशी बरी तू जाते
मी कुठची तुला असली सवलत देते
लाडू केले घरी न्यायला चार
करता करता रात्र जाहली फार
ती साडी दे भेट तुझ्या आईला
माझ्या वतीने भावाला मिठि मार
मोकळ्या हाति बरी मी जाऊ देई
म्हणतिल सासु शिकवत नाही काही
हे पैसे घे, ठेव लागतिल तुजला
घाबरु नको आराम पडो भावाला"
****
पाया पड ना, तुझी मी सासुबाई
आईने कसे वळण लावले नाही
सुनबाईचे भरुन आले डोळे
अन सासुचे रूपच धुसर झाले
पिढीतील अंतर , आमच्या वेळी
पिढीतील अंतर , आमच्या वेळी असे नव्हते, हेच शिकवले का ? असे वर्षानु वर्षे न संपणारे ... आणि ते सांगण्याचा चांगला प्रयत्न.
खाष्ट पण प्रेमळ सासू.. मस्त
खाष्ट पण प्रेमळ सासू.. मस्त रंगवलीये या कवितेत.
अगदी अगदी जसच्या तसं उतरवलं
अगदी अगदी जसच्या तसं उतरवलं आहे कवितेत... आजही दिसते थोडीफार अशी परिस्थिती...
व्वा व्वा छान
व्वा व्वा छान जमलीये....मस्तच......
किंकर, सांजसंध्या, चिमुरी,
किंकर, सांजसंध्या, चिमुरी, योगुली: ऋणी आहे. कृपा अशीच राहूदे.
खासकरून खेडेगावात म्हणजे
खासकरून खेडेगावात म्हणजे आमच्याकडील सध्याचे व जास्त करून या अगोदरच्या काळातले चित्र डोळ्यासमोर उभे राहते
छान कविता.
छान कविता.
फणसासारख्या वरून काटेरी
फणसासारख्या वरून काटेरी असल्या तरी आत तशाच रसाळ गोड असणार्या सासूबाई प्रत्येक सुनेला हव्याशा वाटत असतात. पुढे सासूच्या भूमिकेत जाताना आपल्यालाही तसेच व्हायचे आहे ही भावना ठेवावी हे वळण मात्र आईने लावायचे असते. छान कविता.
मलाही आवडली ही खाष्ट पण
मलाही आवडली ही खाष्ट पण प्रेमळ सासु
खाष्ट पण प्रेमळ सासु छान
खाष्ट पण प्रेमळ सासु छान
किती वेगवेगळ्या विषयांवरती
किती वेगवेगळ्या विषयांवरती कविता सुचतात तुम्हांला!
चांगली आहे ही पण!
छान.
छान.
अनिल तापकीर. एम. कर्णिक,
अनिल तापकीर. एम. कर्णिक, नन्ना, निंबुडा,फालकोर्.के अंजली, सुसुकु सर्वांचे मनापासून आभार.
छान्,आवडली.
छान्,आवडली.
छान
छान
छान
आवडली....आई ला पण वाचुन
आवडली....आई ला पण वाचुन दाखवली..तिला पण आवडली
गोड आहे ही कविता. आवडली.
गोड आहे ही कविता. आवडली.